Valentines Day 2020

आमची व्हॅलेंटाईन स्टोरी -
..
आमचं असं प्रपोज वगैरे झालंच नाही -
एकमेकांच्या प्रेमात आहोत हे दोघांनाही पक्कं उमगलेलं होतं, ते फॉर्मली बोलायची वेळ आली नाही... डिस्कशन डिरेक्ट लग्नाची बोलणी कधी सुरु करायची यावर झालं -
...
दोघांनीही घरी सांगितलं -
भेट ठरली -
आम्ही सगळे सेलूला गेलो -
नंतर तिचे आई-पप्पा आमच्याकडे आले -
लग्न ठरलं -
झालं ! 
...
कुणाचा विरोध नाही -
ना फॅमिली ड्रामा...
ट्विस्ट म्हणाल तर टप्प्याटप्प्यावर थोडक्यात थोडके येत गेले, पण त्यात फार थ्रिल नव्हतं -
...
लग्न झालं -
संसार सुरु झाला...
ती माझ्यापेक्षा वयाने २ दिवस मोठी असल्याने चिडली - रागवली तरी फार वाईट वाटत नाही...
दिड वर्षात पक्का मुरलो - ! 
...
लग्नापासून व्हॅलेंटाईन डे रोजच साजरा होतो -
डिमार्टला जावून groceries आणण्यासारखी तद्दन संसारी कामं करतांना ! 
आता तर एक लेकरुही हातात आलंय -
तो दिवसागणिक वाढतोय - 
तसं आमचं प्रेमही परिपक्व होतंय,
आणि रोजचा व्हॅलेंटाईन डे सुद्धा बहरतोय -
एकमेकांना समजून घेतांना.

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved