जावडेकर मिडीया ट्रायलचे बळी ?

छिंदवाड्यात जावडेकर जे बोलले ते जसेच्या तसे :
"कितने वीर... नेताजी सुभाष चंद्र बोस, सरदार पटेल, पंडीत नेहरु...
भगतसिंग, राजगुरु... **सभी जो फांसीपर चढे**... क्रांतीवीर सावरकरजी... बाकी महान स्वातंत्र्यसेनानी... ** कितनी लाठीया खायी... कितनी गोलीया खाई...**
.
भाषण नीट ऐकलं तर लक्षात येईल, नेहरू नंतर त्यांनी काही क्षण पॉज घेतला, ते वाक्य संपलं, नंतर भगतसिंग, राजगुरू यांचं नाव घेऊन " सभी जो फांसीपर चढे... असा सरळ शब्दप्रयोग आहे. यात "सभी..." म्हणजे जे जे फासावर गेले ते ते सगळे यांचा एकत्र उल्लेख आहे.... जर या पाच नावांनंतर "ये सभी" असतं तर होणारे आरोप ठिक होते... पण सरळ वाट असतांना मुद्दाम वाकड्या वाटेने मिडीया का जीव द्यायला जातंय... त्यात "फासी गये".... "कितनी लाठीया खायी... कितनी गोलीया खाई..."... हे "वैयक्तीक" त्या त्या लोकांसाठी आहे जे जे फासावर गेले... "किंवा"... गोळ्या झेलल्या... "किंवा"... काठ्यांनी मार खाल्ला...  आणि उर्वरीत महान स्वातंत्र्य सैनिक ... जे एकत्र एकाच वाक्यात जावडेकरांनी बसवलं नाही, ते मिडीया जावडेकरांच्या तोंडी दाबून दाबून बसवतेय !
.
साधा-सरळ-सोप्पा अर्थ आहे !
नेहरू, सावरकर, बोस फासावर गेले हे स्टेटमेंट कुठूनही निघत नाही.
.
एक चॅनेल काहीतरी बकतं, बाकीचे गाढवप्रेमी ओरडत बसतात... तो माणूस काय, कुठल्या अर्थाने बोलला हे समजून घ्यायची अक्कल नाही... त्याची छाननी करण्याची इच्छा नाही... फक्त एक ओरडलं की इतरांनी ओरडायचं...
.
जावडेकर प्रचंड हुषार, अभ्यासू आणि जबाबदार आहेत. केंद्रात मंत्री आहेत... अशी थिल्लर चूक ते चूकुनही करणार नाहीत हे नक्की होतं... त्यामुळे जरा लक्ष घातल्यावर मिडीयाचा वाह्यातपणा लक्षात आला !... निषेध !

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved