मी अनुभवलेले गजानन महाराज - भाग २

गेल्यावर्षापर्यंत आयुष्यात सगळ्यांच लेव्हलवर परीक्षा सुरु होती. साडेसातीचा अति जास्त प्रभाव पडला. कंपनी सुरु केली, पण प्रोजेक्ट नव्हते. पगार देणं दूर माझा स्वतःचा खर्च काढणं कठीण झालं होतं. रडकुंडीला येणं काय असतं ते या दे या डो अनुभवत होतो. अश्या अवस्थेत सगळ्यांत वाईट काय होत असेल तर ते म्हणजे देवधर्म गुंडाळून नास्तिकता वरचढते... त्याच सर्वोच्च बिंदूवर पोहचलेलो...
.
घरी सगळे महाराजांवर विश्वास ठेवून कामं करतात. आणि दर दोन - तीन महिन्यांत शेगांवला जातोच जातो. पण तो एक फेज होता जेव्हा तीन वर्ष आम्ही या ना त्या कारणाने तिथे जावू शकलो नाही... जायचं ठरलं की काहीतरी अडकायचं... एक दिवस ठरवलं आणि गेलोच... महाराजांनी बोलावलंय म्हणजे काहीतरी चांगलं होणार हा विश्वास होता. तिथे गेलो, दोन दिवस त्यांच्या सानिध्यात राहीलो. "बाबा थोडी दया येवू द्या..." मनापासून सारखी प्रार्थना केली... खरं सांगायचं तर त्या वेळी एक रुपयाही हातात नव्हता, चेहऱ्यावर बारा वाजलेले... महाराजांजवळ समाधी मंदिर परीसरात बसलेलो, डोळे डबडबलेले... मन शांत झालं, पुढच्या वेळी येतांना काहीतरी चांगलं होईल मनात वाटत होतं. आणि निघालो...
..
घरी आलो,
पुन्हा प्रयत्न सुरू केले.
"अशक्य ही शक्य करतील स्वामी" प्रचिती आली.
एक चांगला प्रोजेक्ट स्वतःहून आला... इतर अडचणी संपल्या... सगळं कसं झालं काय झालं कळलं नाही, कुठलीतरी शक्ती आपल्यासाठी कार्यरत आहे हे जाणवत होतं... अवघ्या दिड महिन्यांत बस्तान बसलं...
...
पुढच्या वेळी शेगांवला गेलो - आधीपेक्षा दहापट चांगल्या मूडमध्ये. ! मी त्यांना जे कबूल करुन ठेवलं ते त्यांनी अवघ्या दिड महिन्यांत पूर्ण करुन घेतलं.
..
मागच्या तीन फेऱ्यांत त्यांची अगाध लीला अनुभवलीय... आपली इच्छा, आपण त्यांना दिलेला शब्द महाराज खाली पडू देत नाही. एक पारायण असंच शिकवून गेलं. ते उद्याच्या भागात. !

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved