उंगली टेढी
= उंगली टेढी =
.
धुळे टू मुंबई असं स्लीपर गाडीचं तिकीट कालच्या प्रवासासाठी मी परवा सकाळीच पोर्टल वरुन बुक केलं... कन्फर्मेशन मेसेज आला. रिटर्न तिकीटाच्या भरवश्यावर मी ट्रिप प्लान केली... धुळ्यात आलो...! काम झालं की रात्री परत मुंबईला जाता येईल अशी तयारी केली... आणि काल सकाळी आठ वाजताच त्या पोर्टलचा गाडी कॅन्सल झाल्याचा आणि १००% रिफंड झाल्याचा मेसेज आला... व्यवहार संपला ! दुसरी गाडी थोड्यावेळात बघू म्हणून ते बाजूला ठेवलं.
.
नऊ-साडेनऊला ट्रॅवल्सच्या ऑफीसमधून फोन आला.
- "सर, ती गाडी कॅन्सल झालीय, तर आम्ही तुम्हाला दुसऱ्या गाडीत शिफ्ट करु कां ?"
- चालेल. पण गाडी कोणती आहे ?
- सिटीँग आहे...
- आणि चार्जेस ?
- आधीच्या गाडीइतकेच... ७०० !
- पण ही सिटीँग आहे ना ?
- हो. पण चार्जेस सेम आहेत.
- मग नको. माझं बुकीँग कॅन्सल करा. मी दुसऱ्या स्लीपर गाडीनं जाईल... सिटीँगला नको.
- ठिक आहे.
विषय संपला.
पावसाच्या बातम्या आणि गाड्यांना गर्दी असल्याने मी पण कालचं जाणं कॅन्सल केलं.
.
सकाळीच प्रकरणाचा निकाल लावल्यानंतरही काल संध्याकाळ पर्यँत त्यांच्या बुकीँग कन्फर्म - बुकीँग कॅन्सलच्या मेसेजेसचे आपोआप होणारे येडेचाळे सुरु होते. दिवसभरात सात आठ वेळा झालं तर मी एकदा संध्याकाळी फोन करुन त्याबद्दल विचारलं आणि कॅन्सलच ठेवण्याबद्दल सांगितलं.
संपलं.
.
रात्री १० वाजता त्यांच्या ड्रायवरचा फोन आला... त्याच्याजवळच्या चार्टमध्ये माझं आजचं बुकीँग दिसत होतं. त्याला सुद्धा मी सिटीँगचं बुक केलं नाहीय सांगितलं. फोन ठेवला, विषय संपला.
.
आत्ता १० वाजता परत त्या ट्रॅवल्सच्या ऑफीसचा फोन आला.
- सर, काल तुम्ही कां गेला नाहीत त्या गाडीने ? आमचं एक सिट रिकामं गेलं !
- तर ? मी बुक केलेलं कां ?
- पण आमचं तर नुकसान झालं ना ?
- मी काय करु ? मी म्हणालो कां की माझं बुक करा ?
- तुला इथे येवून चार्जेस पे करावे लागतील.
- काय संबंध ? माझं बुकीँग नव्हतं...
- तरीही आमचं एक सिट रिकामं गेलं... त्याचे चार्जेस ७०० रुपये भरावे लागतील. ऑफीसला येऊन भरा.
- एक रुपयाही देणार नाही. चल फोन ठेव.
- (आवाज मोठ्ठा) तुला पैसे भरावेच लागतील.
- (त्याच्यापेक्षा मोठ्ठा आवाज) अय, माझ्या नादी लागू नको. तुझं तिथे येवून बारा वाजवेल. कसले पैसे हवेय रे तुला ? कालपासून डोकं खातोय. मी भिडणारा माणूस आहे... जुन्या धुळ्यात वाढलोय... चल फोन ठेव... परत फोन केला तर विचार कर... आणि मी आज ग्राहक मंचात जातो... तिथे भिड मला... ये.
- ओ भाऊ, नसतील पैसे द्यायचे तर ओरडताय कशाला. नाही सांगा सरळ. एका सिटचं नुकसान समजेल.
- समज मग ! ठेव फोन.
.
त्याने फोन कट केला,
मी परत फोन ट्राय केला तर नंबर ब्लॅकलिस्टेड येतोय
.
अश्या टोणग्यांना सरळ सांगून कळत नसतं... त्यांच्या लेव्हलवर उतरावंच लागतं...!