Police : Are they devils?

पोलीसांनी स्वयंसेवक म्हणून काही पोरं पांढऱ्‍या टिशर्टमध्ये उभी केलीय... त्या पोरांची पोलीसांच्या वर ताण आहे...
आत्ता साठ-पासष्ठीतला एक माणूस स्कूटीवरुन जात होता, गाडीवर किराणा सामान. या टोळभैरवांनी अडवलं... 
- कुठे निघालास ?
त्यांच्या वडीलांच्या वयाच्या माणसाला अरे-तुरे करत विचारलं...
त्यांनी किराणा सामान दाखवलं...
तोपर्यँत चौघं घोळका करुन उभे राहीले.
टोळक्याने लायसन्स मागितलं,
लायसन्स घरी विसरल्याचं ऐकताच एकाने चारचौघात त्याची शिव्यांसह अक्कल काढली,
एकाने पाठीत काठी घातली,
एकाने काठीने गाडीवरची पिशवी उडवून लावली... साखर, तांदूळ सगळं अस्ताव्यस्त झालं...
एक पावती फाडायला उभा...
त्या टोळक्याच्या चार क्षणांच्या आनंदासाठी एका क्षणात त्या माणसाच्या आठवड्याच्या बजेटची माती झाली...
!
.
लॉकडाऊनच्या पहील्या टप्प्यात सामाजिक संवेदनशीलतेच्या जाणीवेतून, उन्हातान्हात उभे राहतात, हायरिस्क फ्रंटला सिक्यूरिटी देतात म्हणून मी पोलीसांना पाण्याच्या बॉटल्स, फूड पॅकेटस्, विटॅमीन सी टॅबलेटस वगैरे दिलेले... पण नंतर त्यांच्या असंवेदनशील वागणूकीचे एक एक किस्से समोर आले तर त्यांच्याबद्दलच्या कुठल्याही आदरसत्काराची इच्छा मेली...
१०० पोलीसांतले ७० लोक चांगले असतील-आहेत - नो डाऊट ! पण जे तीस लोक इतरांचा प्रश्न समजून न घेता फक्त पॉवर्स आहेत तर वापरा करतात त्यांच्यामूळे जनरलाईज्ड होतं...
यात चूक वरुन चुकीच्या ऑर्डर्स-पॉवर्स देणाऱ्‍यापासून हात साफ करणाऱ्‍या शेवटच्या माणसापर्यँत आहे...!
.
सिँधूदुर्गातला बायांना उठाबशा काढण्याचं असो, किँवा मजुरांना भर उन्हात ट्रकमध्ये कोँबडा करणं असो... गाडीची काच फोडणं, इमरजन्सी असतांना अडून पाहणं, मंचरच्या मुलाच्या डोक्यात काठी घालणं असो की एकाच शहरात असणाऱ्‍या जन्मदात्या आईचे अंत्यसंस्कार तिच्या मुलीला घरी आरामात व्हिडीयो कॉलवर बघा म्हणणारे असो... अश्या असंवेदनशील पोलीसाविषयीचा कुणाला आदर वाटणार ?
..
अपवाद आहेत - नाशिकला लग्न लावणारे पोलीस, मुंबईतले रस्त्यावरच्या गरजूंना अन्न देणारे पोलीस -
पण ते थोडेच ! त्यांच्यामूळेच भर उन्हात कोरड्या हवेत आर्द्रता टिकून आहे.
.
कोरोना संपल्यानंतर जेव्हा मोदी आदरसत्कार करण्यासाठी थाळी टाळी सारखं पुन्हा काहीतरी सांगतील तेव्हा प्रत्येक संवेदनशील माणसाच्या मनात या काही कटू प्रसंगाची सल नक्कीच असेल.

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved