मधुबाला
= मधुबाला =
आज तिच्या चिरनिद्रेला ४६ वर्ष झालीत...
.
'शापित अप्सरा' या विशेषणाचं करोडो काळजात जिवंत असणारं उदाहरण. तेव्हाच्या सगळ्यांची 'दिल की धडकन'... मुघल ए आजम ची खरी अनारकली फिकी पडेल असं स्वर्गीय रुप... ती आली... तिने पाहिलं... ती जगली... तिने जगवलं... आणि ती गेली... २३ फेब्रुवारी १९६९ ला ऐन भरात ही दंतकथा संपली...
.
मधुबालाचं बालपण तसं दिल्लीतलं. झगडलेलं... तिच्या नालायक बापाचा प्रभाव आणि त्रास तिला आयुष्यभर भोवला. चार बहिणींत सगळ्यांत मोठी आणि सुंदर बेबी मुमताज... नावाला वलय मिळाल्यावर वेश्यांच्या वस्तीत असलेल्या तिच्या झोपडीवर " ये किसी तवायफ कां घर नही, सुपरस्टार बेबी मुमताझ यहां रहती है " असा बोर्ड लावून तिने स्वतःची ओळख दिली होती. पुढे देविकाराणींनी मुमताजची मधुबाला केली. मुघल ए आजम, महल, चलती का नाम ने ते नाव सगळ्यां ऋदयांवर कोरलं.
.
मधुबालाचे चित्रपट पाहतांना तीच्या अस्मानी सौंदर्याने लोकांचं ऋदय धडधडायचं... खुर्ची घट्ट पकडली जायची आणि तोंडातून सsss चे हुत्कार सुटायचे...
.
बापाचा लोभ, दडपण, कामातले हिंदोळे, नात्यातलं अपयश आणि शारीरीक वेदना याचा मधुबालाच्या सौंदर्याला शाप होता... शून्यातून स्वर्ग उभारणाऱ्या या अप्सरेला स्वतःसाठी जगता आलंच नाही...
नात्यांच्या भावविश्वात गुरफटल्यानं आणि त्यातल्या अपयशानं तिच्यातला आत्मा संपला होता. अनारकली प्रमाणे खऱ्या आयुष्यातही दिलीपकुमारसाठी ती शेवटपर्यंत वाहीलेली होती... तडफडत होती... तळमळत होती...
.
अनारकलीचं दुःख हिच्या खऱ्या आयुष्यातही होतंच... आणि तिचा शेवटही तसाच दुर्देवी... दुःखद...
जुहूमध्ये चिरनिद्रेत असलेला तिचा आत्मा आजही वाट बघत असेल...
चांगल्या सुपरहिट स्क्रिप्टची
गुलाबाच्या फुलाची
कुणीतरी येऊन ऑटोग्राफ मागावा याची
की
तिच्या खऱ्या प्रेमाची ?
.
या दंतकथेची, शापित अप्सरेची, चिरंतन सौदर्याची तिच्या स्मृतीदिनी एक आठवण...