व्यवसायिक प्रयोग
= व्यवसायिक प्रयोग =
.
२०१९ हे वर्ष टि.के. गृपला उत्तम व्यवसायिक अनुभव देणारं ठरलं... आमचे काही प्रयोग प्रचंड यशस्वी ठरले. आणि ज्यातून गेल्या कॅलेंडर वर्षीच्या तुलनेत कंपनीची वाढ आणि फायदा अपेक्षेपेक्षा जास्त दिसतोय... ते प्रयोग कंपनीच्या पहिल्या पाच वर्षात धाडस ठरावं असं होतं. कंसेप्ट माझ्या बायकोनी दिली... आधी धाकधूक होती - पण आता जेव्हा आम्ही Analysis केलं तेव्हा त्यातलं यश स्पष्ट दिसतंय.
..
प्रयोग १ : MoU - TieUp
आमचे प्रमुख ४ डोमेन्स आहेत.
Technology (Software), Consultancy and HR, Education (School) and Media (Production)... आम्ही या वर्षी Individual Expansion सह MoU and TieUp किंवा Joint Expansion चा प्रयोग केला.
म्हणजे कसं ? -
तर, ज्या कंपनी किंवा स्टार्टअप गृप्स समव्यवसायात आहेत त्यांना आम्ही आमंत्रित केलं. आणि त्यांच्याशी MoU करुन जॉइंट प्रोजेक्टस् सुरू केले. जे स्टार्टअप होते त्यांना आमचा फायदा झाला, त्यांच्या Innovation and Skill Set चा आम्हाला फायदा झाला...!
मुंबईत ३, पुण्यात ४ आणि नाशिकमध्ये १ असं Association झालं...! आम्ही Individual Asset म्हणून आहोतच, पण यांसह एकुण ८ गृप्स - किंवा कंपनीत टिके गृपचे व्यवसायिक समभाग (Partnership) आहेत....! ते प्रोजेक्टस् आता टिके गृपचे अधिकृत प्रोजेक्टस् आहेत...! यात मुंबई आणि नवी मुंबईत यूकेचे दोन प्रोजेक्टस् आहेत...! .... त्याचबरोबर कंपनीचं Expansion तिन्ही शहरांत झालं... टिम वाढली...!
..
प्रयोग २ : Logical Investment
Consultancy and HR, Education (School) and Media (Production)... यासाठी जितकी गरज पैशांची असते तितकीच गरज प्रामाणिक प्रयत्नांची, Skills ची असते... आम्ही TKCS च्या २ (नवी मुंबई, पुणे) आणि Growing Stars School च्या २ (विरार, ठाणे) या ठिकाणी Logical Investment Basis वर Expansion केलं.
म्हणजे माझे मित्र - मैत्रीणी, काही परिचित ज्यांच्याकडे Administration Skills आहेत, पण Platform नाही, त्यांना 75-25 Formula ने सरळ Partnership देवून जास्तीत जास्त १ लाख मूल्य असलेले यूनिटस् सुरु केले. जिथे TK Group ने 75 टक्के भार उचलला... (जो स्थायी स्वरूपाचा आहे. म्हणजे Physical Assets, Platform, Technical Assets, Brands etc.) आणि २५ टक्के समोरच्या व्यक्तीने...! Administrative Skills, Efforts वापरून ते यूनिट वाढवणं ही जबाबदारी... थोडक्यात कंपनीचा तो हिस्सा काही टर्मस् समोर ठेवून वाढवायचा, क्लायंटस् - प्रोजेक्टस् मिळवायचे, पुर्ण करायचे...! त्या व्यक्तीचा समान मालकी हक्क राहतो... समजा यात त्या व्यक्तीने Agreement Continue करायचं नाही असं ठरवलं, तरी कंपनी त्या काळात त्या शहरात Expand झालेली असते... पुण्यात TKCS असंच वाढलं. एका मैत्रिणीसह कोथरुडला छोटसं यूनिट सुरु केलं, पुढे तिच्या वैयक्तीक कारणाने Agreement Windup करावं लागलं. पण ते यूनिट आजही वाढतं आहे... आता ते कल्याणी नगरला शिफ्ट केलं...!
यासाठी ओपन Invitation असतं...
(Agreement windup with mutual understanding असलं, आणि नंतर जर त्या व्यक्तीला परत काम करण्याची इच्छा झाली तर Always Welcome असतं.)
Growing Stars School चं सुद्धा तसंच केलंय !
दोघांनाही फायदा होतो...
कंपनीला : एक यूनिट मिळतं - Expansion होतं, Asset Investment असल्याने Low Risk असते, आणि जबाबदारी विभागली जाते.
समोरच्या व्यक्तीला काही टर्मसच्या अधीन राहून डिरेक्ट मालकी मिळते... व्यवसायाचा प्लॅटफॉर्म मिळतो ... ! वैयक्तीक मला माझी TK Family चांगल्या लोकांसह वाढत असल्याचं समाधान मिळतं...!
...
प्रयोग ३ : Employee as Partners
कोथरूड-पुणे TKCSचं उदाहरण वर दिलंय त्यात हा प्रयोग केलाय.
तिथे ७ ची टिम आहे, ज्यात अजून जास्तीत जास्त २ लोकांचं expansion होईल... मला मुंबईहून पुण्याला दर आठ दिवसाला येणं, आणि मॅनेज करणं तसं कठीण होत होतं. तेव्हा माझ्या बायकोनी हे लॉजीक दिलं...
७ च्या टिमला प्रत्येकी ५ टक्के समभाग दिला... एक वर्षाचं एग्रीमेंट केलं... आणि कंपनीचे Employees एक वर्षाकरता partners झाले... हा प्रयोग त्या लहान यूनिटकरता प्रचंड यशस्वी झालाय...
जितका प्रॉफीट कंपनीला, तितका फायदा Employeesला हे सूत्र लागू पडलंय... ! त्यात काउंटर कॅश नसल्याने त्या यूनिटचं सगळं Transparent आहे... आणि जास्तीत जास्त फायदा मिळण्यासाठी ती टिम जास्त काम, खर्च कमी हे आपोआप करतेय. सगळा खर्च जावून प्रत्येकाला पूर्वी ठरवलेल्या पगारापेक्षा दिडपट - कधी दुप्पट फायदा होतो. सगळे वेळेवर ऑफीसला येतात, स्वतःच प्रयत्न करतात... खर्च कमी करतात... प्रामाणिकपणे सांगायचं तर, Productivity पूर्वीपेक्षा वाढलीय...!
...
व्यवसाय क्षमता, प्रामाणिक प्रयत्नांची तयारी असणाऱ्यांना माझ्याकडे Always Welcome असतं... ! कंपनी म्हणून, Expansion होतं, टिम वाढते, कंपनी प्रोफाईल स्ट्राँग होते आणि आर्थिक फायदा अर्थातच होतो... !
समोरच्या व्यक्तीला उत्तम प्लॅटफॉर्म मिळतो...
कारण प्लॅटफॉर्मशिवाय कुणीही उभं राहू शकत नाही... !
...
दोन रुपयांतला एक रुपया खर्च करून एक रुपया एकटा खातांना कंपनी दोन रुपयांचीच राहते,
इथे तीन रुपये मिळवून दोन खर्च झाले आणि एक रुपयाच प्रॉफीट झाला तर प्रॉफीट भले तितकंच झाला,
कंपनी मात्र तीन रुपयांची झाली - आणि आपल्याबरोबर चार लोकांनाही २५ पैसे मिळाले.
हेच लॉजीक आहे.