= बहीण =


काही गोष्टीँना रक्ताच्या नात्याचं कंम्पलशन नसतं... ते कुठेही फुलतं, घट्ट होतं... टिकतं... काही नाती अशीच आयुष्यात आली, बहरली... रक्ताच्या नात्यांइतकीच ती नाती घट्ट झाली... कदाचित कणभर जास्तच !
.
ही नाती कुठे जुळली कशी जुळली हे आता निट आठवतही नाही... पण वीण घट्ट आहे.
.
पुण्यातल्या मंगेशकर हॉस्पिटलमध्ये तिच्या वडीलांची ट्रिटमेँट सुरु होती आणि त्यात कुठलीशी फॉर्म्यालिटी करण्यासाठी ओळख हवी होती. तिचा मला फोन आला, फॉर्म्यालिटीज पुर्ण झाल्या. पुढच्या रक्षाबंधनाला राख्या आल्यात. वैयक्तीक नातं कौटूंबिक झालं... ! ७ वर्षाँपासून आता दर रक्षाबंधनाला राख्या येतात. दर आठवड्याला फोन येतात. तिला माझ्या घरी सख्ख्या मुलीप्रमाणे समजतात... तिच्या नवऱ्‍याविषयी सख्या मेव्हण्यासारखा आदर वाटतो... सख्खी मोठी बहीण असती तर तिने जो जीव लावला असता तोच सायलीदिदी लावतेय... ती कुणालाही सांगतांना तिला तीन भाऊ असल्याचं सांगते...! नशीबानं मिळतात काही गोष्टी.. !.
.
मयुरी-वर्षा... नाशिकच्या दोघी बहीणी. कुठे ओळख झाली, कधी झाली आठवत नाही... राखीसाठी येतात, भाऊबीजेला येतात. कुटूंबही एकमेकांशी दुधात साखर एक व्हावी तशी झाली... नातं शोधलं तर कुठे ना कुठे लिँक लागेलंही, पण त्यांच्या घरी आम्हाला, आमच्या घरी त्यांना आपलं घर वाटतं... हक्काने येतो जातो... दोघीपैकी एकीचं काही महीन्यांपूर्वी लग्न झालं, माझ्या आई-पप्पांनी तिच्या आईपप्पांसोबत बसून कन्यादान केलं...! अजून काय डिटेल्स हवेय ?
.
रक्ताच्या नात्यांइतकंच, किँवा त्यापेक्षा जास्त हे मनानं बांधलेलं नातं घट्टं आहे. निस्वार्थ, निरपेक्ष, कुठलेही हेवेदावे नसलेलं... ! आयुष्यभर टिकणारं नातं आहे हे... कुठल्यातरी जन्माची पुण्याई अशी समोर येते...
.
रक्ताच्या बहीणी आहेत - सायली, सारीका, राजश्री, विशाखा, सानू-गड्डू, केतकी...
यांच्याबरोबर त्या तिघीही जवळच्या वाटतात... हक्काच्या वाटतात... हक्काच्या आहेत...
मावस, चुलत, मामे, सख्खं वगैरे नात्यांचं विशेषण नसल्याने फक्त "बहीण" असलेल्या...!

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved