Posts

दत्त

Image
दत्त या एका नावाने आयुष्याला वळण दिलंय. दत्त महाराजांना शरण गेलेल्या भक्तांच्या आयुष्याचं स्टिअरिंग महाराज आपल्या हातात घेतात, आणि त्या माणसाचा आध्यात्माकडून अनुभूतीकडचा प्रवास सुरू होतो. दत्त महाराज म्हणावं तर सगुण स्वरूप - कारण दत्त तेजाने समृद्ध गुरू परंपरा आणि सदेह दर्शन देणारे सद्गुरु आहेत, आणि म्हणावं तर निर्गुण स्वरूप - कारण गाणगापूर, नृसिंहवाडी, कारंजा ते गुरुशिखर गिरनार मध्ये महाराजांच्या निर्गुण पादुका भक्तांना अनुभूती देत आहेत. दत्त महाराज म्हणजे सगुण - निर्गुण या स्वरूपाच्या पलीकडे, साक्षात चैतन्य आहेत. . दत्त महाराज आपल्या शिष्याला कधीही एकटं सोडत नाहीत. मूळ श्री दत्त महाराज (ग्रंथ : दत्तमहात्म्य), श्रीपाद श्रीवल्लभ (स्थान : पिठापुर, ग्रंथ : श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र) , नृसिंह सरस्वती स्वामी महाराज (स्थान : गाणगापूर, ग्रंथ : श्री गुरुचरित्र) या अवतारांमधून समृद्ध झालेली गुरू परंपरा आणि साक्षात दत्त स्वरूप असलेले संत यांपैकी कुठल्याही माध्यमातून दत्त महाराज आपल्या भक्ताला पंखाखाली घेतात. सद्गुरू कुणीही असू देत, मूळ दत्त महाराज आहेत. त्या माणसाचे कर्म, नशिब, प्रारब्ध हा खेळ थ...

Keataki Chitale Matter

केतकी चितळे बोलली ती वेळ चूक कि बरोबर हे महत्वाचं नाही - आपल्याला तिचं म्हणणं पटतंय, तरीही आपण तिच्या सपोर्टला उभं न राहता तिलाच अक्कल शिकवतोय ही गोम आहे ! ... बेसिक फरक आहे त्यांच्यात आणि आपल्यात... ते हातात हात धरतात, आपल्याकडचे लोक्स बांगड्या भरतात. (ब्राह्मण म्हणून दूर - राईट विंगच्या हिशोबाने बघा आधी) ... सुरुवात कुठे झाली - केतकी चितळेने शिव्यांसाठी उलट शिव्यांची उजळणी केली, का ? तर तिच्या जेन्यूईन असणाऱ्या गोष्टींना आणि मतांना वाह्यात विकृत लोकांनी डिचवलं, घाणेरड्या कमेंट्स केल्या... तिचं आडनाव आणि जात आडवी आली. तिने का ऐकून घ्यावं? नडली ! व्हिडीओमध्ये एकेकाला नावासहित कोलला, आता ते लोक्स तिला टरकून असतात. नादी लागत नाही.  पण नंतर तिच्या प्रत्येक गोष्टीला - अगदी तिच्या फिट्ससाठी असलेल्या कामावरूनही तिला डिचवलं जात असेल तर कोण ऐकेल ? ती भिडते आणि नडते. ... केतकी चितळे असो वा कंगना राणावत, या पोरी जबरदस्त आहेत, सिस्टीम उलथावण्याची ताकद त्यांच्यात आहे. फक्त त्यांची ती शक्ती आपल्याच बाजूच्या अतिहुशार लोकांपुढे वाया जायला नको. ... केतकी चितळे ट्रोजन हॉर्स नाही, आपल्या बाजूची अतिह...

Biopic

कुठलाही मराठी सिनेमा स्पेशली बायोपीक फार फार एक किंवा दोन आठवडे सत्तर एम एम वर असतो, तिथे लाज काढून झाली कि झी टॉकीज प्रीमिअरच्या नावाखाली आठवड्यात दोन वेळा स्वतःला कानफाडून घेत असतो - त्यामुळे अकाउंटमधले पाचशे रुपये वळवळ करत नसतील तर दोन आठवडे थांबा आणि फुकटात घरबसल्या बघा... कारण - पाचशे रुपये खर्च करुन काहीतरी पदरात पडेल अश्या दर्जाचे कलाकार, विषय आणि सिनेमे येत नाही. सुबोध भावेनी बालगंधर्व केला, लोकमान्य केला - आता घसरून राहुल गांधी करणार बोललंय. प्रसाद ओक दिघे कमी, स्वस्तातला पुष्पा वाटतोय... झुकेगा नाही साला टाईप गद्दाराला माफी नाही वाटतंय... थोडक्यात - कास्टिंग गंडलय. .. कुठलाही बायोपीक बघून आपल्या आयुष्यात फार मोठी क्रांती होणार आहे असं नाही. कितीही सिरीयस विषय असला तरी काहीतरी किडा दिसतो आणि तो बघतांना हसू येतं... एमएसडी फक्त सिरियसली पाहिलेला, तिकीट विकत घेऊन. बाकी जवळपास सगळे सिनेमे टीव्हीवर आल्यावर किंवा वि च्या रिचार्जबरोबर हॉटस्टार फ्री मिळतं त्यावर बघितले. .. संजय राऊतांवर एखादा कॉमेडी बायोपीक निघावा. तो जबरदस्त चालेल. अमिषा पटेल समोर वाकलेले राऊत धडपडले, एनजीओप्लास्टिच्...

Drawings

माझं अडीच वर्षाचं लेकरु हुक्की आली की एक पेपर-पेन घेऊन येतं आणि पुढचा किमान तासभर एक एक ऑर्डर सोडतं... कालपासून हा नवीन उद्योग सापडलाय. ... पप्पा, मून काढ... स्टार काढ... त्यात एक एका कलरची व्हरायटी.  पप्पा, गाडी काढ... मग त्या गाड्यांच्या व्हरायटी निघतात. तुटकी गाडी, रेड गाडी, येल्लो गाडी, ग्रीन गाडी, पप्पाची गाडी, काकाची गाडी... मग ती गाडी बघून फिरायला जायचं आठवतं, काल संध्याकाळ पासून चार वेळा भुर्रर्रर्र चक्कर झालाय. गाडी, चोकोबार, चॉकलेट, एसी, श्रीयानचा शर्ट, श्रीयानचा हात, पप्पाचा हात, मम्मा, फोन, पंखा, चिऊ, काऊ, हत्ती, घोडा, मूनचा हात, बस, चाक आणि त्या प्रत्येकाच्या पाच-सहा व्हरायटी असं सगळं प्रकरण सुरु आहे... ... गोल गोल काढून त्याला डोळे, नाक, शेंडी लावली आणि ही कोण असं विचारलं की बरोब्बर सांगतो.  .. कालपासून शंभर-एक चित्रं आणि त्या चित्रांची मापं काढली गेलीय, त्याचं मन भरेपर्यंत नॉनस्टॉप सुरु असतं. एकूण सगळं खूप जबरदस्त आहे.

Nupur Sharma and BJP

नुपूर शर्माना निलंबित केल्या बद्दल शेवटची पोस्ट.. लेख मोठा आहे वेळ काढून अवश्य वाचा! आपण Information Age माहिती युगात जगत आहोत... हे युग हे सोशल मीडियाचे आहे, प्रगत तंत्रज्ञानाचे / Advance Technologies च आहे...Hybrid Telecommunications/ उच्चस्तरीय दूरसंचाराचे आहे... Hybrid Warfare/ हायब्रीड वॉरफेअरचे आहे. पुढे जाण्यापूर्वी Hybrid Warfare /हायब्रिड वॉरफेअर समजून घेणे महत्त्वाचे आहे. information Age माहिती युगातील लढाया युद्धभूमी ऐवजी इंटरनेटवर, स्टॉक एक्स्चेंजमध्ये,बायो लॅबमध्ये, तुमच्या बुद्धिजीवी/ intellectual आणि institute/संस्थांद्वारे  लढल्या जाणार. या लढाईत कोणतही हत्यार, शस्त्र नसते.. narratives असतात,पोस्ट, ट्विट द्वारे, Data hacking होते, Phishing असत, असे वेगवेगळे मार्ग वापरले जातात..  सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे एक Conventional War पारंपरिक युद्ध आहे...ज्यामध्ये बॉम, दारूगोळा, मिसाईल ही पारंपारिक शस्त्रे वापरली जात नाहीत.. कमीत कमी संसाधनांचा वापर करून आपल्या शत्रूचे जास्तीत जास्त नुकसान करणे, त्यांना गोंधळात टाकणे आणि त्यांना तोडणे.... एवढेच या युद्धाचे एकमेव उ...

Nupur Sharma and India

नुपूर शर्माना निलंबित केल्या बद्दल शेवटची पोस्ट.. लेख मोठा आहे वेळ काढून अवश्य वाचा! आपण Information Age माहिती युगात जगत आहोत... हे युग हे सोशल मीडियाचे आहे, प्रगत तंत्रज्ञानाचे / Advance Technologies च आहे...Hybrid Telecommunications/ उच्चस्तरीय दूरसंचाराचे आहे... Hybrid Warfare/ हायब्रीड वॉरफेअरचे आहे. पुढे जाण्यापूर्वी Hybrid Warfare /हायब्रिड वॉरफेअर समजून घेणे महत्त्वाचे आहे. information Age माहिती युगातील लढाया युद्धभूमी ऐवजी इंटरनेटवर, स्टॉक एक्स्चेंजमध्ये,बायो लॅबमध्ये, तुमच्या बुद्धिजीवी/ intellectual आणि institute/संस्थांद्वारे  लढल्या जाणार. या लढाईत कोणतही हत्यार, शस्त्र नसते.. narratives असतात,पोस्ट, ट्विट द्वारे, Data hacking होते, Phishing असत, असे वेगवेगळे मार्ग वापरले जातात..  सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे एक Conventional War पारंपरिक युद्ध आहे...ज्यामध्ये बॉम, दारूगोळा, मिसाईल ही पारंपारिक शस्त्रे वापरली जात नाहीत.. कमीत कमी संसाधनांचा वापर करून आपल्या शत्रूचे जास्तीत जास्त नुकसान करणे, त्यांना गोंधळात टाकणे आणि त्यांना तोडणे.... एवढेच या युद्धाचे एकमेव उ...

गडकरी वि. फडणवीस

Image
 कोरोना काळात आधी स्वत:ची तब्येत सांभाळा, कुटुंबियांना जपा आणि शक्य होईल तसं सगळी कामं ऑनलाईन करा!- नितीनजी गडकरी टू देवेंद्रजी फडणवीस गडकरींचा फडणवीसांना प्रेमळ सल्ला - देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला. त्यावरुन गडकरी यांनी फडणवीसांना प्रेमळ सल्ला दिलाय. "देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच गडचिरोली दौरा केला. आवश्यक आहे जणं. पण त्यावेळी त्यांच्या गाडीत किती लोकं होती? आता सर्व काम व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने करा. आता प्रत्येकाकडे मोबाईल आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची सोय आहे. उगाच कुणाच्या घरी जाऊ नका. त्यांच्याशी फोनवर संपर्क साधा. तुम्ही जेवढं लाईटली घेत आहात तेवढं हे साधं नाही. आपण अनेक कार्यकर्ते गमावले आहेत", अशा शब्दात गडकरी यांनी फडणवीसांना दौरे टाळण्याची विनंती केली. आता यावरून वेगळे अर्थ (ते कसे काढले? सामना वाचून!) विरोधक मजा घेत आहेत. जरूर घ्या. गडकरी आणि फडणवीस पन दोघे व्हाट्सअप्प वर तुमचे स्क्रिनशॉट एकमेकांना दाखवून मजा घेत आहेत. तुम्ही मोदी vs गडकरी किंवा फडणवीस vs गडकरी करायचा जेंव्हा प्रयत्न करता, तेंव्हा ते तिघेही खुश असतात! कारण देश कि...

पुन्हा नव्याने सुरुवात करूयात का ?

जुलै पासून एकही ब्लॉग लिहिलेला नाही, फेसबुक-ट्विटर पूर्णपणे बंद आहे, सोशल मिडिया सोडा - कॉल सुद्धा घेणं बंद आहे... मेसेजचा बॉक्स रोज तीन-चारदा खणखणतो... काळजीने विचारणारे मेसेजेस येतात...  याचं कारण कुठलंही सिरीयस नाहीय... ना मला कोरोना झाला... ना अजून काही... मी ठणठणीट आहे... कोरोनाच्या स्पाईक मध्ये सुद्धा काही काळजी घेऊन सेफ राहिलोय... ! कारण असंय :  माझं एक वर्षाचं  लेकरू एक मिनिटही शांत बसत नाही, आणि मला कामाव्यतिरिक्त असलेला सगळा वेळ फक्त त्याला द्यावा लागतोय...  त्याच्या समोर फोन किंवा पीसी उघडला तरी तो त्याच्या बोर्ड वर पायाने दणादण आपटतो... आणि या गोष्टीची मला धास्ती बसलीय... लॉकडाऊनमुळे ऑफिसला जाऊन काम करू असंही शक्य नाहीय...!  कोरोनाने अख्खं वर्ष खाल्ल्यानंतर आलेली मरगळ सुद्धा बराच प्रभाव टाकणारी ठरली. ती  मरगळ झटकून कुठेतरी नव्याने सगळं सुरु करायचंय... पूर्वपदावर आणायचंय, आणि म्हणूनच १६ जानेवारी २०२१ पासून नवी सुरुवात करतो. बाकी काळजी नसावी....!   - तेजस ! 

SayNoToLockdown

(राजकीय मताचा चष्मा उतरवूनच वाचा...) मार्च ते जून लॉकडाऊन केल्यानंतर, उद्योगधंद्याचं श्राद्ध घालून आणि सगळं विस्कळीत होवूनही जर जुलैमध्ये परत लॉकडाऊन लावावं लागत असेल तर तर ते मोदींपासून, उद्धव ठाकरेसकट आपल्या शहराच्या महापौरापर्यंत सगळ्यांचं अपयश आहे...! ... मोदी, ठाकरे येतात - भाषण देतात - जातात, रिकव्हरी प्लान, बाहेर पडण्याचा रोडमॅप कुणाकडेही दिसत नाहीय... पंधरा पंधरा दिवसाची स्किपींग सुरु आहे एवढंच दिसतं. प्रामाणिक विचार केला तर केंद्र असो वा राज्य, पहिला पेशंट सापडल्यापासून अक्षम्य चूका झाल्यात..एअरपोर्ट स्क्रिनींग कमी पडलं, धोका ओळखण्यात चुक झाली, लॉकडाऊन लावतांना मिसमॅनेजमेंट झालं...! राज्यातल्या तिघाडी सरकारचा प्रश्नच नाही... तिथे एक से एक नग भरलेय... स्थानिक प्रशासन हौस म्हणून लॉकडाऊन लावतं, त्यावर कुणाचा कंट्रोल नाही... जिल्हाधिकारी-पोलीस राजे झालेय... गोंधळ गोंधळ गोंधळ घातला जातोय. ... बेशुद्ध पडलेले उद्योगधंदे बघितल्यानंतर इमॅजनरी मधुन जेव्हा फॅक्टवर येतो तेव्हा कळतं...! उद्योग परत सुरु करायचे तर रिस्टार्ट करण्यासाठी किती धडपडा असेल आणि त्यातही किती आधिकारी, मंत...

गुरुपोर्णीमा २०२०

Image
आस्तीक-नास्तीकच्या गोंधळा पलीकडे, तर्कविज्ञान आणि शास्त्र यातल्या रेषा बोथट झाल्यानंतर एक गोष्ट पटलीय, ती म्हणजे गुरुंशिवाय आयुष्याला अर्थ नाही...! भवसागरात आयुष्याची नौका हिंदोळे घेते, वादळं सहन करते, पण भरकटत नाही, खडकावर आपटून फुटत नाही - गुरु त्या नौकेला पार लावतात... मार्ग दाखवतात, फक्त विश्वास असावा...! तिथे तर्क चालत नाही, शास्त्राचे नियम चालत नाही, मोजमाप तर नाहीच नाही...! हा मार्ग तर्काचा नाही, अनुभवांचा, आणि अनुभूतीचा आहे...!  ... गुरुस्थान अशी एक जागा आहे जिथे आपल्या मनातला प्रश्न सहज मांडता येईल, उत्तर मिळेल याची खात्री असेल, ते आपल्याला चुकू देणार नाही याची माहिती असेल, आपण आपल्या कर्मानं चुक केली तर तडाखा बसेल याची भिती असते. ती शक्ती आपल्यावर सदैव लक्ष ठेवून आहे ही जाणीव आणि आपल्याकडे सदैव लक्ष ठेवून आहे हा विश्वास असतो...! "मी" पणाचा फसवेपणा त्यांच्यासमोर क्षणार्धात गळून पडतो - खरं तर "मी" असा उरतच नाही, एकरूपता येते... मोक्ष मिळाल्यानंतर निर्विकार मन होत असावं, गुरुसानिध्य त्या निर्विकार, एकरुप मनाची जाणीव करून देतं...! ... आ...

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved