बस - तिलंग
"बस" या अद्तभूत वाहनाचं मला आधीपासून विशेष कौतूक वाटतं. बनानेवालेने अपना पूरा दिमाग लगाके इसको बनाया टाईप... नो नाजूकपणा इज देअर ! सगळं असं भारदस्त ! आपलं अवाढव्य शरीर घेऊन, तीस-पन्नास प्रवाशांसह लांब लांब पल्ले रमत गमत पार करायचे.... याला म्हणतात वट्ट्ट्ट ! पीएमटी असो वा बेस्ट, सर्वकालीन यष्टी ते एसी स्लीपर कोच एअर सस्पेँशन बस... डौल एकसारखाच ! सिग्नलपाशी थांबलेल्या बस बघा, आपल्याच गुर्मित ! नाकासमोर चालणार... इकडे तिकडे बघणारही नाही. एखादा राजा आपला अवाढव्य थाट सांभळत चालतोय असा... . या बस समोरुन जातांना पार नजरेआड होईपर्यँत, "तिलंग" रागातली बंदीश माझ्या मनात वाजत राहते... अगदी सवयीनेच ! त्या बसेसचा मागचा भाग डूलत राहतो... इकडे स्थायी सुरु होते... "चलत चाल गोपी ग्वाल, गजगामिनी डुलत डुलत...." हा रागही खमाज थाटातला, चंचल प्रकृतीचा आणि गंधार-निषाद वादी-संवादी असलेला असल्याने म्हणतांना गोड तितकाच भारदस्त आणि तब्येतीचा ! . बस दिसते, ही बंदिश वाजते, भलमोठं खळखळून हसू येतं... मूड फ्रेश होतो... आणखी काय हवंय... !! ...