नगासी महानग

= व्यवसायातले नग =
...
साधारण दहा महिन्यांपूर्वी फेबुवारीत एक महोदया अंधेरी ऑफीसला जॉईन झाली...! जावा प्रोफाईल, दोन वर्षांचा आधीचा अनुभव होता... टू पॉइंट फोरचं पॅकेज दिलं...!
जॉईन केलं, ट्रेनिंग झालं एक महिना - मार्च महिन्यात सुरु झालेल्या एका प्रोजेक्टवर तिला घेतलं...!
...
कुणालाही प्रोजेक्टवर घेतलं की मी जनरली प्रोजेक्ट ड्यूरेशनपर्यंतचं लॉक-इन अॅग्रिमेंट करुन घेतो... म्हणजे तो प्रोजेक्ट पुर्ण होईपर्यंत जॉब सोडता येणार नाही, आणि सोडायचाच असेल तर अॅग्रिमेंट ड्यूरेशनपर्यंतचं पुर्ण सीटीसी कंपनीत जमा केल्याशिवाय सोडू देत नाही... सिक्यूरिटीसाठी गरजेचं असतं ते ! अगदीच  Genuine कारणासाठी मात्र त्यात तडजोड होते. प्रोजेक्टवर असतांना सुट्टी हवी तरी किमान २ दिवस आधी लिडरला सांगून मॅनेज करायची पॉलीसी आहे...!
त्यातही Genuine कारण असलं तर समजून-उमजून काम चालतं... (अडून बघत नाही.)
...
तर, महोदयाने ऍग्रिमेंट साईन केलं,
प्रोजेक्टवर जॉईन झाली,
प्रोजेक्ट ड्यूरेशन होतं सात महिने.
म्हणजे सप्टेंबर पर्यंत... !
काम सुरु झालं...!
दोन महिने झाले... !
दरम्यान महोदयाने दोन महिन्यांची व्यवस्थित सॅलरी घेतली  ....
आणि मे च्या सात-आठ तारखेला काहीही न सांगता गायब झाली...
...
एचआरने, प्रोजेक्ट लिडरनी कॉल्स केले,
रिस्पॉन्स नाही.
पाच वर्किंग दिवस Absent Without Notice चा रिमार्क बसला. -
कंपनी नियमानूसार ती सस्पेंड झाली.
आणि ऍग्रिमेंटनुसार सप्टेंबरपर्यंतचं पेमेंट कंपनीला देण्यासाठी बाध्य झाली...!
(त्याशिवाय आम्ही डॉक्यूमेंटस सोडत नाही, पुढच्या कंपनीत जायचे रस्ते बंद ! )
...
प्रोजेक्टला बॅकअप स्ट्रॅटेजी असल्याने लगेच रिसोर्सेस रिप्लेसमेंट होवून कंटिन्यू झालं...!
...
पुढच्या महिन्यात जूनच्या शेवटी तिचा एचआरला फोन आला - आणि Due to personal reason I can't continue चा मेसेज ! असंही तिला सस्पेंड केलेलं...! त्यामूळे ऑफीसकडून Formalities and dues करता नोटीसही गेलेली..!
दरम्यान "Genuine Reason असेल तर सोडून द्यायचंही ठरलं... ! कारण मुलगी म्हणलं की प्रेगनंसी, लग्न, घरचा मूड वगैरे येतं... तिथे समजून घ्यावं लागतं ...
आणि आम्ही तिचं प्रकरण सस्पेंडच ठेवलं...!
...
ती आली नाही,
जुलै ते नोव्हेंबर गेला...!
...
आणि ११ डिसेंबरला दुपारी प्रगटली...
आधी मीच ओळखलं नाही,
नंतर ट्रेस झालं.
एचआर आणि ती केबीनमध्ये आले. आणि तिने हातातला कागद समोर ठेवला...
Resignation and Salary demands...!
...
तिने मॉडेलिंग सुरु केलेलं, आणि त्यामूळे ती गायब झाली...
कागदावर होतं -
माझी मे ते नोव्हेंबरची सॅलरी देण्यात यावी, आणि डॉक्यूमेंटस परत मिळावे.
तिला पोर्टफोलीओचे पैसे भरायचे होते.
...
अर्थात ते अॅप्लीकेशन रिजेक्ट केलं ...
आणि एचआरनी तिच्या पत्यावर रजिस्टर केलेल्या नोटीसची कॉपी तिला दाखवली, आणि ती किती ड्यू आहे वगैरे सांगितली.
ते भरल्याशिवाय डॉक्यूमेंट्सची प्रोसेस होणार नाही हे ही सांगितलं...!
...
केबिनमध्ये तेव्हा एक महत्त्वाची मिटींग सुरु होती. त्यामूळे तिला जायला सांगितलं...
...
पंधरा मिनिटं गेली,
परत तणतणत आली...
शाब्दीक विवाद रंगला - आणि ती मुद्यावर आली ....
सर, मला ऍग्रिमेंटनुसार माझी सॅलरी पूर्ण मिळायला हवी, Else मी कोर्टात जाईल... केस करेल... पाचपट वसूल करेल... एग्रीमेंट आहे...
ये आया फुलटॉस...
"खु श्शा ल जा ''... उद्याच... !
(समोर कंपनीचा लिगल एडवाईजर सारंग बसलेला, त्याच्या लग्नाची पत्रिका द्यायला आलेला... Advantage. ...)
ती - बघा... मी खरंच जाईल... माझा भाऊ वकील आहे...
मी - हो... जा... तू साईन केलेल्या ऍग्रीमेंटची फोटोकॉपी, तुला पाठवलेल्या नोटीसची कॉपी वगैरे घेवून जा... सांग की कंपनी सॅलरी द्यायचं नाही म्हणतेय...!
मी दोन कॉपीज मागवल्या...
ती बावचळली...!
सारंग म्हणजे कंपनीचा लि.ए. आहे हे तिला आमच्या बोलण्यातून उमजलं...!
तिला देण्यापूर्वी एक कॉपी सारंगला दिली, आणि तिच्यासमोरच "करार मोडण्यासाठीचा दावा" ठोक म्हणून फटाका फोडला...
सारंगनेही बरोबर चक्रवलं.
तिची धाव कुंपणापर्यंतच हे तेव्हाच कळलेलं... त्यामूळे मी, एचआर पूजा आणि सारंग फुल्ल मज्जेत होतो...
...
ती तशीच तणफणत गेली...
...
परवापर्यंत तिच्या डोक्यात वकील भावाने प्रकाश टाकला असावा -
...
काल माझ्या मोबाईलवरच फोन आला...
"घालील लोटांगण - वंदीन चरणम्" रडत सुरात.
मला एक रुपयाही नकोय सर,
मी असं करायला नको होतं...
पण प्लीज माझ्यावर केस करु नका,
आणि मी इतके पैसे भरु शकत नाही... -
वगैरे वगैरे...
मी तिला "स्वतःहून करार मोडला, ऑफीसमध्ये गोंधळ घातला याबद्दल माफीनामा आणि कराराची देय रक्कम माफ करावी यासाठी विनंती" हे लिखित उद्या ऑफीसला मॅनेजरकडे आणि त्याची फोटोकॉपी मला मेलवर द्यायला सांगितलं...!
...
आज मी ऑफीसला नव्हतो, दुपारी मॅनेजरचा फोन आला, तीने लिहून आणल्याचा... ! मी चेक केलं...!
धडा शिकवल्याचा - सरळ केल्याचा आनंद चेहऱ्यावर उमटला...
आणि तिला चहा पाजून डॉक्यूमेंटस परत देण्यासाठी सांगितलं ... !
...
पुढे कधी कुठल्या कंपनीत जॉईन झाली तर त्या कंपनीच्या एचआरकडून आम्हाला व्हेरीफीकेशनसाठी विचारलं जाईल, त्यात १०० टक्के खरा फिडबॅक द्यावा लागतो... -
तो अर्थातच निगेटिव्ह असणार.
त्यामूळे करीयरबरोबर ती गेम खेळलीय हे नक्की.
...
पण,
ठकासी महाठक ...
नगासी महानग व्हावं...!
बाकी उगाच कुणाला त्रास देत नाही आपण !
...
नोट : कुठल्याच स्त्री Employee ला टिमलिडर, एचआर ( ते पण Female) यांच्याशिवाय केबिनमध्ये येवू देत नाही...! कितीही महत्वाच्या कामासाठी का असेना.
शिवाय केबीनमध्ये सीसीटिव्ही आहेत...!
कुणी काहीही उद्योग करायचं म्हणलं तरीही करू शकणार नाही.

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved