= Valentines Day = गाडी, मोबाईल बदलवण्यापेक्षा हल्ली घरातला सोफा, कपाटं वगैरे बदलवण्याचे विचार येताय, कधी नव्हे ते किचनमध्ये घुसून काय कमी काय जास्त याची चाचपणी सुरुय, डिनर सेट्स घेवूयात कां अजून ? इथला फ्रिजपण जरा मोठा घ्यावा लागणारे, आत्तापर्यंत वनबीएचके खूप वाटायचा, एकट्याला मेंटेन करणं - आता पुढच्या वर्षापर्यंत थ्रीबीएचके कसा घेवू शकतो याचं प्लानिंग सुरुय, घरात लाईटबिल असतं, महिन्याचं फूड वगैरे आणावं लागतं, शॉपींग करावी लागते, हे ही हायलाईट होतंय... हल्ली आम्ही फोनवर बोलतांना, सेविंग्स - घर यावरच बोलतो... हातातल्या पैशांची मुक्तहस्ते उधळण करणारा मी, आता एक एक रुपया वाचवतोय - .. काल तिला विचारलं - काय घेऊ तुला व्हॅलेंटाईन्सचं गिफ्ट ? मला वाटलं एखादा नेकलेस, परफ्यूम्स, मोबाईल किंवा अजून वेगळं काहीतरी मागेल.. तिने तिला आवडलेलं Wind Chain मागितलं.. ते आपण आपल्या घरात लावू ... त्यानी पॉजिटीव्ह वेवस् येतात... .. हल्ली ती - मी नाही, "आम्ही" म्हणून विचार करतो. .. तेजू, यालाच तर संसार म्हणतात... पोटाच्या वर डावीकडे वेवस् आणणारी फिलींग... ! त्यातला क्षण न क्षण,...