CabDriver and Me

घर ते ऑफीस शेअर कॅब बुक केली, पेमेंट मोड कॅश ठेवला. (जनरली डिजीटलच करतो, आज तो फोन डिस्चार्ज होता...) ज्याचे झाले १४४ रुपये... कॅब ड्रायव्हरनं आधी पैसे मागितले - मी १५० दिले...
त्याने ६ रुपये ड्रॉपला परत देतो सांगितलं...
...
अख्खा प्रवास त्या माणसाने पक पक पकवलं,
सीएए - कॅबने देशाची कशी वाट लावलीय ते बकला,
हम लोग क्या इन्सान नही ? हमने मोदी का क्या बिगाडा ? भला हो राहूलजीका जो अकेले नड रहे...
- ऐ भाय दिमाग मत खा सवेरे सवेरे...
बोलून त्याला गप्प बसवलं, हे असे यझ खूप भेटतात दिवसभरात - त्यांची यथाशक्ती घेतलीही जाते, त्यामूळे काही वाटत नाही, पण सकाळी सकाळी नको कटकट...
...
इतक्यात आरे फ्लायओव्हरला एक टिपीकल मराठी काका बसले,
त्यांची आणि माझी हाय-हॅलो ओळख आहे... त्यामूळे भेटल्यावर पुन्हा हाय हॅलो झालं...
त्यांचं दुकानाच्या जीएसटीचं काही लफडं सुरु होतं... त्याचा सल्ला घेण्यासाठी मित्राकडे निघाले होते...
पुन्हा तिच कॅसेट दुसऱ्या आवाजात वाजली...
जुनंच चांगलं होतं, कॅश यायची, व्हॅटची इतकी कटकट नव्हती ... आता जो येतो तो कार्ड दाखवतो... सगळं रेकॉर्ड ठेवावं लागतं... !
हे ओळखीचे असल्याने गप्पही करु शकत नव्हतो...
सहन केलं...
...
माझा ड्रॉप आला -
६ रुपये परत मागितले...
- सर चेंज नही है ...
त्याने त्या काकांकडे मागितले तर तिथेही बोंब...
- जाने दो ना सर, क्या ६ रुपयेके लिए टेंशन ले रहे हो ?
- क्यो छोडू ? गुगल पे है ना तेरा ?
- हा है ना ...
- नंबर बोलता हूँ, ६ रुपये ट्रान्सफर कर...
त्याच्या शांतीप्रिय चेहऱ्यावर अशांतीचे बारा वाजले...
१ रुपया सुद्धा कुणालाही विनाकारण का सोडायचा ?
६ रुपये मी ट्रान्सफर करुन घेतले...! पेमेंट कन्फर्मेशन आलं, गाडीतून उतरलो -
आणि
जाता जाता
"मोदीनेही ये कॅशलेश किया है - एक और चान्स मिला तुझे गाली देने को...
आज तेरे ६ रुपये गये..." :-D  :-D
पंच मारुन रस्ता पकडला... काकांनाही बरोब्बर लागलं... त्या ड्रायव्हरला ओशाळल्याचं हसू आलं...!
...
पकाऊ सकाळ टर्नस् टू बदला फिलींग... हा हा हा लाईक रावण काइंड ऑफ...!

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved