Valentines Day

= सिंगल मित्र मैत्रिणींसाठी =
Whats your plan on this Valentine's day ?
असं विचारल्यावर बरेच सिंगल मित्र - मैत्रिणी छोटंसं तोंड करून बसतात. ब्रेकअप झालंय यार... किंवा अजून कुणी भेटलीच / भेटलाच नाही रे तेजा... असं म्हणत मनातली खिन्नता, उदासिनता चेहऱ्यावर आणून शून्यात नजर लावतात. कदाचित इतर कपल्स कडे बघून त्यांच्यातली खिन्नता न्यूनगंडाच्या रूपाने बाहेर येत असेल.
.
Valentine's day हा कुणाच्याही स्मरणार्थ असू देत, आपण "प्रेमदिन" म्हणूनच साजरा करतो. निखळ प्रेमाचा दिवस. प्रेम म्हणजे काय ? तर जी गोष्ट आपल्याला जिवापाड आवडते. आपण त्या गोष्टीसोबत मनापासून जगतो... त्या गोष्टीत आपला आनंद, हास्य लपलेलं असतं.. त्याच गोष्टीवर आपलं प्रेम असतं
एक मुलगा आणि एक मुलगी यांपल्याडही प्रेम असतं.
कुणाचं आपल्या बाईक वर, कुणाचं खाण्यावर, कुणाचं झोपेवर तर कुणाचं गाण्यावर...
सगळ्यांत निस्वार्थ आणि निखळ प्रेम म्हणजे आपलंच आपल्या स्वतःवर...
.
मी काय करावं ? कसं करावं ? काय खावं... ? काय प्यावं... यावर पहिला हक्क आपलाच असतो... आपली काळजी आपणंच घेतो. आपल्या भावनांची कदर आपणंच करतो... संकटातही स्वतःची साथ सोडत नाही... आपलं विश्व आपल्यापासून सुरू होतं आणि आपल्यापाशी येवून थांबतं...
Me.. and only Me... Who cares me, Who loves me, And only who knows the true value of my feelings... and my life...
स्वतःवर प्रेम करा... या जन्मावर... या जगण्यावर प्रेम करा. आपण आपल्या सोबत असतांना एकटे कधीच नसतो.
.
म्हणूनच तो किंवा ती नाही म्हणून रडत बसण्यापेक्षा उद्याचा दिवस मनापासून आणि स्वतःसाठी जगा. आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी करा... स्वतःकरता गिफ्ट घ्या... मस्त फिरा... मज्जा करा... जगा...
इतर कुठल्याही दिवसांपेक्षा उद्याचा दिवस अविस्मरणीय असेल... कारण निखळ आणि निस्वार्थ प्रेम अनुभवलं असेल...
.
Single ?.... No.... I am in the relationship with Myself.... :-) :-)
ट्राय करा...
© तेजस कुळकर्णी

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved