House in Metro

मोठ्या शहरात (उदा. महाराष्ट्रात मुंबई, पुणे) भाड्याचं घर चांगलं की स्वत:चं ? हा एक प्रश्न समोर आला. आणि दुसरं म्हणजे गोरेगांवची एक बिल्डीँग पडल्यावर जमीनीचं खरेदीखत न केल्याने बिल्डरनं पुन्हा बांधून न देत हात वर केल्याची, आणि त्यामूळे अनेक कुटूंब उघड्यावर आल्याची एक बातमी वाचली... तसंच कॅम्पाकोला बद्दलही झालं होतं...
.
करायचं काय ?
यासाठी मी स्वत:चा एक ट्रॅक तयार केलाय.
पटतोय कां बघा.
.
आधी
प्रश्नाच्या पहिल्या भागाचा विचार करु... भाड्याचं घर हवं की स्वत:चं ? तर याबद्दल माझं मत आहे... प्रॅक्टीकली भाड्याचं, इमोशनली स्वत:चं...!
.
स्वत:चं घर घेतांना शक्यतोवर संपुर्ण रक्कम (किमान ८० टक्के तरी) तयार असली तरंच स्वत:चं घर घेण्याचा विचार करा... किँवा फार फार तर ईएमआय आपल्याला खरंच झेपेल असा असेल तरंच... ! ते सुद्धा वेळ आल्यानंतर. योग्य पद्धतीने.
(याच लेखात दिलंय ते)
.
भाड्याच्या घराचे काही टेँशन्स नसतात... आणि महत्वाचं म्हणजे ते हवं तेव्हा बदलता येतं. आपल्या सोयीने त्यात आधीक ऐमिनिटीज् अॅड करता येतात. शहरात आल्यानंतर किमान काही वर्ष सेट होईपर्यँत तरी शहाण्याने स्वत:चा फ्लॅट घेण्याचा विचार करु नये. एकदा सेट झालं, म्हणजे आपलं ऑफीस, मुलांच्या शाळा की स्वत:च्या घराचा विचार करावा. तोपर्यँत ईएमआयचा पैसा वाचवत ठोस रक्कम हाताशी तयार करुन ठेवावी...
.
स्वत:चं घर घेतांना -
शक्यतोवर फ्लॅट टाळावा आणि बखळ जमीन विकत घेण्याचा प्रयत्न करावा. गोरेगांवला जे झालं ते यामुळे टाळता येतं. जमीन विकत घेतली की अगदी १००० स्के. फू. मध्ये सुद्धा पॉश बंगला उभा राहतो. तो सुद्धा जमीनीसह आपल्या स्वत:च्या मालकीचा.
.
जमीन मुंबईत अंधेरी, गोरेगावला, किँवा पुण्यात शनीवार सदाशीव पेठेत, कोथरुडला तितक्या परवडणाऱ्‍या किमतीत भले मिळणार नाही -
पण मुंबईच्या जवळ विरार, नायगांव, कर्जत, उरण, टिटवाळा, पनवेल-रसायनी अश्या थोड्या बाहेरच्या भागात मिळतेच... पुण्यातही नऱ्‍हे, फुरसूंगी, तळेगांव, वाघोली, सातारा रोड अश्या थोड्या बाहेरच्या भागात ओपन प्लॉटस मिळतात. ज्यांची शहराच्या मुख्य भागाशी रेल्वे, रोड यांने चांगली कनेक्टीविटी असते. पुढच्या पाच ते दहा वर्षात ते चांगले डेव्हलप होतील. त्यामुळे असे प्लॉटस घेणं आणि आर्थिक नियोजन करुन तिथे घर बांधणं कधीही उत्तम. भविष्यात त्याचे चांगले रिटर्नसही मिळतात.
.
याचं ढोबळ गणित बघा.
समचा तुमचं एक महिन्याचं उत्पन्न आहे एक लाख रुपये...
मुंबईत राहण्याचं नियोजन आहे -
आपण दहा वर्षाँचा हिशोब धरु.
सध्या अंधेरीत घर विकत घ्यायचंय तर वन बीएचके मिळतो जवळपास दिड कोटीच्या आसपास.
समजा तुम्ही पन्नास लाख रुपये मॅनेज करुन भरले आणि एक कोटीचं कर्ज घेतलं, तर त्याचं ईएमआय कमीतकमी लाखाच्या जवळपास किँवा त्यापेक्षा जास्त जातं... आणि ते भरत तुम्ही आडवे होतात. ताण येतो. त्यात वीस वर्षात बिल्डीँग जुनी होते... म्हणजे आपलं घर आपलं होत जुनं होतं... हे म्हणजे पंचवीशीत प्रेमात पडलात, प्रेमाची कबूली, घरच्यांशी बोलणं, करीयर, आज उद्या करत ओढून ताणून पंधरा वर्षाँनी लग्न होतं, तोपर्यँत गर्लफ्रेँड चाळीशीची हाफ-म्हातारी दिसायला लागते.
हेच जर तुम्ही भाड्याचं घर बघताय, तर अंधेरीत तेच घर फार फार वीस हजारात मिळतं. वर्षभराचे दोन लाख - दहा वर्षाँचे वीस लाख.
वाचले किती ? कमीतकमी एक कोटी तीस लाख... त्यापेक्षा जास्त... शिवाय फायदे अनेक : आपल्या गरजेनूसार घर बदलू शकतात, आहे त्यापेक्षा जास्त मोठं घेवू शकतात.
.
आता हाच वाचलेला पैसा तुम्ही दोन प्रकारे वापरु शकतात.
.
एक - फ्लॅटच घ्यायचाय तर तो थोडा बाहेरच्या भागात घ्या. उदा. विरार : वन बी एच के मॅक्स ३५ लाख, पुण्यात नऱ्‍हे : २५ लाख. घर तर घर होतं, कमी पैशात काम होतं. आजच्या आज राहता येतं... एक कोटीच्या आसपास पैसा वाचतो. शिवाय शांतता असते. किमान दहा वर्ष असणार.
.
किँवा दोन -
प्लॉट करता वापरा.
थोडा बाहेरच्या भागात -
समजा १० लाखात १००० स्केफू प्लॉट मिळाला. तो घेतला.
त्यावर २० लाखात आपल्याला हवा तसा बंगला उभा केला...
म्हणजे आपलं घर जमीनीसह पुर्ण मालकीचं उभं राहीलं खुप जास्त झालं तर ४० लाखात.
.
त्यातून उरलेल्या पैशात आपण आपल्या नेटीव्हला प्लॉटस् घेवू शकतो... सेकंड होम करु शकतो. तिथे ऐन न चैन आयुष्याची संध्याकाळ घालवता येते.
.
पुढच्या १० वर्षात त्या एरीयाची होणारी डेव्हलपमेँट विचारात घ्या. तुम्ही जर फ्लॅट रिसेल कराल तर त्याची किँमत, आणि स्वत:च्या जमीनीची किँमत !
खूप फरक दिसेल...
.
वीस-पंचवीस वर्षाँपूर्वी अंधेरी गोरेगांव, मिरारोड, भाईँदर, पुण्यातलं कोथरुड, धनकवडी वगैरे भाग बाहेरचे समजले जायचे. त्यावेळी मुंबईल्या लोकांनी ग्रांटरोड, शिवाजीपार्क वगैरे आणि पुण्यातल्या लोकांनी पेठेत फ्लॅटचा मोह सोडून या बाहेरच्या भागात बखळ जमीनी घेतल्या आणि आज त्याचा बक्कळ पैसा झालाय. पुणे-मुंबई दूर, नाशिकचं बघा. पाथर्डी फाटा, आडगांव, किँवा त्र्यंबकेश्वर रोड चा परीसर असाच आत्ता पाच दहा वर्षातच खूप डेव्हलप झालाय. मला आठवतंय, आम्ही पाथर्डी फाट्याला घर घेतलं तेव्हा तिथे रस्ते धड नव्हते, पाच लाखात दोन हजार स्के.फू प्लॉट मिळायचे. आज तो भाग नाशिकचा टॉप रेटेड भाग आहे.
.
भाड्याचं घर असलं तरीही घर म्हणजे घर असतं... घर घेतांना पुढच्या दहा वर्षाँचा विचार करायचा. पैशांचं योग्य नियोजन करायचं... आणि योग्य वेळेसाठी योग्य रिटर्नसची सोय करुन ठेवायची. करीयर आपल्याला कदाचित वेगवेगळ्या शहरांतही फिरवेल. त्यावेळी अडकल्याची भावना होणार नाही...
अर्थात, हे माझं वैयक्तीक नियोजन आहे... पटावं असा आग्रह नाही...!
.
- तेजस कुळकर्णी

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved