= संडे ज्ञान =


आपल्या आजुबाजुचे लोक -
नातेवाईक, ओळखीपाळखीचे आणि तत्सम टाईप लोक्स...
.
यात दर ३ मागे १ व्यक्ती नग टाईप असतो... तोँडावर इतकं गोड बोलतात, वाटतं - आता आपले पाय धुवून पाणी पितात की काय... तेच आपल्या मागे आपल्याबद्दल गॉसीपीँग, त्रागा, याने अस्संच केलं, तस्संच केलं बडबड... आणि आपलं वाईट कसं होतं हे पाहत किँवा ते करुन आनंद मिळवण्यात त्यांची जय असते... अशी उपद्रवी टाळकी मॅक्स आपल्या विरुद्ध गृप्स करुन राहतात...
.
बऱ्‍याचदा अश्या टोळक्यांचा उपद्रव आपल्याला कळत असतो... पण आपल्याला कळतंय हे त्यांना कळलेलं नसतं... त्यामूळे त्यांच्याशी वागण्यात आपण जरासं टाईट केलं तरी त्यांचं गडबडतं...
.
बायकोनं विचारलं...
ए आहो,
हाऊ टू डिल विथ धिस काईँड ऑफ पिपल्स ?
टेँशन नाट -
याद रखीयो -
१. गॉसीपीँग करणारे जळतात, कारण त्यांचं स्टॅँडर्ड (वैचारिक, शैक्षणिक) आपल्या लेव्हलचं नसतं...
२. आपल्या बद्दल गॉसीप्स, म्हणजेच आपल्याला महत्व आहे.
३. टोळके जमवून आपल्याबद्दल बोलतात, म्हणजे आपण एकटेच त्या टोळक्याला भारी पडलोय.
४. महत्वाचं -
ते लोक्स आपल्याला जेवायला देत नाहीत.
सो यूनिवर्सल मूलमंत्र-
लेट देम गो टू द हेल !
बी हॅप्पी. ! 

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved