मुंबई रिवर एन्थम समीक्षण Mumbai River Anthem


सौ. अमृता देवेंद्र फडणवीस यांनी गायलेलं, आणि मुख्यमंत्री फडणवीस, वनमंत्री मुनगंटीवार यांची भूमिका असलेलं "मुंबई रिवर थिमसॉंग / एंथम"...
..
गाण्याची सुरुवात जराss बोअर होते... वर्षा बंगल्यात पेपर वाचत बसलेल्या सौ. सीएम आणि त्यांची मुलगी ... इथे त्यांचं पेपर धरून शून्य नजरेत बघत बसण्यात आणि त्या लहान मुलींच्या चेहऱ्यावर कुठेतरी कृत्रीमपणा वाटतो.. River rejuvenation awareness campaign वाचून त्या एकदम नदीकाठी पोहचतात... 
..
अमृता फडणवीसांच्या आवाजाला शास्त्रीय संगीताचा बेस आहे - मूळ आवाजात वजन, जडपणा जाणवतो... गंभीर प्रकृतीच्या गाण्यांना साजेसा आवाज आहे त्यांचा... सहज सांगायचं तर "परदेसी परदेसी जाना नही...", "सब कुछ भूला दिया", "जिंदगी मे कोई कभी आये ना रब्बा..." सारख्या बेसचे गाणे गाण्यासाठी त्या परफेक्ट आहेत... सबब : या गाण्यात त्यांचा आवाज पहिला मिनिट मिसमॅच वाटतो... पण पुढच्या तीस सेकंदात त्यांचा आवाज कानात बसला, म्हणजेच कानाला सवय झाली, त्या आवाजाला म्यूजिक मॅच झालं आणि कोरस मिळाली... सुसह्य वैगेरे झाला की गाणं आणि व्हिडीयो मस्त पकड घेते... "चल चल मुंबई सभी चल... कहता है नदीयोका जल... आज अगर हम मिल जाऐ... तो बेहतर होगा कल..." ते लक्ष्य मधलं गाणं आहे ना... यही रस्ता है तेरा... त्याचं म्यूजिक सेम जाणवतं यात....
..
लोकेशन्स एका पेक्षा एक घेतलंय... शुटींग जबरदस्त... मानवी रिंगण आणि बर्डआयव्ह्यू ने ते मस्त दिसतं... एक एक माणूस, पोलीस, अधिकारी, डबेवाले, कोळी, महिला, लहान मुलं या मोहिमेत जोडलेले दिसतात... मग मुख्यमंत्र्यांची एंट्री होते...
..
सोनू निगमचा आवाज... आणि पाय एका जागी ठेवून फक्त हात आणि ओठ हलवणारे मुख्यमंत्री... नजर आपसूक ओठांची हालचाल आणि गाण्याचे बोल यातल्या १ सेकंदाच्या फरकावर खिळते... डोळ्याची पापणी न लावता एकटक कॅमेरा कडे बघताय... अभिनयाचं प्रचंड दडपण त्यांना असावं.. आणि त्यामुळेच अभिनय सहज न होता कृत्रीम होतो - सेम गोष्ट मुनगंटीवारांबद्दलही झालीय... हौस म्हणून अभिनय, त्यातली मौज पण ते निभावतांनाचं दडपण असं मिश्र भाव दोघांच्याही चेहऱ्यावर स्पष्ट दिसतात...
..
अमृता फडवीसांचा अभिनय, डान्स स्टेप्स उत्तरार्धात मुख्यमंत्र्यांच्या अभिनयापुढे नैसर्गिक वाटतं... गाणं कोरसच्या, म्युझिकच्या साथीनं शेवटी शेवटी प्रभावित करतं...!
..
उत्तम प्रयत्न ...!
माझ्याकडून संगीत, लोकेशन्स याला १.५, अमृता फडणवीस यांचा अभिनय, नृत्य याला १ - गाण्याला अर्धा, आणि मुख्यमंत्री आणि वनमंत्री यांच्या अभिनयाला "उत्तेजनार्थ" अर्धा ... असे ३.५ स्टार...!... थोडक्यात : नाहीपेक्षा बरं झालंय... उगाच वाईट का म्हणा कलेला ?

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved