निशब्द

माझा व्यवसाय सुरु करुन एक वर्ष होतंय... लहान स्वरुप आहे... पण येणारे अनुभव तगडे !
आजचीच गोष्ट...
.
पुर्ण झालेल्या प्रोजेक्ट्सची डिलीवरी देण्यासाठी मोस्टली टिमसोबत मी स्वत: जातो... कारण एकतर ओळखी करुन घेणं, दुसरं म्हणजे सगळं स्वत:समोर होतं... धाकधूक राहत नाही. गेल्या महिन्यात मिळालेला एक प्रोजेक्ट हॅँडओवर करण्यासाठी मी क्लायंट कंपनीत गेलो... त्या कंपनीचा संसार जवळपास २०० कोटीँचा. मी ज्यासाठी गेलो त्याची प्रोजेक्ट वॅल्यू काही हजार फक्त... त्यांच्यासाठी म्हणावं तर शुल्लक ! झाड की पत्ती वगैरे... तो प्रोजेक्ट मला मिळणं, मी तो बनवणं, आणि आ करुन सगळं सक्सेसफूली डन करणं हे माझाच विश्वास बसण्यापलीकडे होतं... स्वप्नात असावं असं...
.
मी आणि माझी टिम तिथे गेलो... पाहूणचार आणि इन्स्टॉलेशनचं काम झालं... ऑल टेस्ट ओके आल्या... धाकधूक खत्म ! पेमेँटका समय आया ! तिथला कोऑर्डीनेटर बोलला, आप उपरके प्लोरपे चलके बॉससे मिलेँगे ? वहापेही चेक मिलेगा, उनको आपसे मिलना है !
.
"बॉस ?" इथल्या ब्रॅँचचे हेड वगैरे असतील ! आपल्याला पैशाशी मतलब. (मनातला विचार ! )
- ठिक है ! चलीये.
वरच्या मजल्यावर गेलो ! त्या भव्य केबिनला नॉक केलं... आत गेलो.
आणि आतमध्ये चेअरवर बसलेल्या माणसाला बघून मी त्याच ठिकाणी शांत झालो... तिथे कुणी ब्रॅँच हेड वगैरे नाही, तर २०० कोटीचा संसार उभारणारे सत्तरवर्षीय दस्तुरखूद्द बसले होते...
.
ये ये... हसून स्वागत झालं... हॅव अ सिट... "तुला वेळ तर होणार नाही नां ? आपण थोडा वेळ बोलू शकतोय ?"
मी शांतच तितकाच गोंधळलेलो... त्यांच्या त्या आपुलकीयुक्त स्वागताने ततफफ झालो...
- सर, माय प्लेजर... प्लीज...
काहीतरी बोललो !
- डोन्ट बी फार्मल... ! मला तुला बिजनेस म्हणून भेटायचं नाहीय. काका म्हण हवं तर !
अनौपचारीक गप्पांत त्यांनी मला माझ्या कंपनीविषयी, वैयक्तीक आयुष्याविषयी विचारलं.... एक सीईओ एका स्टार्टअपची बियॉँड बिजनेस इतक्या आपुलकीनं चौकशी करतोय... माझ्यासाठी वेगळंच होतं !
.
त्यांनी मला माझा चेक दिला...
त्यांच्या प्रत्येक शब्दातून शून्य ते साम्राज्यातलं लाखाचं ज्ञान झेलून घेत होतो... काही वेळ गेल्यानंतर, मी निरोप मागितला... "दोन मिनिट थांब... महत्वाचं काम तर राहीलंच" !
त्यांनी एका पाकीटावर माझ्यासमोरच God Bless You लिहीलं, पाचशेच्या दोन कोऱ्‍या करकरीत नोटा त्यात टाकल्या, आणि माझ्या हातात ते दिलं...
.
मी विचारणार त्या आधीच...
"एक नोट तू तो प्रोजेक्ट वेळेत आणि पूर्ण केला. तुझ्यावरचा विश्वास सार्थ ठरवलास म्हणून बक्षिस ! आणि दुसरी नोट माझ्याकडून तुला सदिच्छा ! तू स्टार्ट केलंय, आणि खूप पुढे जाणारेस... आशिर्वाद म्हणून !"
मी तेव्हा शब्दशः स्वर्गात पोहचलो होतो... त्यांच्या पायाला हात लावून नमस्कार केला..."
- "मोठा हो ! आणि बेटा वीस वर्षाँनी हा आशिर्वाद दुसऱ्‍याला दे ! "
माझे डोळे ऑलमोस्ट डबडबलेले होते !
.
- त्यांच्या केबीनमध्ये सुंदर फ्रेम करुन लावलेल्या दोन जून्या नाण्यांचा उलगडा झाला...
.
मी या अनूभवाचं विश्लेषण नाही करु शकत. अनुभूती मिळाली ! हजाराच्या प्रोजेक्टचे या रुपाने खरबो मिळाले...
.
तिथून निघालोय, पण मन अजूनही सून्न आहे. डोळ्यांच्या कडा ओलावल्या आहेत !  इथे महत्वाचं त्यांनी माझ्यासारख्या शून्यावर उभ्या मुलाविषयी विश्वास आणि आपुलकी दाखवली... देव भेटला ! इतकंच !

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved