Paluskar

एकदा एका  राजदरबारी मैफलीत यांचे गाणे होते  गाताना  त्यांना  सिगार चा    वास आला त्यांनी धूम्रपान करणाऱ्या माणसाला ते  थांबवण्यास  सांगितले. डोळे अधू असल्यामुळे  ती व्यक्ती कोण हे त्यांनी पाहिले नव्हते. ते  धूम्रपान करणारे स्वतः  महाराजा होता तसे त्याला सांगण्यात आले हा उद्गारला या गान  दरबाराचा  मी महाराजा आहे त्यांना सांगा धूम्रपान  थांबवा नाही तर निघून जा असा बाणेदार पणा दाखवणारे महान गायक आणि संगीत शिक्षण महर्षी म्हणजे विष्णू दिगंबर पलुस्कर होत.
भारतीय शास्त्रीय संगीतात  दिग्गज कलाकार आहेत, घराणेबाज  गायक आहेत, पण संगीताला प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचा  आणि हे संगीत गुरुशिष्य परंपरेच्या काहीश्या जाचक परंपरेतून मुक्त करण्याचा मान हा निः संशय पणे  विष्णू दिगंबर यांच्याकडे जातो  . कुरुंदवाड सारख्या छोट्या गावात जन्मलेला, अधू दृष्टी असलेला कलाकार  लाहोर मध्ये  जातो आणि  संगीत महाविद्यालय सुरु करतो हे विश्वास न बसणारे आहे गांधर्व महाविद्यालय या संगीत शिक्षण देणाऱ्या संस्थेची  निर्मिती करून संगीत ज्ञानाची  गंगोत्री या माणसाने सर्वसामान्य माणसाच्या माजघरात नेली.आणि विशेष म्हणजे कोणताही राजाश्रय वा अनुदान न  घेता.
ग्वाल्हेर घराण्याचा  हा गायक, बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांचा शागीर्द काही मतभेद झाल्यामुळे गुरुगृहातून  बाहेर पडला आणि  देशभर भ्रमंती करून शास्त्रीय संगीताचा सांस्कृतिक दूत बनला . ब्रिज भाषा आत्मसात करून यातील शैलीदार रचना   यांनी अभ्यासल्या .बहुतांशी चिजा या गायकीचा हेतू ठेवून  तयार  केल्यामुळे त्यातील भाषा सौंदर्याकडे दुर्लक्ष होत असे ही  त्रुटी  दूर  करून त्यांनी अनेक चिजा दुरुस्त केल्या ,नव्याने बांधल्या . अभ्यासक्रम आखून
संगीताची पुस्तके  निर्माण  करून , स्वरलिपी ला शैक्षणिक कोंदण देऊन विष्णू दिगंबर यांनी संगीत शिक्षणाला  (चांगल्या अर्थाने) औपचारिक प्रवाहात आणले आणि त्यातून  पदवी  ते पार प्रवीण (doctorate समकक्ष ) पर्यंत शिकण्याचा महामार्ग खुला केला  हे त्यांचे योगदान लोकोत्तर आहे
रघुपति राघव राजाराम  हे गांधींचे आवडते  भजन ही  त्यांचीच रचना ,काँग्रेस अधिवेशनात   म्हटले जाणारे   वंदे मातरम ही याच कलाकाराच्या मुशीतून घडले  होते
त्यांची जयंती झाली १८ ऑगस्ट ला आणि पुण्यतिथी आज म्हणजे २१ ऑगस्ट -विनम्र आदरांजली !

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved