Test Cricket Anniversary
क्रिकेटची पहिली टेस्ट मॅच १५ ते १९ मार्च १८७७ दरम्यान मेलबर्नला इंग्लंड वि. ऑस्ट्रेलिया खेळवण्यात आली होती... टेस्ट क्रिकेटचा आज विशयूहॅपीबड्डे.
..
पाच दिवस, ४० विकेट... लाल रंगाचा टणक सिजन बॉल आणि पांढरी जर्सी... !
घाम फोडणाऱ्या या फॉरमॅटमध्ये अनेक खेळाडू घडले...
खेळपट्टीवर टिकून राहणं, डिफेन्स मोड मध्ये विकेट टिकवणं किंवा अचुक टप्पा साधुन / फिरवून विकेट घेणं हे तंत्र आहे... ते बघणंही तितकंच नजाकतीचं... !
क्रिकेट हा तंत्रशुद्ध खेळ आहे हे टेस्टमध्येच दिसतं...
..
पूर्वीचं क्रिकेट बॅलेन्स्ड होतं... बॉलर्सची पिसं निघतील असा बॅटींग ओरीएंटेड फॉरमॅट नव्हता. त्यामुळे ५ दिवसाच्या मॅच निकाल देवून जायच्या ! ... कधीतरी शतक व्हायचं... कधीतरी ५ विकेट... ! साधं नव्हतं ते ! प्रचंड दडपण खेळण्यात मजा आणायचे... त्यातूनच खेळाडू घडले ! ब्रॅडमन टू झहीर खान... फेरवेट लोक्स फक्त टेस्टमध्येच बघतो... !
..
पहिली टेस्ट ऑस्ट्रेलियाने ४५ रन्सनी जिंकली...
टेस्टचा शंभरावा वर्धापनदिन त्याच मैदानावर खेळला गेला - तो इंग्लंडनं ४५ रन्सने जिंकला... ! सध्या भारतीय क्रिकेट टिम प्रथम स्थानी आहे...!
..
वनडे - टि2O युगातही टेस्ट ऑलवेज बेस्ट !
जोपर्यंत टेस्ट आहे, क्रिकेटला मरण नाही !
..