मराठी भाषा दिन २०१८
जोपर्यंत ठेच लागल्यावर "आई गं" आणि ट्रक समोर आल्यावर "बाप रे" च मनात येईल तोपर्यंत मराठीची काळजी नाही...!
..
इंग्रजी पुस्तकं वाचतो, इंग्रजी सिनेमे बघतो, उर्दु शायरी - हिंदी गाणी ऐकतो... बोलतांना माझे बरेच शब्द गुजराथीत येतात, तरीही त्या इंग्रजी-हिंदी-उर्दू-संस्कृत-आहिराणी-गुजराथीचं आकलन मराठीतच होतं, मनात प्रतिक्रीया मराठीतच येते ...
.
मराठी लिहीता - बोलता येणाऱ्या सगळ्यांना शुभेच्छा ...
न आणि ण, ळ आणि ल, ट/त्र आणि ञ, श आणि ष, जगातला ज - जनावरातला ज, बषणार आणि बसणार, नाही आणि नाय यांतला फरक कळणाऱ्यांना विशेष शुभेच्छा...
..
हिंदी - उर्दू - मोडी - संस्कृत - इंग्रजी आणि इतर प्रांतिक भाषांत प्रचंड साहित्य आहे, ते मराठीत भाषांतरीत करण्यासारखं बरंच मोठं कामही आहे ... इतर लफड्यांत वेळ घालवण्यापेक्षा ते काम केलं तर दर्जा सुधारेल... आपलाच... भरपूर वाव आहे...
..
मराठीची सुरुवात स्वतःपासूनच व्हावी...
जानू - बाबू - डार्लींग - स्विटहार्ट - मायलव्ह पेक्षा
प्रिये, प्राणप्रिये, माझी ऋदयसम्राज्ञी वगैरे शब्द रुळायला हवेत...
..
आलू पराठा आणि बटाट्याचा पराठा, नऊवारी आणि नऊवारी साडी यांवरुन महायुद्ध झालंय... मी मराठीच्या बाजूने लढलो !