मराठी राजभाषा दिन

हाय हॅलो नं सुरुवात केल्यावर कुणीही असु देत, मी मराठीतच बोलतो... जास्तीत जास्त मराठीतच लिहीतो... "भावना" शक्यतोवर मराठीतच प्रगट करतो... मग त्या प्रेमाच्या असो वा ठोकायच्या... I Like it, I like you पेक्षा "हे मला आवडलं", तू मला आवडतेस, आणि Idiot, Mad पेक्षा भxx... बोलायला भारदस्त, ऐकायला गोड आणि आतून येतं... एकाच फटक्यात खेळ खल्लास... ! थोडक्यात काय, तर मी मराठीचा जास्तीत जास्त वापर करतो...
.
कारण मराठी माझी मातृभाषा आहे... त्यामुळे तिचा वापर करणं हा माझा हक्क आहे...
.
इंग्लीशचं म्हणाल तर, मी दिवसभर कार्पोरेट वातावरणार राहणारं पोरगं आहे... यूएस यूकेच्या गिऱ्‍हाईकांसोबत गप्पा सुरु असतात... पण ते कंटाळवाणं... च्यायला काय सुरुय टाईप मख्खं चेहरा घेऊन बसा... राग आला तर च्युइंगमसारखी इंग्लीश वाक्य फेकावी लागतात, पण अस्सल खान्देशी दोनच शिव्या हासडल्यावर मिळणारं समाधान त्यात नसतं. हिँदी तसं चांगलंच. मराठीसारखं.
.
आईपप्पांनी मला मराठी शिकवलं, पुस्तकांशी मैत्री करु दिली त्यामुळे मी मराठी बोलू-लिहू-वाचू शकतो. हे खूप उपकार आहेत.
.
मराठी राजभाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मराठीच बोला... मराठी वाढवा...:-)

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved