सुषमा स्वराज

जाणारं माणूस जातं,
नंतर उरते ती भयाण शांतता. अनेक प्रश्नांचं काहूर मनात साचत जातं - ज्यांची उत्तरं कधीही मिळत नाहीत !
सुषमा स्वराज यांच्या जाण्यानं देश हळहळला.
पण आज एका माणसावर नियतीने जो घाला घातलाय त्याची कल्पनाही आपण करु शकत नाही.
.
ते म्हणजे सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल !
.
निवडणूकांपूर्वी जेव्हा सुषमाजीँची मुलाखत झाली तेव्हा त्यांनी पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देतांना "आता माझा पुर्ण वेळ पती, कुटूंबिय यांना देणार" असं जाहीर केलं. ट्विट पण होतं. त्यावेळी त्यांचे पती तिथे होते. प्रचंड आनंद होता त्यांच्या चेहऱ्‍यावर... त्यांनी सुद्धा ट्विट, टिव्ही यांना मुलाखत देऊन आपला आनंद व्यक्त केलेला.
.
केँद्रात मंत्री असणारी पत्नी - त्यामूळे समाजकारणाभोवती केँद्रीत झालेला संसार, प्रोटोकॉल्स, शेड्यूल यांत कौटूंबिक गोष्टीँचा त्यागच करावा लागतो. सुषमा स्वराज यांच्या राजकीय निवृत्तीने त्या माणसाला मनापासून आनंद झालेला. राजकारणामूळे हरवलेल्या क्षणांना परत मिळण्याचं सुख त्यांच्या चेहऱ्‍यावर दिसत होतं.
.
नियतीला ते बघवलं नाही.
आत्ता तर संसार सुरु झालेला, इतक्यात संपला !
कालचा दिवस त्या माणसाच्या स्वप्नांना चक्काचूर करणारा ठरला... ! दुर्देव ते हेच !
.
देहाने जाणारा माणूस मन मात्र अनेकांचं घेवून जातो. नंतर उरतात त्या भग्न आठवणी आणि त्या आठवणीँची पिसं जपत मागे येणारे अनेक मृतवत शरीरं !

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved