डिएसके... ! काल एका गृपवर चर्चा रंगली होती. डिएसके संपवण्यामागे राजकीय आणि प्रतिस्पर्धी गटाचा हात आहे, डिएसके गरीबीतून वर आले, मोदींच्या नोटबंदीने पहिली विकेट घेतली, डिएसके ब्राह्मण आहेत / सामाजिक कार्यकर्ते आहेत म्हणून काहीही झालं तरी त्यांचं समर्थन करायलाच हवं, डिएसकेनी बँकेकडे हात पसरले नाही, पुण्यात मध्यमवर्गीयांना घरं दिली - आणि लास्ट बट नॉट लिस्ट - डिएसके गोत्यात आणून पुण्यानं पायावर कुऱ्हाड मारुन घेतली ! .. बाजू १ : ज्या गुंतवणूकदारांनी दहा लाख - तीस लाख - पन्नास लाख गुंतवले त्यांनी ही कुऱ्हाड मारून नाही, तर स्वतःच्या हातानं घालून घेतलीय. हावरटपणा नडला. एमएफ, एफडी, स्टॉक्स सारखे भरभक्कम पर्याय असतांना जास्त व्याज मिळवण्यासाठी बेभरवश्याच्या म्हशीवर बसले - आणि आपटले. त्यामुळे "सहानुभूती" वगैरे बिलकूल नाही. रोज अश्या स्किम्स येतात - जातात, पतपेढ्या बंद पडतात, सरकार रोज सावधानीचं आवाहन करतं - तरीही - आत्महत्या करणाऱ्याची मानसिकता बदलू शकत नाही. - पाणी पण फुंकून प्यायच्या युगात पेट्रोलचा वास येवू नाही हे लोभ / हावरटपणा डोक्यावर गेल्याचं लक्षण आहे ! ... बाजू २ : डिएसके : व्...