Posts

Showing posts from 2014

Hindu vs

कट्टर हिँदूत्व ईद किँवा नाताळला सुतकी थोबाड करुन बसलं की प्रगट होतं कां ? इतर धर्मीयांच्या सणाला किँवा इंग्लीश न्यू इयरला शुभेच्छा दिल्यानं आमचा धर्म भ्रष्ट होतोय कां ? जे "कट्टर हिँदुत्ववादी" आहेत त्यांचे व्यवहार तिथीप्रमाणे चालतात कां ? वाढदिवस तिथीला साजरा करतात कां ? घरात भिँतीवर कालनिर्णय ऐवजी पंचांग लटकवतात कां ? इंग्लीशऐवजी संस्कृत बोलतात कां ? टेबल मॅनर्स पाळत नाहीत कां ? हात पाय दुखतांना कमोड ऐवजी भारतीय टॉयलेटच वापरतात कां ? जमीनीवर बसूनच जेवण करतात कां ? प्रहर पद्धतीचे कालमापक वापरतात - घड्याळ वापरतच नाही ? रोज न चुकता मंदीरात जातात ? घरी पूजा करतात ? हिँदू आचारसंहीता पाळतात ? जर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं "हो" असतील तरच तुम्हाला आम्ही "कट्टर हिँदूत्व" पाळतो असं म्हणायचा नैतिक आधिकार आहे... आणि तरंच दुपारच्या फोटोवरुन मला अक्कल शिकवायचा...!! जे ईदच्या वेळी म्हणालो तेच म्हणतो - वर्षानुवर्षे आमच्या आयुष्याचा भाग झालेले इतर धर्मीय असलेले शेजारी, मित्रमैत्रीणी यांना मी त्यांच्यातल्या थोड्या नालायक लोकांसाठी तोडू शकत नाही

असंही "स्वच्छ भारत अभियान'' ::

असंही "स्वच्छ भारत अभियान'' :: इतक्यातच नारायण पेठेत रस्त्याच्या कडेनं तोँडात बूचका भरुन चालणारा एकजण मध्येच थूंकला. रस्त्यावर ! लोकांच्या अंगावर उडेल याचा विचार न करता. ती घाण काहीशी माझ्या गाडीच्या पुढच्या चाकावर, मडगार्डवर उडाली... अस्मादिकांचं टाळकं सटकलं...!! आता याला घ्यायचाच कोपच्यात !! ऐन नारायण पेठेत... ऐ xxx थांब !! धुळ्याच्या भाषेत थांबवला. तोपर्यँत अष्टभूजाचा चौक आलेला. एस.पी.त एम ए मराठी, रानडेत एमसीजे, ललितकला मध्ये ड्रामासायंस करणाऱ्‍या आमच्या गृपचा एकत्र कट्ट ा. सगळी पोरं तिथंच !! बस्स !! त्याला थांबवला. सगळ्यांनी मिळून पेठेच्या पुणेरीत मोदीँचं स्वच्छ भारत अभियान व्यवस्थित समजावलं... गुटखा खाल्ल्यानं वैकूंठधाम बूक करावं लागेल हे पटवलं, पार रडकूंडीला येईपर्यँत अर्धा पाऊण तास लेक्चर दिलं आणि स्वच्छ भारत च्या धर्तीवर "स्वच्छ पल्सर" करण्यासाठी वॉशिँग चार्ज रु. मात्र पन्नास भरपाई वसूल करुन सत्कारमुर्तीँना रवाना केलं. अस्मादिक आता बाईक वॉशिँग सेँटरला बसून गाडीचा वॉशिँगसाठी नंबर येण्याची प्रतिक्षा करताय.

लक्ष्मणायण : :

Image
लक्ष्मणायण : : रामायण मुख्यत: रामांचा वनवास, पितृप्रेम, एकपत्नीव्रत सितेची पतीनिष्ठा, त्याग, कौसल्येचं पुत्रप्रेम आणि भरताचं बंधूप्रेम याभोवती गुंफलं गेलंय...!! पण केँद्रस्थानी राम असता लक्ष्मण आणि त्यांचं कुटूंब दुर्देवाने झाकोळलं गेलंय... किँबहूना त्यागाच्या दृष्टीनं त्यांचं कार्य रामांपेक्षाही मोठं आहे. १. लक्ष्मणांनी रामांबरोबर वनवास भोगला. त्यांची सेवा केली. तितकाच त्रास, दु:ख सहन केलं. (यादरम्यान लक्ष्मण तत्वत: एकटेच होते. रामांबरोबर सीता आणि लक्ष्मण होते.) २. कौसल्येप्रमाणे सुमित्रेनेही आपला पुत्र १४ वर्ष दूर ठेवला. परंतू त्या माऊलीचा त्याग कौसल्यांपुढे कां झाकोळला जावा ? ३. लक्ष्मणपत्नी उर्मिला ! एकमेकांपासून १४ वर्ष दूर राहणाऱ्‍या या दांपत्याच्या प्रेमाने विश्वासाचे एक उदाहरण निर्माण केले. एकपत्नीव्रत राम तसंच एकपत्नीव्रत लक्ष्मण का म्हणू नये ? उर्मिलेचा त्याग सीतांपुढे झाकोळला गेला. त्यांच्या वाट्याला न्याय आलाच नाही. ४. भरतांच्या बंधूप्रेमाचं उदाहरण दिलं जातं. पण त्याचवेळी शत्रुघ्नपण आपल्या सख्ख्या भावाच्या प्रेमापासून वंचित होते याचा साधा उल्लेखही नाही. (लक...

Why Lost RAJ Thakrey ?

Image
राज ठाकरे कां हरले ? १० मुद्दे १. वायफळ बडबड : मी असं करेन, मी तसं करेन यासह भ आणि उ चा यथेच्छ वापर, सभांमधील भाषणात ट्रॅक सुटणारे मुद्दे, उर्मट भाषा यांमुळे सुशिक्षित मतदारांनी नाकारलं. २. पळकुटेपणा : "हा राज ठाकरे स्वत: निवडणूकीला उभा राहणार" अशी गर्जना करुन हवा भरली, पण घोडा मैदानात पोहचतात मैदान सोडून पळाले. त्याबद्दल पत्रकारांनी विचारलं तरी चिडायचे. ३. पत्रकारांशी उर्मट वर्तन : जे पत्रकार प्रसिद्धी देतात त्यांना उद्धटसारखं फटकारणं राज ठाकरेँच्या अंगाशी आलं. आपण खूपच ग्रेट आहोत त्यामुळे कोणालाही फटकारु शकतो या भ्रमात त्यांनी पत्रकारांशी पंगा घेतला आणि त्यामुळे त्यांचा निगेटीव्ह अॅँगल लोकांसमोर आला. ४. उमेदवारांबद्दल गोँधळ : मतदारसंघात योग्य उमेदवार न देता माहीत नसलेले चेहरे उतरवले. त्यामुळे ८० टक्के लोकांचं डिपॉजिट जप्त व्हायची दुर्देवी वेळ आली. शिवाय उमेदवारांशी भर सभेत उर्मट वर्तन लोकांनी पाहिलंच. ५. नाशिक महापालिका : नाशिकबद्दल विचारल्यानंतर कधीच योग्य उत्तर देवू शकले नाहीत. पत्रकारांवर खेचकून वेळ मारुन नेण्याची धडपड पकडली गेली. नाशिक मधल्या विकासकाम...

Maharashtra Election 2014

निकालाबाबत माझं वैयक्तिक विश्लेषण १. भाजपा : मोदीँच्या २७ सभांनंतर, इतक्या मोठ्या प्रमाणातल्या प्रचारानंतरही पूर्ण बहुमत न मिळणं हा मोदी आणि शहांचा माझ्या दृष्टीने पराभवच आहे. २. उद्धवसेना : सपाटून आपटले. फुगा फुटला. ५९ जागा फक्त बाळासाहेबांची पुण्याई आणि स्थानिक राजकारणावर निवडून आल्या. उद्धव ठाकरे सपशेल फोल ठरले. त्यांच्यात नेतृत्वक्षमता नाही हे सिद्ध झालं. ३. राजसेना : नापास. पूर्णपणे नापास. बोलबच्चनगिरी, उद्धटपणा लोकं नाकारतात, घरी पाठवतात याचं उदाहरण दिलं. राज ठाकरेचा अॅटिट्यूड नडला. ४. दोन्ही कॉँग्रेस : दोघांना इतक्या घोटाळ्यांनंतरही एकत्रितपणे ९५ जागा मिळाल्या. निवडूंगाची मूळं पकडून आहेत. आणि ठराविक जनाधार आहेच आहे. दोघांचा बेस पक्का आहे. दोन्ही कॉँग्रेसचा परफॉर्मन्स खूप चांगला झाला. हार होवूनपण दुर्देवीरित्या जिँकले. ५. MIM ची एंट्री अति धोकेदायक. भाजपा, सेनेने गांभिर्याने योग्य धडा घ्यावा. ओवेसी भयानक हिँदूद्वेष्टा आहे. Thats all !!

Dasara 2014

Image
दर दसऱ्‍याला प्रधान आजोबांकडे जाणं - चहा विद मारिगोल्ड कुकीज यांचं सेवन आणि लाखमोलाचे आशिर्वाद घेणं हा माझ्यासाठी अनेक वर्षाँचा ठरलेला पायंडा... आजची गोष्ट - चहा विद कुकीज व्हाया महागुरुंच्या नवीन चित्रपटाचं मौखीक समिक्षक असा दसऱ्‍याला साजेशा कार्यक्रम सुरु असतांनाच - आजोबा -- "तेजस, आज मी तुला खरोखरचं "सोनं" देणारे... खरं सोनं... (हातातला कप हातात, कुकीच चहात, मी  :-O   :-O   :-O  हा अस्सा... खरं सोनं ??  :-O   :-O  ) आजोबा आजीँना -"अगंsssss... ते घेवून ये..." आणि हातात भलामोठा बॉक्स घेऊन आज्जी अवतरल्या... मी Shockkk... इतकं ? इतकं ?? आजोबा माझ्यावर इतके का प्रसन्न वगैरे झाले ?? आजोबांनी तो बॉक्स उघडला आणि माझ्याकडे सोपवला. OMG... wow... yesss... yes !! त्यात खरंच सोनं होतं... अस्सल... शंभर नंबरी पु.ल. देशपांडे, आचार्य अत्रे, व.पु., विँदा, कुसुमाग्रज, खांडेकरांची मिळून तब्बल ३२ दुर्मिळ पुस्तकं... आणि पी. सावळाराम, लतादिदी, आशाताई, बाबूजींच्या अप्रतिम गाण्याचं कलेक्शन असलेल्या ७ डिव्हीडी.... :-):-):-):-):-) हा तर अरबोका खजाना......

Latadidi Birthday

Image
भगवती सरस्वतीच्या लता मंगेशकर या अवताराचा आज ८५ वा प्रगटदिन... दिदीँच्या स्वरांना गणेशाची तबल्यावर साथ आणि त्यातूनच प्रकटला अद्त्भूत नाद... स्वरांची देवता लतादिदीँना उदंड उदंड उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या स्वरमयी सहवासात आमचं आयुष्य संगीतमय हो... Happy Birthday Didi... :-):-):-) (दिदीँच्या पहील्या साक्षात दर्शनाने सुगंधित झालेला माझ्या आयुष्यातला एक सुवर्णक्षण... माझ्या डायरीतून) .....दिवाणखाण्यात सोफ्यावर बसून पुरस्कारांचं शोकेस, भिँतीवरचे फोटो न्याहाळत एक एक क्षण मोजत लतादिदीँची वाट बघणं सुरु होतं... इतक्यात केतकी किँचाळलीच अरे दिदी आल्या... आणि आम्ही सगळे लटपटत उभं राहीलो... साक्षात सरस्वती समोरुन येत होत्या... साक्षात लता मंगेशकर... सगळे भाव चेहऱ्‍यावर गर्दी करत होते... खरंच लतादिदी आहेत... आणि क्षणात डोळ्यातून घळघळ पाणी येणं सुरु झालं... हाच तो क्षण ज्यासाठी जन्माला आलो... "बसा बसा"... इतकंच काय ते मला ऐकू आलं... काही क्षण लागले सावरण्यासाठी आणि नंतर जाणवलं, यस्स्स, हे खरंय, मी खरंच साक्षात लतादिदीँसमोर उभा आहे........ 

Engineers Day 2014

अगदी सगळ्याsssच गोष्टीत "रात्रीचा दिवस" करुन, स्वत:च्या हुष्ष्षारीचे किस्से रंगवून सांगत, "जगण्यात थ्रिल नाय रे च्यायला" म्हणत "नाईट शिफ्ट" करतांना नको त्या गोष्टीँचा "किस (:-P;-))" पाडत भन्नाट भन्नाट गोष्टी घडवणाऱ्‍या, (घडवता घडवता बिघडलं तरी ते "कोपच्यात" टाकणाऱ्‍या) C, C++, Java, sql /सिमेँट, सॅन्ड/मशिन्स आणि कॉफीवर बायकोपेक्षा (or गर्लफ्रेँडपेक्षा) जास्त प्रेम करणाऱ्‍या, पोट सुटलंय, जाड झालाय आणि फक्त छान दिसतो म्हणून चष्मा लावणाऱ्‍या वरुन अति सिन्सिअर पण आतनं तेवढेच बालिश, आगावू असणाऱ्‍या सगळ्या इंजिनियर्सना Engineers Day च्या खूप खूप शुभेच्छा... चांगलं पॅकेज, शेळपट बॉस आणि फाईव्ह डेज् विक... इतकं जरी मिळालं तरी बाकीचं आम्ही आमचं बरोब्ब्बर शोधून घेतो... :-D:-D hahaha... gud mrng ! Have a nice day !

Mahalakshmi 2014

Image
गेल्या तीन दिवसात गौरी-गणपतीचं माझ्या घरी वास्तव्य होतं. आज विसर्जन झालं. या तीन दिवसात भगवतीने तिच्या खऱ्‍या अस्तित्वाचे अनेक साक्षात्कार मला आणि माझ्या कुटूंबियांना दिले. गेल्या एकवीस वर्षात पहील्यांदा असं काही घडलंय. १. दि. २ : विहीत मुहूर्तावर प्रथेप्रमाणे लक्ष्मीची स्थापना झाली. स्थापना विधी पुर्ण झाला आणि लक्ष्मीची आरती सुरु झाली. तितक्यात त्याचक्षणी एक कुरीयर आलं. त्यात सिँदूरलेपन असलेला कोल्ह ापूरच्या महालक्ष्मीचा सुंदर फोटो मिळाला. from unknown sender. हा एक सुंदर योगायोग असावा असं वाटलं. २. दि. ३. काल संध्याकाळी माझ्या लहान भावाला आणि पप्पांना काही क्षणांसाठी लक्ष्मीच्या एका मुर्तीत साक्षात लक्ष्मीचं दर्शन घडलं. लक्ष्मी हसतेय आणि त्यामुळे तिच्या गालावर खळी आलीय, दागिन्यांना झळाळी आलीय, आणि तिची तेजोप्रभा सर्वत्र पसरलीय असं दिसलं. जे मला किँवा इतरांना दिसलं नाय. त्यांना ते अस्तित्व स्पष्ट जाणवलं. ३. दि. ४ : महालक्ष्मीसाठी वाटीत हळद कुंकु ठेवतात. ते ठेवतांना वाटी काठोकाठ आणि सारखी, सपाट करुन लक्ष्मीच्या मुर्तीमागे ठेवतात. साधारण कुणाचा हात लागणार नाही, दिसणार नाही अश्य...

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved