Posts

BJP 38th Anniversary

Image
भाजपा १९५१ मध्ये हिंदूत्व विचारधारेच्या जनसंघाची श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी स्थापना केली. १९७७ मध्ये भारतीय इतिहासाचा काळा कालखंड आणीबाणी संपल्यानंतर झालेल्या निवडणूकांत जनसंघाला कॉंग्रेसला हरवण्यात यश मिळालं, इंदिरा गांधींना मोठ्ठा धक्का बसला. आणि ६ एप्रिल १९८० रोजी जनसंघासह सहविचारी पक्षांचं एकत्रीकरण होवून वाजपेयींनी भारतीय जनता पक्ष स्थापन झाला... भारतीय राजकारणाचा आणि उत्कर्षाचा सुर्योदय म्हणावा असा दिवस. .. हिंदुत्ववादी विचारधारा, राष्ट्र-हिंदूत्व-तत्व यांवर एकनिष्ठ असणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांची फळी आणि रा. स्व. संघाचा पाया यावर भाजपाची वाटचाल सुरु झाली... सुरुवात तशी अडखळत झाली. १९८४ लोकसभेला फक्त २ सिटस् आले... नरेंद्र मोदींनी एका कार्यक्रमात किस्सा सांगितला... तेव्हा उभ्या उमेदवारांपैकी ४ लोकांचं डिपॉजिट वाचलं हेच मोठ्ठं यश समजून त्यांनी सेलिब्रेट केलं होतं... १९९८ मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकार स्थापन झालं, ते वर्षभर चाललं - परत निवडणूका होवून पुर्ण बहुमतात सरकार आलं. त्या सरकारने कार्यकाळ पुर्ण केला... ! २००४ ते २०१४ या काळात वनवास भोगल्यानं

Angry Cab Driver and Salmaan Khan

वर्षभरापूर्वी दिवाळी/ईद/सलमानची केस हिअरींग असं काहीतरी होतं, काय ते नेमकं आठवत नाही, पण मुंबईत सलमान खानच्या गॅलक्सी समोर गर्दी होती... इतकी मरणाची गर्दी की तिथून गाड्या वगैरे निघणंही शक्य होत नव्हतं... बाऊन्सर्स, पोलीस तैनात होते...  मी कॅबमध्ये होतो... गर्दीला वैतागल्याने कॅब ड्रायव्हरच्या तोंडाचा पट्टा सुरु झाला... बोंबलतच तो गर्दीत गाडी घुसवत होता... कामधंदा छोडके ये xx चले आते है बुढ्ढेको देखने... येडेकी पूँछ वगैरे शाब्दिक पाऊस पाडत होता, तेवढ्यात गॅलक्सीचं गेट उघडून (मे बी) सलमानखानची गाडी बाहेर आली, गर्दी एकदम एक्टीव्ह झाली आणि त्या धुंदीत पळणारे दोन पोरं एकदम आमच्या गाडीसमोर आले.. ड्रायवरने अर्जंट ब्रेक लावून गाडी थांबवली... आणि, xके, मरना है क्या नीचे आके ? मै शर्ट निकालता हूँ मुझे देख मुँह फाडके, उस बुढेको देखता है तो - म्हणत घाण शिव्या घालतच गाडी काढली... ..तिथून ड्रॉपपॉइंट येईपर्यंत पाऊणतास त्या ड्रायव्हरने सलमान, शाहरुक, तैमूरपिता, नुकताच सुटून आलेला संजय दत्त यांना तोंडाला येतील त्या शिव्या घातल्या... त्या संतापाचा गाभा होता.. "कमीने देश को खुद के बापका माल स

व्यवसायातले नग 2

कॉलेजमध्ये असतांना एक फुल्ल टू राजकारणात घुसलेलं पोरगं होतं... अभ्यासात मध्यमवर्गीय म्हणावा असा,  प्रत्येक इयर ला एक-दोन वर्ष आराम केलेला... पण एका प्रादेशिक पक्षाचा युवा सरचिटणीस वगैरे. ''साहेबांसोबतचे" फोटो मोठ्या दिमाखात दाखवायचा... त्याला java चा साधा अॅडीशनचा प्रोग्राम जमला नाही, फायनल इयर viva ला exception handling च्या सोप्प्या प्रश्नावर बोंब पाडून आल्यावर बाहेर येवून टोळभैरव जमवून नरेंद्र मोदी या देशाचं कसं वाटोळं करू शकतात यावर त्याने तासभर लेक्चर दिलेलं... त्याला सगळे सोयीनुसार गमतीने-उपहासाने-आदराने भावी आमदार म्हणायचे... आणि आपलं राजकारणात सेट आहे समजून तो नेत्याच्या मागे पुढे असायचा, आंदोलनं - बंद - गाड्या फोडणं वगैरे उत्साहात करायचा... अगदीच जोश चढला तर या बामणांनी भटांनी देशाची वाट लावली म्हणत हिंडायचा... .. पुढे कॉलेज संपलं, प्रत्येक जण आपापल्या वाटेने गेला... आणि तो भावी आमदार विस्मृतीत गेला... .. काल संध्याकाळी कुठूनतरी नं मिळवून त्याने कॉल केला ... नांव ऐकून... "बोला आमदार"... पण यावेळी एक दिर्घ हम्म्म्म शिवाय काहीच नव्हतं... तेजा, तुझ्

data theft

सावधान... वादळ घोंघावतंय! डोळे खाडकन उघडणारा लेख... फॉरवर्ड होत होत आलाय, वाचा आणि "वाचा"... ! ... कॅलिफोर्नियातील 'आय.टी.संपन्न' बे एरियात राहणारा भारतीय परिवार. चक्क मराठी. बाई स्वत: डॉक्टर आणि हा तिथल्या एका मोठया आय.टी. कंपनीत व्हाइस प्रेसिडेंट. घरी ही दोघं आणि यांची सोळा वर्षांची मुलगी. बस, इतकंच त्रिकोणी कुटुंब. साधारण वर्षभरापूर्वी हा रागारागाने शेजारच्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये भांडायला गेला. तिथल्या मॅनेजरला भेटला आणि तावातावाने सांगू लागला, ''हा काय चावटपणा लावलाय..? माझ्या घरी रोज तुमचे फ्लायर्स (पत्रकं) येतात. कशाचे? तर प्रेग्नन्सी, डिलिव्हरी, बेबी केअर वगैरे विषयांवरच्या उत्पादनांचे. अरे, आमचा काय संबंध..? कशाला आम्हाला रोज रोज त्याच विषयांवरची फ्लायर्स पाठवून त्रास देताहात?'' मॅनेजर अनुभवी होता. त्याने याची समजूत घातली. चुकून झालं असेल असं म्हणाला आणि ''परत असे फ्लायर्स तुमच्या घरी येणार नाहीत'' असंही म्हणाला. विषय इथेच संपायला पाहिजे होता. पण ह्या घटनेच्या साधारण पाच-सहा महिन्यांनी हा त्याच शेजारच्या डिपार्टमेंटल

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved