Relation and wedding

दिसायला सुंदर, आयटीमधली मुलगी बघून शॉर्ट टर्म रिलेशनशीपमध्ये लव्ह मॅरेज केलेल्या मित्राचं वैवाहिक आयुष्य ऑलमोस्ट खतरेमे है ! तो मित्र देशस्थ ब्राह्मण घरातला, स्वभावाने साधा आणि सरळ ! पाच आकडी कमावणाराय, वेलसेट आहे... ती मुलगी अतिमहत्वकांक्षी, अहंकारी वगैरे बोलण्यातूनच वाटते. ! दोन टोकं... दोघांचं कसं जमलं त्यांनाच माहित, पण फक्त वर्षभराचे राजा-राणी आता सेपरेशनच्या टोकावर बसलेय !
.
"तिला ऑफीस, प्रोजेक्टस्, कामाशिवाय दुसरं काहीच दिसत नाय रे तेजा.., ना घर, ना मी, ना होणारं बाळ ! " रडत रडत मन मोकळं करणाऱ्या मित्राला कसं समजावू कळत नाहीय ! अश्या गोष्टींत आपण गप्प बसून समोर आहे त्याला धीर देणं इतकंच सोप्पं असतं. सल्ला वगैरे चुकूनही देवू नाही...
त्याने तिला बऱ्याच गोष्टींत मोकळीक दिली होती, पण तिने गैरफायदा घेतल्याचं उघड उघड दिसत होतं...! ती चारचौघात त्याचा पाणउतारा करायची... वर्षभरात दोघांमधलं अंतर वाढत गेलं ! नवरा-बायकोत "मी" पणा घुसतोना,  तिथेच सगळं संपतं... कुणीतरी काहीतरी सोडावं लागतं !... कसंतरी गप्प बसवून त्याला पाठवलं ! वाईट वाटतंय... त्याचं प्रेम टू लग्न आणि आता सेपरेशन पण समोरच होतंय ! पण यावरुन मी एक गोष्ट पक्की ठरवली !
.
बायको भलेही आपल्यापेक्षा कमी शिकलेली असेल, तिला हे प्रोफेशनल मॅनर्स समजत नसतील तरी चालेल, जॉब वगैरेचा प्रश्नच नाही, पण शांत, समजूतदार आणि सांभाळणारी हवी... रॅदर मॅच होणारी ! मी तर घरी एम-पी-डी ना सांगून ठेवलंय, तुम्हीच शोधा आणि तुम्हीच ठरवा... नो धिस काईंड ऑफ लव्ह मॅरेज ! ... फक्त बाह्यरुपावर भाळून प्रेमात- बिमात पडायचं नाहीय ! That's All !

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved