Corona Go... Go Corona...

माझ्या काही सवयी आत्ता कोरोनाला माझ्यापासून दुर ठेवण्यात कामी येतील असं दिसतंय... काही गोष्टी वजन कमी करणं, सुटलेलं पोट कमी करणं, गाण्याच्या परिक्षांच्या भितीने आवाज ठिकाणावर ठेवणं यासाठी केल्या. आणि काही गोष्टी ऑरा, जोतिष्य वगैरे सल्ले घेवून सुरु केल्या ज्या करणं आता सवयींचा भाग आहे... त्याचे रिजल्टस मी चेक केले नाहीत, पण फायदा नक्कीच झालाय...  (कुठलंही नुकसान झालं नाही...) एकप्रकारे स्वतःसाठी प्रोटेक्शन तयार झालंय...
तुम्ही वापरुन बघा... झाला तर फायदाच होईल. नुकसान होणार नाही. ... कोरोनाची भिती ५० टक्के तरी टळेल...
...
१. भिमसेनी कापूरचा वापर :
कुणीतरी सल्ला दिला, भिमसेनी कापूर रोज घरी आणि ऑफिसमध्ये जाळला की नकारात्मकता निघून जाते... वातावरण शुद्ध होतं... बायकोने लगेच अंमजबजावणी केली... एक किलो भिमसेनी कापूर आणला, प्लास्टिकच्या डब्यात भरला, आणि रोज संध्याकाळी एक तुकडा जाळणं सुरु केलं...! याचा आकार कापरासारखा स्क्वेअर किंवा गोल वगैरे नसतो... शेपलेस असतो. साधा कापूर बहूतेक सातशे-आठशे किलो मिळतो, तर हा दोन हजार रुपये किलो... ! एकदम स्ट्राँग... डब्बा उघडला की त्याचा वास पुर्ण घरात पसरतो...! जाळल्यानंतरही बराच वेळ वास राहतो... ! 
त्याचे आध्यात्मिक परिणाम काय झाले हा वेगळ्या चर्चेचा विषय आहे... पण स्वच्छता मात्र जबरदस्त झाली...! कापूर हा पदार्थ मूळात क्रेझ देणारा आहे... अलग स्वॅग असलेला ! त्यात हा स्ट्राँग कापूर... ! नॅचरोपॅथी एक्सपर्ट असलेल्या माझ्या बायकोने त्यावर तगडं रिसर्च केलं आणि तो कुठल्या कुठल्या औषधांत वापरतात, कापूर आणि गायीचं तूप यांचं विक्स कसं बनवतात हे शोधलं.
 दर चार-पाच दिवसाला थोडा थोडा कापूर अंघोळीच्या पाण्यात टाकण्याची ऑर्डर आली... थोडं थोडं करत बऱ्याच सवयी त्या कापराने व्यापल्या... !
थोडासा कापूर पाण्यात टाकून अंघोळ केली की दिवसभर फ्रेश वाटतं... स्किन Disease होत नाहीत... केसांसाठी स्पेशल कंडीशनर वापरायची गरज नाही.
घरात जाळला की शांत वाटतं हे एक, पण महत्वाचा बदल म्हणजे घरातून डास आणि माश्या तडीपार झाल्यात... यासाठी जी रोज झाडपूस करायला जी मावशी येते तिला पाण्यात खड्यांचं मिठ आणि थोडा कापूर टाकायचे ऑर्डर्स आहेत... त्यानेच पुसायचं.
आम्ही इन्हेलर्स आणि विक्स जेली फेकुन तूप-कापूर यांचं मिक्स वापरतो, तसं नेहमी नेहमी होणारी सर्दी गायब झालीय...!
तसंच निलगीरीचं तेलही कामाचं आहे...! विक्स - इनेलर पेक्षा परवडतं.
कापूर खूप इफेक्टीव आहे...!
..
२. गरम पाणी : रोज सकाळी उठल्याबरोबर चहाच्या आधी ग्लासभर गरम पाणी पितो... ते सुद्धा एकदम न पिता खुर्चीवर बसून घोट घोट...! ही सवय बहूतेक पोट कमी करण्याच्या धडपडीत लागली... पोट कमी झालं नाही, पण कफ -सर्दीचं प्रमाण खुप कमी झालं.
..
३. दुध-हळद : विशारद प्रथमच्या ऐन परिक्षेवेळी गळा बिघडला त्यावेळी मातोश्रींनी हे अमृत दिलेलं... ! हळद जंतूनाशक असते... रोज रात्री एक कप दूध आणि त्यात हळह एवढंच घ्यायचं... आधी आवडणार नाही - उलटून येईल, पण एकदा टेस्ट बसली की झालं... ! स्कीन प्रॉब्लेम्स, कफ प्रॉब्लेम्स दूर राहतील...
...
४. निसर्गोपचारांचा वापर : निसर्गोपचार म्हणजे आयुर्वेद, योगा, रस, रंग, मृदा, श्रद्धा, क्षार, फुलं, एक्यूप्रेशर, चुंबक वगैरे पद्धतींचा वापर... आमचे सासरेबुवा अश्या २१ पॅथीज् मध्ये प्रॅक्टीस करतात...! काहीही झालं तरीही त्यांच्याकडून औषध मिळतं... किंवा ते सजेस्ट करतात... योग्य रितीत योग्य मापात घेतलं तर गोळ्या-भस्म वगैरे एलोपॅथीप्रमाणे फास्ट रिजल्टस देतात... निसर्गोपचार आपली एम्यूनिटी पॉवर कमकुवत होवू देत नाही... - उलट यातील नैसर्गिक घटक ते वाढवतात... ! 
अनूभव सांगतो - एचबी वाढवण्यासाठी प्रेगनंसीमध्ये तेजूला गायनॅकनी गोळ्या लिहून दिल्या... त्या गोळ्या घेतल्यावर तिला चक्कर यायचे, उलटी व्हायची... महिनाभरात ८ चं एचबी ८ वरच राहीलं... जे बहूतेक ११-१२ हवं होतं... आम्ही खजूर, बीटचं ज्यूस सुरु केलं... महिनाभरात कुठलाही त्रास न होता एचबीत व्यवस्थित वाढ दिसली...! 
अगदिच आवश्यक आहे तरच ऐलोपॅथी वापरायची, अथवा निसर्गोपचारच बेस्ट !
एम्यूनिटी पॉवर आजार फिरकू देत नाहीत.
..
५. घरात प्रत्येकाचा साबण, पेस्ट वेगळं आहे आणि बाहेरुन आल्यावर हात पाय स्वच्छ धुवूनच आम्ही घरात येतो... सवयच लावलीय तशी... ! डेटॉलचं हॅन्डवॉश प्रत्येक बेसिनजवळ ठेवलंय, आणि प्रत्येकालाच काहीही काम केल्यावर स्वच्छ हात धुवावेच लागतात... त्यासाठी टॉवेल वगैरे पण चुकूनही एकमेकांचे वापरत नाही... ! दुसरं म्हणजे चप्पल बूटही बाहेर... आणि पावसाळ्यात अपवाद वगळता रोजचे कपडे जरी वॉशिंग मशीनच्या ड्रायरमधून काढले तरीही पुर्णपणे कडक सुर्यप्रकाशातच वाळवले जातात.... मी दोन रुमाल वापरतो. एक शिंक आली तर नाकासमोर धरायला, आणि एक रेग्यूलर... जो नाकासमोर धरतो त्यावर थोडं निलगिरीचं तेल टाकलेलं असतं.
...
आजपर्यंत जी माहिती समोर आलीय त्यात
स्वच्छता ठेवणं आणि एम्यूनिटी पॉवर वाढवणं हेच केवळ कोरोनाला पळवू शकतात...!
एखादा खर्च कमी करुन कापूर, निलगीरी तेल, हॅन्डवॉश, स्वच्छ रुमाल, साबण यांवर यथेच्छ खर्च करावा... 
आपल्यासाठीच असतं ते.
...
भारतात एक से एक उपाय आहेत जे चीनकडे नसतील... ! कोरोनाने भारताशी पंगा घेतलाय.
...
कोरोना पूर्ण बरा होतो...!
गो कोरोना... गो कोरोना ... कोरोना गो.... गो कोरोना... :-D 
-
तेजस कुळकर्णी

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved