Saved Business
एका जवळच्या मित्राचा काल संध्याकाळी फोन आलेला. "तेजा, भेटूयात.. जरा महत्वाचं बोलायचंय. !"...
मुंबईत एका प्रोजेक्टमध्ये भेटलेलो आम्ही... दोघेही देशस्थ... मी खान्देशातला, तो विदर्भातला... आणि जवळपास एकाच वेळी आपापल्या व्यवसायात स्टार्टअप केलेलं...! त्यामूळे एकमेकां सहाय्य उक्ती जागत आम्ही चार-पाच प्रोजेक्ट एकत्र केले... बऱ्यापैकी फायदा झाला... त्याची कंपनी सुद्धा हळू हळू वाढायला लागली... तीन वर्षात जितकी हवी त्यापेक्षा काही टक्के चांगलीच...
.
आज सकाळी तो घरी आला... चेहर प्रचंड दडपणात असलेला... उसनं हसू आणत त्याने गुड मॉर्निँग वगैरे केलं... "तेजा, सॉरी यार - खूप सकाळीच आलो घरी. थोडं महत्वाचं बोलायचंय..."
एरव्ही तेजासेठ बोलत पाठीवर जोरदार फटका देत बोलणारा तो आज एकदम गरीब गाय झालेला. म्हणजे नक्कीच सिरीयस मॅटर असणार... त्याचं एका पोरीसोबत दोन वर्षाँपासून प्रकरण चालू होतं. त्यात बऱ्याचदा मोठी भांडणं झालेली, मी घरचं कार्य समजून सोडवलीय... त्यामूळे हा तिच्यामूळे व्यथितबिथीत झालाय कां ? आणि हो, तर आता पुन्हा दोन तास याचं देवदास ऐकावं लागणार म्हणून माझ्या चेहऱ्यावर प्रश्नांकीत उदासिन वगैरे भाव जन्म घेत होते...
तोच त्याने हातातला कागद दिला...
- रेझ्यूमे आहे माझा. जॉब शोधतोय.
- काय ? काहीतरीच काय !
- खरंच रे ! जॉब करायचाय आता. तू मदत कर ना प्लिज. तुझ्या कंपनीत वॅकन्सी असेल तर खूप चांगलं, पण दुसरीकडेही चालेल.
मला तेव्हा खरंतर काय रिअॅक्ट व्हावं कळत नव्हतं...
- अरे, हे काय खूळ आता ? कंपनी उभी केलीयेस, सात लोकांना तू जॉब देतोयेस... आणि तुला काय रे जॉब करायची गरज ?
- तेजा, यार... थोडा प्रॉब्लेम्स मधे आहे रे... मला कळत नाहीय कसं मॅनेज करु ? तू प्लिज समजून घे...
- काय प्रॉब्लेम ? नीट सांग. !...
एका कंपनीचा मालक एकदम जॉब वर आलेला पाहून खरंतर उमजत नव्हतं काय रिअॅक्ट व्हावं. त्याने बोलायला सुरुवात केली...
- तेजा, तुला तर माहीतीय मी १५ ला स्टार्ट केलं... दोघं होतो आधी, नंतर वाढत आत्ता १९ ला सात आहोत फक्त... आणि तीन प्रोजेक्ट्स आहेत सुरु....
- हो ! मग जॉब का करायचाय ?
- अरे तीन वर्षात हवी तशी कंपनी वाढत नाहीय...
- व्हॉट यू मिन मॅन हवी तशी वाढत नाहीय ? चांगलं तर वाढतंय... इव्हन, सेव्हन फ्रॉम टू इज ए गूड ग्रोथ... तुझ्याकडे चांगले प्रोजेक्ट्स आहेत...
- हो ! पण महिन्याकाठी हातात फार पैसा नसतो रे. वीस - पंचवीस हजाराच्यावर सुटत नाही. तीन वर्ष झालीय, तरी टोटल फक्त १२ प्रोजेक्ट झाले. टिम सातची... टर्नओव्हर म्हणशील तर जेमतेम...! काय उपयोग रे रोज बारा बारा तास आपटून ? परत नातेवाईकांचे टोमणे...
- अरे मग चांगलाय ना ! ग्रोथ तर होतेय ना ? साईलेँट ग्रोथ होतेय...
- काय ग्रोथ तेजा ? ऑनलाईन अॅप्सचं तुला माहितीत ना ? टिम वाढत नाही. ऑनलाईन वर्क असल्याने इंफ्रास्ट्रक्चर दिसत नाही... परवा मामा विचारत होता, तीन वर्ष झाले तरी पॉश ऑफीस कां तयार नाही तुझं...? आयुष्यात काही करणार कां नाही ? किती आहे तुझा बॅँक बॅलेँस ? च्यायला, आपल्याकडे बिजनेस म्हणलं की पॉश ऑफीस लागतं, दिमतीला चिकणी सेक्रेटरी लागते... तीन वर्षात मिळालं नाही तेजा. पुढे मिळेल कां नाही काय सांगता येतं ? आणि ऑनलाईन बिजनेस म्हणलं की लोकं बोलतात ते काही खरं नसतं... पैसे नसतात त्यात... काय करावं मग तेजा ? त्यापेक्षा जॉब करेन... महिन्याला पंचवीस हजार कमवेन, आणि डोक्याला ताण न घेता जगेल... पुढे प्रमोशन्स, ऑनसाईट जाईल...! ते दर महिन्याच्या पगार देण्याची कटकट नको, ना प्रोजेक्टची डेडलाईन... बोलणाऱ्यांचंही तोँड गप्पं, आणि ऐकणाऱ्याचं मन शांत...
सांगशील ना ओपनिँग्स असल्यात तर ? आणि प्लिज माझा स्टाफ आणि प्रोजेक्ट्स तू मर्ज कर तुझ्याकडे.
...
एक उद्योजक संपत होता...
त्याला संपू द्यायचं नव्हतं...
..
ते बघू आपण. आधी मला एक सांग,
तुला मनापासून वाटतंय कां की ग्रोथ होत नाहीय... ? अगदी मनापासून सांग ! तू प्रामाणिक कष्ट केलेत की नाही ?
- तेजा, तू बघतो ना मी कसं काम करतोय ? आणि तीन वर्षात झालंय रे... अॅटलिस्ट लिफ्ट मिळालंय. पण आयटी मध्ये चालतं ते घरच्यांना पटत नाही - त्यांना ते नऊ ते पाच कारकूनी केली तरच पटतं.... बाकीच्यांना ऑनसाईट चान्स, पॅकेज ... आपण च्यायला १८-१८ तास घासून हे...
- तेच सांगतोय ना मी ! तुला दिसतंय ना की थोडंफार ग्रोथ आहे, म्हणजे तुझे प्रयत्न वाया जात नाही हे तर खरंय...
- हो... पण प्रयत्नांना रिटर्नस नाहीय ना... पैसा पुरेसा नाही, ठोस दिसायला दिसत नाही...
- कोण म्हणतं रिटर्नस नाहीय ? मजबूत रिटर्नस येताय. तुला दिसत नाही... मला सांग - गाडी चालवतोस ? सेल मारल्यावर एकदम थर्ड किँवा टॉप गेअर टाकला तर काय होईल ? एकदम टॉप स्पिडला पोहचेल कां ? १५ मिनिटात कल्याण टू अंधेरी ?
- गाडीत खडखड आवाज येईल आणि धक्का बसून गाडी बंद पडेल. टॉप स्पिड काय ? आणि गाडीचा इथे काय संबंध ?
- संबंध आहे. तू सांग फक्त मी विचारतोय ते... आणि फर्स्ट टाकून हळूहळू उचललं तर ?
- तर काय ? व्यवस्थित चालेल...
- एकदम टॉप स्पीडला ना ?
- काय यार तेजा टेस घेतोय ? फर्स्ट गेयरला फार फार तर वीस !
- तेच... जर फर्स्ट गेअरला २० च्या वर स्पीड जात नाही तर तू कंपनी सुरु होताच तीन वर्षातच एकदम मोठ्ठं ऑफीस, करोडचा टर्नओव्हर कसा मागू शकतो ?
- पटतंय तेजा. पण तंगी येते... त्यापेक्षा जॉब मध्ये पैसा मिळतो.
- येणारंच ती ! तू मालक आहेस. जॉब करतोय कां ? आणि जॉब केला तर आज पैसा मिळेल... पण दहा वर्षाँनी नवीन टेक्नॉलॉजी आल्यानंतर तू आउटडेटेड होशील त्याचं काय ? हेच, तुझ्या कंपनीची ग्रोथ म्हणशील तर आहे त्याच स्पीडनं जरी खेळलास तरी पुढच्या दहा वर्षात मिन. ४०सीआर कुठेच गेलं नाही. टिम सुद्धा १००+. पटत नसेल तर स्वत: बघ !
.
- पण नातेवाईक ?
- Let them go to hell yar. त्यांना यातलं कळत नसतं.
.
आपल्या कंपनीशी आपण प्रामाणिक रहायचं. बस ! आपली कंपनी म्हणजे लेकरु असतं आपलं.
.
त्याला पटलं.
आणि त्याने थॅँक्स तेजासेठ म्हणून पाठीवर जोरदार फटका दिला, रेझ्यूमे फाडून डस्टबीनला फेकलाय.