व्यवसायात भेटणारे नग


.
ओळखीचं कुटूंब एका कौटूंबिक सोहळ्यात भेटलं... त्यातल्या काकांशी ओळख तशी जुनी. काकू पहिल्यांदाच भेटल्या. त्यांचा एक मुलगा आहे, माझ्यापेक्षा वयाने १० वर्ष मोठा. ज्याने काहीतरी प्रोजेक्ट केलाय...! असा एकूण बॅकग्राऊंड - आता काकू आणि त्यांचा मुलगा "नग" कसे झाले याची ही कहाणी.
.
कौटूंबिक सोहळ्यात भेटल्यावर कसं काय याची विचारपूस झाली आणि काकूंनी त्यांच्या मुलाची ओळख सांगितली. त्याने कुठलातरी ग्राफीक्स मध्ये प्रोजेक्ट केलाय... तो मुलगा त्यावेळी तिथे नव्हता. त्याला स्टार्टअप करायचंय, आणि अॅज अ इस्टॅब्लीश्ड् सेटअप तू त्याला मदत कर - इति काकू.
व्यवसाय, शिक्षण किँवा नोकरी यासाठी ज्याला मदत हवी त्याला माझ्याकडून शक्य ती (आर्थिक : क्षमस्व) मदत करायचा मी प्रयत्न करतो. त्यात कधी कधी चांगले प्रोजेक्टस मलाही मिळतात - अर्थातच व्यवसायिक फायदा होतो. प्रामाणिक मदत करतो, बाकी ज्याचं त्याचं तो जाणे.
.
तर, काकूंनी त्यांच्या मुलाला मदत करण्याबद्दल सांगितलं... मी त्या धावपळीत माझं कार्ड दिलं. आणि त्याला फोन करायला सांगा, किँवा मुंबईला ऑफीसला पाठवा म्हणून बोललो.
.
दोन दिवस गेले,
काकूंचा फोन आला.
- मी xyz बोलतेय. तू yz ला फोन केला कां ?
मी - मी नाही केला. तुम्ही त्यालाच करायला सांगा, किँवा सोमवारी ऑफीसला पाठवा.
काकू - तू च कर ना. तो कुणालाच फोन करत नाही. मोठा माणूस आहे तो.
मी - मी पण कुणालाच फोन करत नाही. त्यालाच करायला सांगा.
.
दर चार दिवसांवर काकूंचा फोन येत होता.
माझं दरवेळी सांगणं हेच, की माझ्याकडे त्याचा नंबर नाहीय, आणि त्याचा प्रोजेक्ट नक्की काय आहे हे मला अॅटलिस्ट सांगा...
जेव्हा तो माझ्याशी बोलणार तेव्हाच तर पुढचं ऑफीशिअल बोलणं होईल ना...
काकूंचं यावर अति भन्नाट उत्तर आलं.
तू वयानं लहान आहेस, त्याला मान दे...
चला. ठिक.
मी फोन केला.
त्याने उचलला.
मी - तुम्ही प्रोजेक्टचं प्रेझेँटेशन घेऊन या मुंबईला. मी बघतो. जमल्यास काही शेअर्सची पार्टनरशीप करु. कधी येणार हे दोन दिवस आधी कळवा. मी माझ्या असिस्ट.चा नंबर देतो.
तो - मला जमणार नाही येणं. तु पुण्याला ये. मी बिझी असतो खूप.
मी - (मनात) खड्ड्यात जा मग. (प्रकट) जमणार नाही. तुम्ही मुंबईला येण्याआधी फोन करा. जुलै नंतर मला नवीन प्रोजेक्ट सुरु करणं जमणार नाही.
माझ्याकडून फोन बंद...
.
त्या चर्चेचं पुढे त्याच्याकडून काहीच झालं नाही.
.
काकूंचा पुन्हा पंधरा दिवसात फोन -
काय झालं ?
तू परत फोन कर त्याला.
त्याला स्टार्ट अप करायचंय,
लिड मिळत नाहीय...
तुला पण मदत होईल.
खूप आयडीयाज् आहेत त्याच्याकडे...
तो तुझ्याच फोनची वाट बघतोय.
वगैरे वगैरे...
मी इग्नोर केलं.
ते पोरगं एक फोन करायला तयार नाही... ते स्वत:ला पंतप्रधान समजतं... काकू त्याच्यावतीनं उंटावरनं शेळ्या हाकताय.
- काकू मला आता एका यूकेच्या प्रोजेक्टची तयारी करायचीय. आता शेअर्ड स्टार्टअपकरता शक्य नाही होणार...
- बरं. ते झालं की बोलते मग.
मी डोकं बडवलं माझं...
.
इथेच थांबलं नाही -
पुढे अति भयानक आहे.
परत काकूंचा पंधरा दिवसांत फोन.
काकूंना माझा एक डोमेस्टिक क्लायंटचा प्रोजेक्ट सुरु होतोय हे समजलं. त्यासाठी रिक्रूटमेँट नोटीफीकेशन वेबसाईटला, सोर्सेसला दिलंय... त्या yz ने काकूंना सांगितलं...
त्या प्रोजेक्टसच्या धावपळीत काकूंचा परत फोन.
काकू - तुझा तो अबक प्रोजेक्ट सुरु होतोय ना ?
मी - हो.
काकू - मग तू yz ला फोन कर. तो तुला मदत करेल.
मी - मदत ? तशी गरज नाहीय हो. रेग्यूलर प्रोजेक्ट आहे हा.
काकू - त्याला बोलाव ना त्यासाठी. तो करेल लिड. त्याला हेड म्हणूनच रहायची सवय आहे सगळीकडे... त्याला या प्रोजेक्टला पार्टनरशीप दे.
मी - काय ? काकू प्लिजच ! खेळ वाटलाय कां ? काहीतरीच काय बोलताय ?
काकू : तो टॅलेँटेड आहे खूप. मोठा माणूस आहे -
मी : असेल. पण इथे गरज नाही. आता ना तुम्ही फोन करायचा ना त्याला सांगायचं...
टाइमपास करताय.
मी फोन कट केला.
.
ज्याला काम करायचंय त्याला गरज नाही. त्याची आई अति हक्क दाखवतेय... सो कॉल्ड मदत मागतेय. ज्यासाठी मदत करायचंय ते काय हे माहीत नाही.
ते पोरगं स्वत:ला पंतप्रधान समजतं.
अश्या अनप्रोफेशनल लोकांमुळे प्रोफेशनचं डोकं फोडलं जातं..

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved