मराठी राजभाषा दिन २०२०
#मराठीराजभाषादिन ... = मी आणि माझी मराठी = ... "मराठी" - स्वरुप, लिपी एक असली तरीही मराठी माझी वेगळी - तुमची वेगळी आहे - प्रत्येकासाठी ती त्याची त्याची असते... आईचं जागतिक महत्व, स्वरुप जरी एक असलं तरीही आपली आई - आपलीच आई असते... आपल्यासाठीच असते... मराठीचंही तसंच आहे... भाषा प्रत्येकासाठी वेगळ्या रुपात असते, स्वरूप एक, लिपी एक पण भाषा मात्र प्रत्येकाची वेगळी असते... प्रत्येकाला उमगलेली वेगळी असते, भेटलेली वेगळी असते... आपली आपली असते...! ... हे माझ्या मराठीविषयी...! ... माझ्या आई-पप्पांनी माझ्या आयुष्यातला पहीला उत्तम निर्णय कोणता घेतला असेल ? - तर मला मराठी शाळेत घालणं... मराठी शाळेत जे मराठी वळण लागलं, ते इतर कुठेही लागलं नसतं. लहानपणी मराठीतून लिहीणं - वाचणं शिकल्याने न आणि ण, ळ आणि ल, श आणि ष, जगातला ज आणि जनावरातला ज यांतला फरक कळल्याने उच्चार स्पष्ट झाले, आणि त्यामूळेच कदाचित गाणंही जमलं... मराठीतूनच शब्दाचा योग्य अर्थासहित उच्चार होतो, आणि समोरच्यापर्यंत पोहचतो. . मातृभाषा कशाला म्हणतात ? जी आपल्या मनाची भाषा असते... आणि मनाची भाषा असल्याने...