DSK डिएसके
डिएसके... !
काल एका गृपवर चर्चा रंगली होती. डिएसके संपवण्यामागे राजकीय आणि प्रतिस्पर्धी गटाचा हात आहे, डिएसके गरीबीतून वर आले, मोदींच्या नोटबंदीने पहिली विकेट घेतली, डिएसके ब्राह्मण आहेत / सामाजिक कार्यकर्ते आहेत म्हणून काहीही झालं तरी त्यांचं समर्थन करायलाच हवं, डिएसकेनी बँकेकडे हात पसरले नाही, पुण्यात मध्यमवर्गीयांना घरं दिली - आणि लास्ट बट नॉट लिस्ट - डिएसके गोत्यात आणून पुण्यानं पायावर कुऱ्हाड मारुन घेतली !
..
बाजू १ : ज्या गुंतवणूकदारांनी दहा लाख - तीस लाख - पन्नास लाख गुंतवले त्यांनी ही कुऱ्हाड मारून नाही, तर स्वतःच्या हातानं घालून घेतलीय. हावरटपणा नडला. एमएफ, एफडी, स्टॉक्स सारखे भरभक्कम पर्याय असतांना जास्त व्याज मिळवण्यासाठी बेभरवश्याच्या म्हशीवर बसले - आणि आपटले. त्यामुळे "सहानुभूती" वगैरे बिलकूल नाही.
रोज अश्या स्किम्स येतात - जातात, पतपेढ्या बंद पडतात, सरकार रोज सावधानीचं आवाहन करतं - तरीही - आत्महत्या करणाऱ्याची मानसिकता बदलू शकत नाही.
- पाणी पण फुंकून प्यायच्या युगात पेट्रोलचा वास येवू नाही हे लोभ / हावरटपणा डोक्यावर गेल्याचं लक्षण आहे !
...
बाजू २ : डिएसके : व्यवसाय करणं चूक नाही - शून्यातून साम्राज्य उभारलं ... खूप चांगलं. पण कितव्या लेव्हलला येवून थांबायचं हे कळत नसेल तर या लार्जर दॅन लाईफ इमेजला किंमत नाहीय... डिएसकेंचे कोटेशन्स खूप प्रेरणादायी वगैरे असायचे - पण ते देण्याच्या नादात अंथरुणापेक्षा पाय मोठे पसरले जाताय हे डिएसके विसरले -
ड्रिम सिटीची खरंच गरज आहे कां ?
पुण्यात तितके महाग फ्लॅटस् घेवू शकतात असे ग्राहक आहेत कां ?
जितकं आहे तितक्यात समाधान न मानता हावरटपणा केल्याचं वाईट / दुर्देवी फळ या माणसाला मिळालं आणि आयुष्याच्या उत्तरार्धात न पुसला जाणारा डाग लागला.
६० वर्ष कमावलेलं ६ महिन्यांत गमावलं !
...
बाजू ३ : डिएसके समर्थक
(a) यात एक वाक्य उघडपणे वापरतात - मोदींच्या नोटबंदीने बळी घेतला. जर हे खरं असेल तर डिएसके जेलमध्ये जायलाच हवे. नोटबंदीत, ज्याच्याकडे काळा पैसा आहे तो उद्ध्वस्थ झालाय. डिएसके समर्थनात जर मोदींच्या नोटबंदीवर खापर फुटत असेल तर ही कुठेतरी काळ्या पैशांची आग आहे त्याचा धूर निघतोय.
(b) डिएसके राजकीय बळी : लोकसभेला अवघे ६३ हजार मतं (ती पण बसप सारख्या पक्षाकडून) घेणाऱ्या माणसाकडून पराभव होईल - त्यामुळे सगळ्यांना सोडून त्यांच्यामागे लागतील हे अति आहे - हे म्हणजे मोदींच्या पदाला नाराकडून धोका सारखं !
(c) सामाजिक कार्यकर्ते : भाषणं देणं - कोटेशन्स देणं - गोड बोलणं हे सामाजिक कार्य नसतं. परवडणारी घरं दिली (?) - त्याबळावर साम्राज्य उभारलंय. फुकट वाटलेत कां फ्लॅटस् ? डिएसकेंनी "परवडणारी" घरं अशी जाहिरात केली. वास्तविक आऊट एरीयात १२-१८ लाखात वनबीएचके मिळतात ! तुलनेने यांचे फ्लॅटस् महागच होते.
....
डिएसके ब्राह्मण आहेत म्हणून ब्राह्मणांनी सोबत उभं रहा -
दररोज प्रत्येक ब्राह्मणानं दहा रुपये दिले तरी डिएसके यातून बाहेर पडतील -
ठेव ठेवलीय ? ते पैसे परत कोण करणार ?
डिएसके एकटे ब्राह्मण उद्योजक आहेत ?
मूळात गैरव्यवहारात फसलेला माणूस कुठल्याही जातीचा/धर्माचा/पक्षाचा नसतो. नसावा. !
एकीकडे व्हिडीयोतून गळे काढायचे - दुसरीकडे इम्पोर्टेड कार विकत घ्यायच्या ... अश्या माणसाबद्दल सहानूभूती कां ?
एक जण बोलला - प्रत्येकी ५००० रु. वर्गणी करु त्यांना मदतीसाठी. काय गरज आहे ? त्याचं कर्म भरेल तो माणूस..
समजा, दिले मी ५००० किंवा Daily १० रुपये - तर त्यांच्या नव्याकोऱ्या गाड्या देणारेत वापरायला ?
..
या लॉजीकनं सगळ्या बेवड्यांनी ५०० रुपये वन टाईम दिले तर मल्याचं कर्ज फिटेल... देणारेत कां कुणी ? ज्याचं कर्म त्यालाच भरावं लागतं !
..
आर्थिक हातभार लावायची इच्छा असेल तर, - (माझ्यासह :-) ) हजारो लहान मोठे ब्राह्यण उद्योजक आहेत... - ऑलवेज वेलकम ! दहाच्या जागी पन्नास, पाच हजाराऐवजी पन्नास हजार सहज मिळतील !
..
ज्यांनी फ्लॅटस् बुक केले आणि फसले त्यांच्यासाठी वाईट वाटतं फक्त ! बिचाऱ्यांची स्वप्न धुळीला मिळाली. पैसा अडकला !
..
बाकी - डिएसके गोत्यात आणून पुण्यानं पायावर कुऱ्हाड मारुन घेतली ! - तर,
किती आले - किती गेले - भले मोठे राजे झाले - खोट्या गर्वास मिळाले - आणि मातीत मिसळून सारे गेले !
कुणालाही फरक पडत नाही !
..
जर हि नोटबंदीची विकेट असेल तर
आनंदच होईल !
..
अजुन दोन गोष्टी :
(१) प्रायवेट फायनान्सर कडून कॅपिटल उभं केलं असतं तर - लोकांकडून जितक्या व्याजानं कॅपिटल उभं केलंय त्यापेक्षा २० ते ३० % (व्याजाची रक्कम) पैसा जास्त लागला असता !
(२) प्रा. ली. कंपनी स्थापन करुन पब्लीक फंड गोळा केला... इथेच मोठ्ठा फ्रॉड झालाय.
मूळात प्रा. ली. कंपनीला लोकांकडून पैसा गोळा करण्याची परवानगी नसते ...
तसं शपथपत्र लिहून द्यावं लागतं आरओसी ला.
..
मराठी वगैरे सॉफ्टकॉर्नर नाहीय.
लोकांना फसवणारा माणूस जेल मध्ये गेला तर - खुनशी म्हणा किंवा काहीही - समाधानच होईल !