Business Motivation Speakers are...
बिजनेस मॉडल, स्ट्रॅटेजीज्, Constitution या गोष्टी कधीच कॉपी करु नये -
फुकटचे सल्ले वापरून तर नाहीच नाही.
कारण प्रत्येक व्यवसाय, तो चालवणाऱ्याला माणसाचं गोल, स्वभाव, अडथळे, आयडीयाज् वेगवेगळ्या असतात... सणक वेगळी असते...
मी तर म्हणतो लोगो, टॅगलाईन, प्रोफाईल्स आणि घटना ही पुर्णपणे स्वतःच्या हाताने लिहावी....
थोडे एक्स्ट्रा लागतील - पण काम म्हणजे काम होईल !
तर आणि तरच कुठल्याही संकटात आपला व्यवसाय टिकवून ठेवण्याचं बळ मिळतं...
आपण किती पाण्यात आहे, आणि स्टाफ पाण्यात उतरतोय की कपडे सांभाळतोय, वेळप्रसंगी हातातली अदृष्य दोरी ओढून स्टाफला पाण्यात ओढण्याची आपल्यात धमक आहे की नाही हे सगळं कळतं...!
जन्माला घालतो तोच संकटात रक्षण करतो...
आपण व्यवसाय उभा केलाय तर तो आपल्यालाच मजबूत करावा लागतो...
...
हजारो रुपये घेवून मोटीवेशनल लेक्चर्स ठोकणाऱ्यांच्या नादी लागू नका... ढिगानं रोज जन्माला येतात - जातात...
कुठलातरी नितीवाला गेले दहा दिवस फोन करून मागे लागला होता, "व्यवसायिकांसाठी कोरोनानंतरच्या संधी आणि आव्हानं" यावर ऑनलाईन ट्रेनिंग घ्या म्हणून... फि : ३९९९९ फक्त !
प्रत्येकवेळी नॉट इंटरेस्टेड हेच उत्तर दिलेलं.
आज त्याच्या मॅनेजरने सरळ त्यालाच फोन दिला _
दोन-पाच मिनिटं बडबड ऐकली,
तुमचा टर्नओव्हर वर्षभरात तिप्पट करण्याची जबाबदारी माझी...
आम्ही बिजनेस मॉडेल डिजाईन करुन देवू...
मग मी त्याला समोरुन ऑफर केली...
तू त्या प्रोजेक्टमध्ये ५०% इनवेस्ट कर... दोघं मिळून फायदा उचलू...
- "सॉरी सर, हे आमच्या पॉलीसीत नाही..."
- मग कुठलाही व्यवसाय अश्या Adopted Model वर करणं आमच्या Constitution प्रमाणे Allowed नाही... पुन्हा फोन करु नका.
... आणि मला कॉल्स येणं बंद झालं !
...
दुसरं एक एका मिडीया हाऊसचे बिजनेस समिट साठी जानेवारीत दिवसात चारदा फोन येत होते. कार्पोरेट टोनमध्ये.
पीएम, एफएम कॉन्फरन्सला येतील,
देशभरातले उद्योजक येतील,
आम्ही १०० गृप्स शॉर्टलीस्ट केलेय,
- करणार काय ?
तर देशासमोरील भविष्यातील उद्योग संधींबद्दल चर्चा होईल... मार्चमध्ये - दिल्लीत.
३ + १ बिजनेस फॅमिली -
फि : $2000 (जवळपास दिड लाख रुपये)
दिड लाख खर्च करुन लष्कराच्या भाकऱ्या भाजायची गरज काय ?
- त्यांना Not Interested म्हणून बोललो,
विषय संपवला.
पुन्हा पाच सहा दिवसांपूर्वी फोन आला आणि सेम ऑफर आली,
यावेळी VC वर
फि : $550
"You can meet PM and FM online !"
- No Need !
जेव्हा फ्री असेल तेव्हाच कळवा बोलून फोन डिस्कनेक्ट केला !
नंतर कळलं ते मिडीया हाऊस म्हणजे Motivational Lectures चे रिकामचोट होते... आणि एडमिशन्स नसल्याने ५-६ मार्चला कुठलीच मिटींग झाली नव्हती...!