वरची रेषा मोठी करण्यासाठी खालची रेषा लहान काढावी लागते

एखाद्या गोष्टीचा कंटाळा आला असेल किँवा निवड करण्यात गडबड होत असेल तर साधं आणि सोप्पं काम करावं -
त्यापेक्षा वाह्यात गोष्टीचा अनूभव घ्यावा... मी अनेकदा असं ट्राय केलंय...
.
बायकोला गोरेगांवला आवडत नव्हतं. काही ना काही कमी वाटायचं... माझं ऑफीस अंधेरीत, आणि आधीपासून सवय वेस्टर्नची आहे त्यामूळे मी शक्यतोवर वेस्टर्नलाच राहण्याचा ट्राय करतो... मागचा पुर्ण आठवडा तिला फिरवलं... नालासोपारा, वसई रोड, विरार पर्यँत. सेँट्रल लाईनला उल्हासनगर, बदलापूर वगैरे, नवी मुंबईत पनवेल पर्यँत... आता गोरेगांव आमच्यासाठी स्वर्ग झालंय 
.
मी स्वत: पुणे की मुंबई अश्या निवडीत अडकलो होतो. तेव्हा एकीकडे मुंबईतल्या इंडस्ट्रीचे फोटो लावले आणि दुसरीकडे पुण्यातल्या मंडईचे... मला तिथली टिपीकल कचकच आवडत नाही. त्यामूळे मुंबईची निवड मला सहज वाटली.
.
करंट अकाऊंट महाराष्ट्र बॅँकेत उघडावं की नको याच्या विचारात होतो. मी एक दोनदा एसबीआय जावून आलो. आता महाराष्ट्र बॅँकेत अकाऊंट आहे.
.
गाडी घेवून ऑफीसला जायचं नाही... बाईकवर मस्त वाटतं. .. मनात फूटबॉल सुरु होतं... त्यामूळे रोजच्या ट्रॅकवर मुद्दाम ट्राफीकच्या वेळेला गेलो, पार्कीँगमध्ये पाणी भरलेलं पाहीलं... आणि मेकॅनिकच्या दारी ताटकळत बसलेली लोकंही पाहीली. गाडी फक्त बाहेरगावी जातांना - जवळच्या जवळ बाईक किँवा कॅबच...!
.
लोकलचं, मेट्रोचंही तसंच !
मला आवडतं लोकल ट्रेन, मेट्रोनं फिरायला. बायकोचा संताप व्हायचा... माझं मन लोकल किँवा मेट्रोवरुन उडणार तोच पॉईँट मिळाला -
पुण्यात कुठे आहे लोकल ? इथे आहे तर वापरो ! असंही अंधेरी-गोरेगांव फार अंतर कुठाय ?
आता महीन्यातून एकदा आम्ही फक्त वसईच्या खाडीवरुन जाणं आवडतं म्हणून गोरेगांव टू विरार रिटर्न असा चक्कर मारतो...
.
वरची रेषा मोठी करण्यासाठी खालची रेषा लहान काढावी लागते...
इतकंच !

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved