Year To Demonetization

प्रथेप्रमाणे नोटबंदीची आठवण काढतोय...
फाऊल धरण्यात येवू नये ही विनंती... !
१०००-५०० च्या नोटा गेल्यावर्षी याच तारखेला बंद झाल्या...
त्याच्या मोजून सहा तास आधी ; चार पाच जन्म मिळून काहीतरी पुण्य केलेलं आडवं आलेलं, आणि हातातली कॅश घरात नको म्हणून अवघी रक्कम बँकेत भरण्याची सुबुद्धी अस्मादिकास झाली... ! दोन दिवस शेगांवला जायचं होतं, त्यामूळे तिथे लागले तर एटीएम मधून काढता येतील असंही डोक्यात होतं.
.
त्यामागच्या जन्माचंही पुर्ण पुण्य बॅलेन्स होतं की काय म्हणून वरखर्चासाठी १५०० रुपये पन्नास-शंभराच्या नोटा ठेवलेल्या. एकुण पुण्यावर व्याज मिळावं तसं बँकेतून येतांनाच पेट्रोल भरायचं आठवलं म्हणून १००० रुपये बँकेतूनच काढले - १००चं पेट्रोल भरून ९०० रुपये १००च्या नोटांत मिळाले... ! - सबब ८ नोव्हे. सायं ६ वाजता ५०-१०० च्या नोटांत २४०० रुपये हातात होते...
..
अचानक नोटबंदी झाली - आनंदाची उकाळी फुटली -
कारण १ : ओव्हरऑल गोंधळ बघायला मज्जा येणार...
कारण २ : काहीतरी जबराट घडतंय सो, It's an honor to be a witness of big change...
कारण ३ : पैसे होते, बाकी सबकुछ ऑन पेपर - टेंशन नाथी...
..
कॅशलेसच व्यवहार असतात आणि मान्य करन्सीत पैसे असल्याने झळ तशी काहीच पोहचली नाही... शेगांव ट्रिप करून आलो - तरीही जाणवलं काहीच नाही...
..
फेस्बूकावर पोस्ट वर पोस्ट पडत होत्या, रांगा - लोकं मरताऐत वगैरे. ... रांगेतले सेल्फी पोस्ट होत होते... रांग = देशभक्ती .. त्यामुळे रांगेत उभं राहण्याची / सेल्फी काढण्याची संधी मिळाली नाही म्हणून न्यूनगंडाने पछाडतो की काय ही भिती वाटली... पुन्हा उभ्या आयुष्यात असा दिवस दिसतो न दिसतो म्हणून हातातल्या शंभराच्या नोटा जमा करून येवू कां असा हुच्च विचार मनात आला, पण "मूर्खासारखं बडबडू नको - शंभराच्या नोटा घेवून रांगेत उभा राहीला तर लोकं वेड्यात काढतील" म्हणत पप्पांनी त्या हुच्च क्रांतीकारी विचाराचा चेंदामेंदा करुन टाकला... जरावेळानं त्यांना काय वाटलं माहित नाही - हजाराच्या पाच करकरीत नोटा हातात दिल्या आणि "जा जी ले अपनी जिंदगी" धर्तीवर "जा... भरुन ये बँकेत - खिंचवाले सेल्फी..." म्हणून बँकेत पिटाळलं...
दोन तास रांगेत उभा - गर्दीत सेल्फी काढणं शक्य झालं नाही तरीही -
नोटबंदीत बँकेच्या रांगेत उभं राहण्याचं भाग्य पदरी पडलं. .. पारलेजी बिस्कीट आणि पाण्याचं पाऊच (फुकट) मिळालं - पुढच्या दोन पिढ्या पुस्तकात वाचतील ते या.दे.या.डो. अनुभवल्याचं समाधान बोनस मिळालं ... पैसे भरल्यावर कृतकृत्य वगैरे होतात तेही झालं ...
..
बाकी सुट्टे पैसे संपल्यावर पुढे आठ दिवस जरा धडपडावं लागलं -
पण ओव्हरऑल मज्जा आली !
रांगेत सेल्फी काढू शकलो नाही हीच एकमेव खंत उरलीय.
..
सिरीयस नोट :
भ्रष्टाचाराचा नायनाट करणारी, अर्थव्यवस्था मजबूत करणारी स्टेप नोटबंदी ठरलीय !
भ्रष्टाचार विरोधी दिन !
त्या ऐतिहासिक दिनाचे साक्षीदार ठरलेल्या भारतीयांचे वर्षपूर्ती निमित्त अभिनंदन !

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved