Independence Day 2016

स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्षात भारत "विकसनशील"च आहे... आणि "विकसित" होण्यासाठीचा प्रवास अजून खरं तर खूप मोठा आहे...
स्वराज्य मिळालं... सूराज्य होण्याचा हा प्रवास आहे...
.
त्यासाठी डोळ्याला झापडं लाऊन, वर्षानूवर्षे आहे तिच सिस्टीम रेटत वर्ष ढकण्यापेक्षा हे सगळं एका बिंदूवर थांबवून, कायदा-घटना-सगळी सिस्टिम, देश यांची अभूतपूर्व अशी नव्याने रचना करण्याची आणि त्यासह पुन्हा नवी सुरुवात करण्याची गरज आहे... कालबाह्य गोष्टींना कवटाळून ठेवल्यानेच सत्तरीतही जिथे विज्ञान-तंत्रज्ञान-समृद्धीवर-शोध यांवर चर्चा व्हायला हवी तिथे वीज, स्वच्छता, गावं, रस्ते, बेरोजगारी, गरीबी, आरक्षण यांवरच भाषण द्यावं लागतंय !
.
काही गोष्टी आधीपासूनच चुकल्यात...!
.
नेत्यांच्या मागे भाऊ-दादा करत तरुणाई आपली अक्कल गहाण ठेवणं जेव्हा बंद करेल तेव्हाच सूराज्याच्या दिशेने पहिलं सशक्त पाऊल टाकलं जाईल !
.
तोपर्यंत सालाबादाप्रमाणे स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा !
.
(प्रधानमंत्री दिड तासापासून अखंड बोलताय ! देशाविषयी, विकासासाठीची, शेवटच्या माणसासाठीची कळकळ जाणवते. आपलं भाग्य थोर, असं नेतृत्व मिळालं ! हा माणूस शंभर वर्ष आरोग्यमयी राहो ! )

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved