RIP जेटली

सुषमा स्वराज, पर्रीकर, मुंडे, अनंथ कुमार, प्रमोद महाजन आणि आज जेटली !
भाजपाचे हे चेहरे कमी वयात गेले... सगळे एकापेक्षा एक विद्वान, प्रकांड पंडीत असलेले... !
त्यांच्या निधनाचं दु:ख झालं कारण त्यांचे पाय जमीनीवर होते. ते तत्वाने जगले... !
भाजपाच्या जडणघडणीत या मंडळीँनी आयुष्य वेचलंय... संघाची बळकट माणसं होती ही.
.
अर्थमंत्री आणि मिनिस्ट्री ऑफ कार्पोरेट अफेअर्स म्हणून जेटलींचे काही निर्णय वैयक्तीक न पटणारे होते. पण तो एक भाग सोडला तर त्यांची विद्वत्ता, वत्कृत्व, भाजपाच्या वरच्या फळीतलं नेतृत्व आणि कायद्याचं ज्ञान याला तोड नाही... संसदेत बोलायला उभे राहीले की विरोधकही बेँच वाजवायचे... ! कॉँग्रेसच्या बऱ्‍याच नेत्यांची मुलं जेटलीँकडे इंटर्नशीप केलेली...! ते कायद्याचं विद्यापीठ होते.
मोदीँनी नोटबंदी, जीएसटी, बॅँक मर्जीँग असे भव्य निर्णय जेटलींच्या भरवश्यावर घेतलेय. जेटली भले मास लिडर नव्हते, पण भाजपाचं पान त्यांच्याशिवाय हलणारं नव्हतं.
.
अरुण जेटली भाजपासाठी थिँक टॅँक होते. भाजपाची इंटलअॅक्च्यूअल प्रॉपर्टी होते... भाजपाच्या मूळ तत्वाचा चेहरा अरुण जेटली होते... ! भाजपासाठी ते संकटमोचक होते. क्रिकेटमध्ये राहूल द्रवीड जसं थंड डोक्याने चिकडपणे खेळून मॅच जिँकवायचा, अरुण जेटली सरकारसाठी, भाजपासाठी तसंच द वॉल म्हणून ठरायचे ! जेटलीँनी भारतीय क्रिकेटलाही वळण लावलंय.
.
भाजपाने सत्ता भले मिळवलीय, पण हे पंधरा दिवस अत्यंत वाईट ठरले. दोन खांब निखळले... कुठेतरी ते जाणवेलच ! मोदी शिखरावर आहेत - त्यांच्या पाया या हिऱ्‍यांनी रचलाय. मूळ भाजपाचा पाया खचलाय... !
.
जेटलीँना भावपूर्ण श्रद्धांजली !

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved