Posts

Showing posts from 2019

व्यवसायिक प्रयोग

= व्यवसायिक प्रयोग = . २०१९ हे वर्ष टि.के. गृपला उत्तम व्यवसायिक अनुभव देणारं ठरलं... आमचे काही प्रयोग प्रचंड यशस्वी ठरले. आणि ज्यातून गेल्या कॅलेंडर वर्षीच्या तुलनेत कंपनीची वाढ आणि फायदा अपेक्षेपेक्षा जास्त दिसतोय... ते प्रयोग कंपनीच्या पहिल्या पाच वर्षात धाडस ठरावं असं होतं. कंसेप्ट माझ्या बायकोनी दिली... आधी धाकधूक होती - पण आता जेव्हा आम्ही Analysis केलं तेव्हा त्यातलं यश स्पष्ट दिसतंय. .. प्रयोग १ : MoU - TieUp आमचे प्रमुख ४ डोमेन्स आहेत. Technology (Software), Consultancy and HR, Education (School) and Media (Production)... आम्ही या वर्षी Individual Expansion सह MoU and TieUp किंवा Joint Expansion चा प्रयोग केला. म्हणजे कसं ? - तर, ज्या कंपनी किंवा स्टार्टअप गृप्स समव्यवसायात आहेत त्यांना आम्ही आमंत्रित केलं. आणि त्यांच्याशी MoU करुन जॉइंट प्रोजेक्टस् सुरू केले. जे स्टार्टअप होते त्यांना आमचा फायदा झाला, त्यांच्या Innovation and Skill Set चा आम्हाला फायदा झाला...! मुंबईत ३, पुण्यात ४ आणि नाशिकमध्ये १ असं Association झालं...! आम्ही Individual Asset म्हणून आहो

Dr. Shriram Lagoo

Image
डॉ. श्रीराम लागू यांच्या निधनानं मराठी अभिनयसृष्टीच्या नटसम्राटाची अखेर झाली. वरच्या फळीतले कदाचित  लागू एकमेव शेवटचे उरले होते, ते ही आज गेले. .. डॉ. श्रीराम लागू पर्व संपलं. आणि त्यांच्यासोबत कदाचित एक पिढीही संपली...! ... मन संकल्पना, भूतभविष्य, देव-दानव, श्रद्धा-अंधश्रद्धा यांना त्यांच्या जडवादाने नेहमीच विरोध केला. मृत्यूनंतर काहीही राहत नाही या त्यांच्याच सिद्धांताने त्यांना "श्रद्धांजली" म्हणणं योग्य ठरणार नाही. त्यांचं राजकीय-वैचारीक मत गोंधळलेलं होत, पण अभिनयातील त्यांच्या भव्य कारकिर्दीसाठी आदर...!

नगासी महानग

= व्यवसायातले नग = ... साधारण दहा महिन्यांपूर्वी फेबुवारीत एक महोदया अंधेरी ऑफीसला जॉईन झाली...! जावा प्रोफाईल, दोन वर्षांचा आधीचा अनुभव होता... टू पॉइंट फोरचं पॅकेज दिलं...! जॉईन केलं, ट्रेनिंग झालं एक महिना - मार्च महिन्यात सुरु झालेल्या एका प्रोजेक्टवर तिला घेतलं...! ... कुणालाही प्रोजेक्टवर घेतलं की मी जनरली प्रोजेक्ट ड्यूरेशनपर्यंतचं लॉक-इन अॅग्रिमेंट करुन घेतो... म्हणजे तो प्रोजेक्ट पुर्ण होईपर्यंत जॉब सोडता येणार नाही, आणि सोडायचाच असेल तर अॅग्रिमेंट ड्यूरेशनपर्यंतचं पुर्ण सीटीसी कंपनीत जमा केल्याशिवाय सोडू देत नाही... सिक्यूरिटीसाठी गरजेचं असतं ते ! अगदीच  Genuine कारणासाठी मात्र त्यात तडजोड होते. प्रोजेक्टवर असतांना सुट्टी हवी तरी किमान २ दिवस आधी लिडरला सांगून मॅनेज करायची पॉलीसी आहे...! त्यातही Genuine कारण असलं तर समजून-उमजून काम चालतं... (अडून बघत नाही.) ... तर, महोदयाने ऍग्रिमेंट साईन केलं, प्रोजेक्टवर जॉईन झाली, प्रोजेक्ट ड्यूरेशन होतं सात महिने. म्हणजे सप्टेंबर पर्यंत... ! काम सुरु झालं...! दोन महिने झाले... ! दरम्यान महोदयाने दोन महिन्यांची व्यवस्थित सॅलर

खोपा शिडीला टांगला...

खोपा शिडीला टांगला... 'टाटा मोटर्स'चा, म्हणजे पिंपरी आणि चिंचवडच्या कारखान्याचा परिसर मोठा निसर्गरम्य आहे. पिंपरी वाघिरे भागातला एकेकाळी ओसाड, माळरान, खडकाळ, ओबडधोबड, दगडगोट्यांनी आणि काटेरी झुडुपांनी व्यापलेला सुमारे अठराशे एकरांचा हा परिसर आता वड, पिंपळ, औदुंबर, कदंब, कांचन, पांगार, बहावा, टबुबिया, कँशिया, स्पँथोडिया, ग्लिरिसिडिया, जँकरेंडा, पेल्टाफोरम, बाँटलब्रश, निरगिरी इ. कितीतरी बहुगुणी आणि पर्यावरण समृद्ध करणाऱ्या वृक्षांची लागवड केल्याने आता नंदनवन झालाय. नानाविध पक्षांचा तिथे मुक्त संचार असतो. पिंपरीच्या कारखान्याच्या परिसरात तर चक्क एका वाघोबानेही काही काळ तिथे निवास केल्याचे ऐकले असेल! जगविख्यात पक्षिनिरीक्षक डाँ. सलीम अली सुद्धा इथे पक्षी पाहण्यासाठी आवर्जून येत असत कधी कधी. चिंचवडचा प्लँट म्हणजे पूर्वीची 'इन्व्हेस्टा मशीन टूल्स कंपनी.'  'टेल्को' कंपनीने ती  ताब्यात घेऊन तिथे आपली ' मशीन टूल डिव्हिजन' सुरू केली. कालांतराने फौंड्री, ए पी डी इ. विभाग सुरू केले. तर या चिंचवडच्या कारखान्यात, उत्तरेला 'स्टँडर्स बिल्डिंग' नावाची, इंग्रजी

CAB - NRC

CAB आणि NRC Amendment काल एक लोकसभेत पास झाले... एक होईल काही दिवसांत. .. हिंदू, पारसी, बौद्ध, जैन, शीख आणि ख्रिश्चन धर्मीय लोकांसाठी भारत आजपासून मातृतूल्य देश आहे. शेजारच्या देशांत कुठेही केवळ धार्मिक अल्पसंखंक्य या एका कंडीशनखाली जर अत्याचार होत असतील तर त्यांच्यासाठी "भारत" हे सन्मानाने जगण्याचं स्थान असेल. .. २०२० - २०२१ ला जनगणनेतून धार्मिक आधारावर जनगणनेचा खरा आकडा समोर येईल, आणि आपल्या डोळ्यावरची झापडं खाड्कन उघडतील. कोण अल्पसंख्यांक आहे, एकुण किती आहेत, आणि अधिकृत - अनधिकृत कोण राहतंय हे समोर येईल. यातून घुसखोरी, देशांतर्गत आतंकवाद, नक्षलवाद आणि बनावट मतदानातून होणारे प्रकार याला ब्रेक बसेल. घुसखोर समोर येतील. आणि त्यांचं मूळ शक्तीस्थान यातून तोडलं जाईल... ही अतिशयोक्ती वाटेल, पण खरे परिणाम पुढच्या ४-५ वर्षांत दिसायला लागतील ! .. ही दोन्ही बिल्स वेगवेगळी असली तरीही त्यांचं डेस्टीनेशन "समान नागरी कायदा" हेच असणार. त्याचीच तयारी मोदी सरकारने सुरु केलेली दिसतेय...! भारताच्या अंतर्गत बांधणीला मजबूत करणारा पुढच्या किमान २०० वर्षांसाठीचा पाया मोदी सर

