वाहतूक पोलीस
दोन गोष्टी...
दुसरी गोष्ट : वाहतूकीचे नियम पाळणं (उदा. सिग्नल, स्पिड, नो एंट्री, लायसन्स, वन वे वगैरे) हे वाहन चालविणाऱ्या प्रत्येक नागरीकाचं कर्तव्य आहे ! आणि त्याबद्दल नेहमी जागरुक असायलाच हवं ! किंबहूना तेच सुरक्षित ठेवतं !
.
पहिली गोष्ट : पोलीसांनी अतिरेक टाळावा.
(शंभरातल्या नव्वदांसाठी... उरलेले १० खरंच आदर्शवत असतात ! )
.
महामार्गावर कुठल्याही वाहनाला अडवायचं, रस्त्यावर उभं करायचं आणि कितीही इमरजन्सी असली तरीही समजून न घेता शे-पाचशेच्या चिरीमिरी किंवा टार्गेट पूर्ण करण्यासाठी हात धूवून मागे लागायचं... पीयूसी नाही, पेपर्स नाही, हे नाय - ते नाय... - फाड पावती... पैसे नसतील पड पाया... कितीही परफेक्ट रहा - काहीतरी काड्या करून ही लोकं पावती फाडतातच किंवा मनस्ताप तरी देतात...
महामार्गावर बघा - एका ट्रकभोवती चार-पाच पोलीस येतात, त्या माणसाला पिडतात... एखाद दुसरा पेपर नसेल तर विचारूच नका, पण जर सगळं परफेक्ट असेल तरीही अपमानीत करुन शे-पाचशे घेतल्याशिवाय सोडत नाही... मंडईत रस्त्यावरच्या विक्रेत्यांचा पाणउतारा करुन ठेवतात... त्या माणसाचं वय, परीस्थिती न बघता...
यात कर्तव्य बजावणं कमी, आसुरी आनंद घेणं जास्त दिसतं !
.
ट्राफिक पोलीस - नागरीक यांत मित्रत्व कमी, शत्रुत्व जास्त दिसतं ! एक बाजू सावज शोधते, दुसरी बाजू तळतळाट देत, शाप देत चालते !
नेत्याचे नातेवाईक फोन करुन सुटतात, तिथे एखादी मध्यमवयीन सामान्य माणूस नव्या अॅक्टीवावर हौसेने जात असेल तर त्याला रडकुंडीला आणलं जातं...
.
भावनेच्या भरात कितीही नाकारलं तरी दुर्देवाने हेच सत्य आहे !
.
नागरीकांची बेशिस्ती आणि पोलीसांचा अतिरेक कमी होवून समन्वय साधला गेला तर अशी वेळ येणार नाही...
.
पोलीस हा पण माणूसच असतो... मान्य !
पण गाडी चालवणारा पण माणूसच असतो, आणि तो सामान्य असतो...
हे त्या वर्दितल्या माणसाने उर्मटपणा दाखवण्याआधी, त्याच्या पोटावर मारून आपल्या तुंबड्या भरण्याआधी हे लक्षात घ्यायला हवं !
खूप मोठी चूक असेल तर ठिक, पण शुल्लक गोष्टीसाठी वयस्कर माणूस, गरीब विक्रेते यांना उगाच त्रास देऊन सावज हेरणं वाईटच...
कारण शे-पाचशे बरोबर त्यांचे तळतळाट, शापही सोबत येतात, आणि ते नडतात !
.
शिंदेंचं वाईट झालं.
पण त्यांच्या बळीने या दोन्ही बाजू समोर आल्या हे मात्र खरं.
जाणारा माणूस निघून गेला, त्यांचं कुटूंब उघड्यावर आलं !
विलास शिंदेंच्या गुन्हेगारांना शिक्षा व्हावी... लवकर आणि कडक व्हावी, त्यां गुन्हेगारांचं आयुष्य बरबाद व्हावं हीच अपेक्षा !