House in Metro
मोठ्या शहरात (उदा. महाराष्ट्रात मुंबई, पुणे) भाड्याचं घर चांगलं की स्वत:चं ? हा एक प्रश्न समोर आला. आणि दुसरं म्हणजे गोरेगांवची एक बिल्डीँग पडल्यावर जमीनीचं खरेदीखत न केल्याने बिल्डरनं पुन्हा बांधून न देत हात वर केल्याची, आणि त्यामूळे अनेक कुटूंब उघड्यावर आल्याची एक बातमी वाचली... तसंच कॅम्पाकोला बद्दलही झालं होतं... . करायचं काय ? यासाठी मी स्वत:चा एक ट्रॅक तयार केलाय. पटतोय कां बघा. . आधी प्रश्नाच्या पहिल्या भागाचा विचार करु... भाड्याचं घर हवं की स्वत:चं ? तर याबद्दल माझं मत आहे... प्रॅक्टीकली भाड्याचं, इमोशनली स्वत:चं...! . स्वत:चं घर घेतांना शक्यतोवर संपुर्ण रक्कम (किमान ८० टक्के तरी) तयार असली तरंच स्वत:चं घर घेण्याचा विचार करा... किँवा फार फार तर ईएमआय आपल्याला खरंच झेपेल असा असेल तरंच... ! ते सुद्धा वेळ आल्यानंतर. योग्य पद्धतीने. (याच लेखात दिलंय ते) . भाड्याच्या घराचे काही टेँशन्स नसतात... आणि महत्वाचं म्हणजे ते हवं तेव्हा बदलता येतं. आपल्या सोयीने त्यात आधीक ऐमिनिटीज् अॅड करता येतात. शहरात आल्यानंतर किमान काही वर्ष सेट होईपर्यँत तरी शहाण्याने स्वत:चा फ्लॅट घेण्याचा विचार करु ...