गुरुचरीत्र

Image
गुरुचरीत्र ! ... नृसिंह सरस्वतींचे समकालीन शिष्य सिद्धमूनी, आणि  त्यांचे शिष्य नामधारक (जे नृसिंह सरस्वतींच्या दुसऱ्या समकालीन शिष्यांपैकी एक आहे, सायंदेव - यांचे वंशज) यांतील अद्भूत संवाद म्हणजे गुरुचरीत्र ! ... नामधारक शिष्य सिद्धांना गुरुंबद्दल विचारतात, आणि सिद्ध नृसिंह सरस्वतींचा अवतार, कार्य, त्यावेळी घडलेल्या घटना - ज्या सिद्धांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहीलेल्या असतात - त्या, एक एक करत सांगतात...! पुढे नामधारकांना गुरुचरीत्र लिहीण्याची आज्ञा करतात...! ... सिद्ध - नामधारक संवाद नामधारकांनी गुरुचरीत्राच्या ग्रंथरुपाने बावन्न अध्यायांत, आणि प्राकृत मराठी भाषेत सुरेख बांधलाय !... त्यात काही ठिकाणी संस्कृत, कानडी श्लोकही आहेत. मूळ गुरुचरीत्र ग्रंथ १७००० ते १९००० ओव्यांचा असल्याचं म्हणतात, आणि कालांतराने त्याचा सारांश येत सात हजार तिनशे पंच्याऐंशी ओव्यांचं गुरुचरीत्र आज प्रचलित आहे.  ... गुरुचरीत्रात पहील्या अध्यांयांत गुरुवंदना, अनुसया-अत्री ऋषींकडे दत्तजन्म, मग प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभांचे महिमान आहे. पण ते पहिल्या १० अध्यांयांतच. सिद्ध द्वितीय अवतार नृसिंह स

भगवद्गीता !

Image
आज गीता जयंती ...! .. भगवद्गीता... या अद्भूत ग्रंथाचा माझ्यावर प्रचंड प्रभाव आहे... माझ्या हॅन्ड बॅगमध्येच भगवद्गीतेचं मराठी - इंग्रजी अर्थासहीत असलेलं पुस्तक कायम असतं. रोज क्रमाने किमान ५ श्लोक आणि त्याचा अर्थ मराठी, इंग्रजीतून वाचण्याची, समजून घेण्याची सवय लागलीय, आणि आता सहा - सात वर्षांनी भगवद्गीतेने माझ्या मनावर आणि विचारांवर जबरदस्त पकड घेतल्याचंही जाणवतंय... प्रत्येक प्रश्नाचं उत्तर गीतेच्या अधीन राहूनच सापडणार हे मनावर पक्कं ठसलंय !  .. गीता म्हणजे कर्मकांड नाही, तर शास्त्रशुद्ध शास्त्र (Science) आहे... तुम्ही त्याचं पारायण करुन चमत्काराची अपेक्षा कराल तर हाती काहीच लागणार नाही, गीता समजण्याची - अभ्यासण्याची आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, आणि अंतिम सत्य शांतपणे समजावून देण्याची ताकद गीतेत आहे... गीतेतला प्रत्येक श्लोक दरवेळी नव्या अर्थासह समोर येतो... .. कृष्णाचं देवत्व कुठाय ? ते आहे भगवद्गीतेतल्या अठरा अध्यायात - सातशे श्लोकांत... ! कुरुक्षेत्रावर अर्जुनाला विश्वरुपदर्शन घडलं तिथेच "देव कृष्ण" जन्माला आला, भगवद्गीतेच्या रुपानं विश्वगुरु झाला आणि

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved