तंद्री
माझं अडीच महिन्याचं लेकरू अख्खा दिवस-रात्र गाजवतंय... झोपता झोपत नाही... मी पंधरा दिवसातून दोन-तीन दिवस तिथे जातो - पण माझी बायडी त्याच्या सेवेत २४ तास असते... तो मोठ्या मुष्कीलीने झोपतो, आणि झोपला तेवढ्याच वेळात तिला जेवण वैगेरे आवरावं लागतं...
त्यातही तो उठून उठून रडतो, तर सगळं सोडून त्याच्याभोवती रहावं लागतं.
दोघांच्याही डोक्यात तोच तो राहतो...
...
आत्ताची गोष्ट -
मोठ्या मुष्कीलीने तो झोपला,
तिने मला फोन केला -
मी - झोपला का ?
ती - हो.. हुश्श... आत्ताच झोपला...!
मी - (मी Naturally एकदम हळू आवाजात बोलायला लागलो...) हा बोल मग... काय करतेय ?
ती - तू का इतक्या हळू आवाजात बोलतोय पण ?
मी - तो झोपलाय तर उठेल ना परत...
ती - आहो... तू फोन वर आहेस तर कसा आवाज जाईल ? झोपेत ए का तू ?
...
बाळाच्या नादात काय काय होतंय.... तंद्रीत तंद्रीत राहतोय आम्ही दोघंही.