Posts

Political Retirement

वयाची एक ठराविक मर्यादा ओलांडली की 'अतिजेष्ठ' नेत्यांना शासकीय कर्मचाऱ्‍यांच्या धर्तीवर राजकारणातून 'सन्मानाने' 'सेवानिवृत्त' करायला हवं...! कारण 'वय झालं' तरीही 'सत्तेची' 'हाव' सुटत नसेल तर डोक्यावर परीणाम होण्याचीच शक्यता जास्त असते... अश्यावेळी नियंत्रण सुटतं आणि हातून वाह्यातपणा घडतो. आयुष्याच्या शेवटाला उगाचच शोभा होते, आणि लोकांकडून फुकटात अख्ख्या जन्माचा उद्धार एका क्षणात होतो...! मनमोहनसिँग आणि एल के आडवाणी -  वरच्या विधानाला साजेशी डोळ्यासमोरची रोजची उदाहरणं...!

Poets

Image
आजपर्यँतच्या निरीक्षणातून सांगतोय... डोळ्याला दिसेल तसं शब्दात बंदिस्त करुन कवी कविता करतो... आणि नंतर पुढची अनेक वर्ष 'अभ्यासक' मंडळी आपल्या डोक्याने त्याचा अर्थ 'लावत' बसतात... तो अर्थ ना कविच्या गावी असतो, ना कवितेच्या... कवि हयात असेल तर काहीतरी अर्थ लागल्याच्या आणि तिच्याआयला आपण असं बनवलंय ( :-O ) च्याआनंदाने हो ला हो... आणि नसेल तर 'अभ्यासकाची' त्यावर पीएचडी तर हमखास ठरलेलीच !!... :-D:-) असो.... :-)

Sky

कुणीही कुणाच्या मोठेपणावर जळू किंवा कुढू नये. कारण प्रत्येकाच्या डोक्यावर प्रत्येकाला स्वत:चे आभाळ मिळालेले असते, आणि त्याखाली तो अनंत मर्यादेपर्यंत मोठा होऊ शकतो. आपण दुसऱ्याचे आभाळ मोजत बसण्यापेक्षा आपल्या डोक्यावरच्या आभाळावर लक्ष्य केंद्रित करावे आणि त्याला गवसणी घालावी. प्रत्येकाला स्वत:च्या डोक्यावर स्वत:च्या मालकीचे आभाळ असल्याने मोठे व्हायची संधी हमखास असते. तीच नेमकी घेतली तर मोठे होणे अवघड नसते.

Gandi Godase

Image
(साभार : मी नथुराम गोडसे बोलतोय.) केवळ जीनांच्या वेड्या हट्टाला मान्यता देऊन, केवळ कोणाचं मन मोडायचं नाही म्हणून गांधीनी विभाजनाला मान्यता दिली.... व्यक्ती देशापेक्षा कधीच मोठी नसते नाना... आणि गांधी हि व्यक्ती स्वतः ला देशापेक्षा मोठी समजू लागली तर.... तर मग देशसेवा, त्याग या शब्दाला काय अर्थ राहतो....??? गांधी जीनांना भेटायला निघाले तेव्हा आपण त्यांची गाडी अडवली.... त्यांना सांगितलं, नका जीनांशी तडजोड करू... नका देशाचा तुकडा मोडू.... पण आपला हा राष्ट्रपिता, आपल्या छातीवर पा य देऊन पाकिस्तानच्या निर्मितीसाठी सुईणीसारखा त्यांच्या मदतीला धावला....!! गांधीनी स्वतःच्या अस्तित्वाला जेव्हा जेव्हा आव्हान दिलं तेव्हा तेव्हा मंत्रिमंडळ झुकलं...देशाच्या अहिताचेच निर्णय घेतले गेले.... पाकिस्तानला ५५ कोटी देण्याचा निर्णय पण...! आपली निदर्शनं सुरु होती... गांधींचं आमरण उपोषण सुरु होतं....! शेवटी हिंदूंनी शस्त्र खाली ठेवली.... मला अजूनही आठवतं, एक गरीब हिंदू पुढे आला आणि गांधीना म्हणाला, "बापू, तुमच्या हत्येच पातक माझ्या कपाळी नको म्हणून हे शस्त्र तुमच्या पायाशी ठेवतोय. पण मुसलमान मोहल्...

Marathi Movie

मराठी फिल्म्स इतर फिल्म्स सारख्या शुक्रवारी (Friday) रिलीज होतात. आपण म्हणतो मराठी फिल्म्स ला शो चा वेळ odd मिळतात ... हो कारण theater वाले म्हणतात आपण - म्हणजे मराठी प्रेक्षक मराठी फिल्म्स बघायला PRIME TIME ला येत नाही !! मग का weekends ला आपण advance बुकिंग करून मराठी सिनेमा बघत नाहीत ? हिंदी मात्र बघतो ....हो ना ? होच्ह कि...मग theater वाल्यांना दोष देऊन चालणार नाही . किती तरी चांगल्या फिल्म्स ह्याच मुळे मेल्या आहेत. आणि खर बोलूया... आपण advance बुकिंग केलेल्या किती हिंद ी फिल्म्स ना खरच अर्थ होता ? Glamour आपण देतो ...TRP आपण देतो ...आपणच Dirty Picture आणि Gangs of Waseypur सारख्या सिनेमा hit करतो ! आणि आपणच मराठी फिल्म्स कडे काना डोळा करतो ...विचार करा...time to think...glamour आपल्या कडे पण आहे - आपण गर्दी केली तरच possible आहेय .जिकडे audience आहे तिकडेच अभिमान आहे, तिकडे सन्मान आहे तिकडे यश आहे. South ला शाहरुख खान चा एक पोस्टर देखील दिसत नाही..म्हणून त्यांचे Hero आणि फिल्म त्यांच्या प्रांतात HIT नाही तर SUPERHIT आहेत...कारण त्यांना त्यांच्या फिल्म्स चा अभिमान आहे ...आणि...

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved