Valantines... Sansaar
= Valentines Day =
गाडी, मोबाईल बदलवण्यापेक्षा हल्ली घरातला सोफा, कपाटं वगैरे बदलवण्याचे विचार येताय,
कधी नव्हे ते किचनमध्ये घुसून काय कमी काय जास्त याची चाचपणी सुरुय,
डिनर सेट्स घेवूयात कां अजून ?
इथला फ्रिजपण जरा मोठा घ्यावा लागणारे,
आत्तापर्यंत वनबीएचके खूप वाटायचा, एकट्याला मेंटेन करणं - आता पुढच्या वर्षापर्यंत थ्रीबीएचके कसा घेवू शकतो याचं प्लानिंग सुरुय,
घरात लाईटबिल असतं, महिन्याचं फूड वगैरे आणावं लागतं, शॉपींग करावी लागते, हे ही हायलाईट होतंय...
हल्ली आम्ही फोनवर बोलतांना,
सेविंग्स - घर यावरच बोलतो...
हातातल्या पैशांची मुक्तहस्ते उधळण करणारा मी, आता एक एक रुपया वाचवतोय -
..
काल तिला विचारलं -
काय घेऊ तुला व्हॅलेंटाईन्सचं गिफ्ट ?
मला वाटलं एखादा नेकलेस, परफ्यूम्स, मोबाईल किंवा अजून वेगळं काहीतरी मागेल..
तिने तिला आवडलेलं Wind Chain मागितलं.. ते आपण आपल्या घरात लावू ... त्यानी पॉजिटीव्ह वेवस् येतात...
..
हल्ली ती - मी नाही, "आम्ही" म्हणून विचार करतो.
..
तेजू, यालाच तर संसार म्हणतात...
पोटाच्या वर डावीकडे वेवस् आणणारी फिलींग... !
त्यातला क्षण न क्षण,
"माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे"
हे बोलून नव्हे तर कृतीतून दाखवून देण्यासाठी असतो...
समजून घेण्यासाठी - सांभाळून घेण्यासाठी असतो !
मला काय आवडतं ? यापेक्षा तिला कसं आवडतं -
किंवा तिला स्वतःला काय आवडतं यापेक्षा मला काय आवडेल याचाच विचार असतो ....
..
एक दिवसाचा व्हॅलेंटाईन नाही, हा अख्ख्या जन्माचा संसार असतो...!
..
तेजस ... तेजस्विनी
सहजीवनाच्या उंबरठ्यावर ...
एक एक पाऊल त्या दिवसाकडे चालतोय...!
..
दोघांचं प्रेम : मनापासून केलं आणि प्रामाणिकपणे निभावलं... !
नशीबवान असणं यापेक्षा वेगळं नसावं !
*Touchwood**