कॅप्टन कूल

आज एका माणसाची महत्वाच्या क्षणी निर्णायक संयम भूमिका राहिली.
सभापती, उपराष्ट्रपती वैकय्या नायडूजी !
.
आज दुपारच्या सत्रात सभागृहात आल्यानंतरही त्यांनी आपण या महत्वाच्या विषयावर असलेल्या चर्चेत समोर नसण्याबद्दल खेद व्यक्त केला... जबाबदारी याला म्हणतात... केवळ संचालन करणं एवढंच नसून प्रत्येक सदस्याच्या आधिकाराचा मान ठेवत, शब्द न शब्द ऐकून त्यावर नियंत्रण ठेवणंही महत्वाचं असतं... कुठे महत्व द्यायचं कुठे नाही - यावर ते पक्षपात न करता निर्णय देतात. सिब्बलने काहीतरी पुड्या सोडल्यानंतर उजवीकडच्या सदस्यांनी गोँधळ घालायला सुरुवात केली. त्याला महत्व न देता - "दो मिनट मे संविधात बदल नही जायेगा, मै यहॉँपे बैठा हूँ... क्या रिकॉर्ड मे जायेगा ये मै देख रहा" म्हणत प्रकरण शांत तर केलं, पण एकाच वाक्यात सिब्बलची हवा सोडली... !
.
खमका मॉनीटर असला तर वर्ग ठिकाणावर राहतो. सकाळी गोँधळ सुरु झाला, त्यात मुर्दाबादच्या घोषणा, रडणं यांतही खमकेपणे सभापतीँनी एक बाजू लावून धरली. पीपीडीच्या दोघांनी कपडे फाडल्यानंतर त्यांना उचलून बाहेर फेकलं... !
.
रेणूका चौधरी हसल्यानंतर याच माणसानं कडक शब्दा खडसावलं होतं... आजही जयराम रमेश, प्रो. राजू वगैरे मंडळीँना तोँडावर चार गोष्टी ऐकवल्या. अगदी डिवीजन वोटीँग मशीनमध्ये गडगड झाल्यानंतर त्यांना सल्ले देणाऱ्‍यांना "मै अपने रुम मे बैठने वाला. वहाँ आके मुझे लेक्चर देना... मै प्रॅक्टीसमे लाऊंगा..." म्हणत फटके दिले... सगळ्यात भारी म्हणजे पुढे पुढे करणाऱ्‍या जयराम रमेशची उतरवली... रमेश रमेश धिस इज नॉट युअर बिजनेस टू कंट्रोल धीस हाऊस... आय एम सिटीँग हिअर... सिट डाऊन !...
.
खासदार म्हणून ते ग्रेट आहेतच, उपराष्ट्रपती, सभापती म्हणून ते ग्रेटेस्ट आहेत. बाहेरच्या देशांनी जर भारताच्या लोकसभेचं/राज्यसभेचं कामकाज पाहीलं तर अशी रत्न आपल्याकडे कां नाही म्हणत त्यांना जेलेसी होत असेल. !
मोदीँनी देशाच्या सर्वोच्च पदांवर एक से एक रत्न बसवलीय... मोदी, शहा, राष्ट्रपती कोविँद, उपराष्ट्रपती नायडू, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला...! प्रचंड विद्वानांची टिम आहे ही.
.
नायडू म्हणजे कॅप्टन कूल आहेत.

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved