Proud

काल कार्यक्रमात हिंदी गाणे ऐकायला येऊन बसलेला एक माणूस भेटला... मी आणि शेखर जिथे बसलो तिथे मागेच बसला होता. "अबी कितोनी देर तोक चोलेगा ?"... त्याच्या ओ- कारातून तो बंगाली असल्याचं लगेच कळलं...
... धुळ्यातल्या अगदी जून्या भागात एक बंगाली चक्क गुरुपोर्णिमेचा इव्हेंट अटेंड करतोय... ग्रेट !
वेळ काढायचा होता... गप्पा सुरु केल्या...
"आर यू फ्रॉम बेंगॉल ?" - येस... आय एम फ्रॉम कोलकॅटा...
इथून जुजबी गप्पा सुरू झाल्या...
तो धुळ्यात कुठल्यातरी कंपनीत काम करतो वगैरे गोष्टी झाल्या... शास्त्रीय संगीताची आवड आहे वगैरे बोलला...
चांगलंय....
त्याच्याविषयी चांगलं मत तयार होत होतं, तोच कहानी मे ट्विस्ट आया...
.
"हमे योहापे बिलकोल अचा नई लोगोता..."
- क्यो भाई...
कहा अमारा कोलकॅटा... और कहा आपका धुलीया ?
यू नो ... मुजे माराष्ट्रा अचा नई लोगोता... बेंगोल इज बेंगोल !
....
च्यामारी... दुखरी नस पकडली... धुळ्याला आणि महाराष्ट्राला बोलतोय.... शेख्या... घेऊ याला रिंगणात... धुळ्यात राहून, इथलं खाऊन महाराष्ट्राला बोलतोय... हर हर महादेव...
.
"ओहह... रिअली ?"
तो आप इतना अच्चा कोलकॅटा चोडके यहा धुलीया क्यो आया ?" ...
- पैसा कामाने... यहापे मेरा जॉब है ना...
- क्यो ? वहाँ पे इतना अचा है तो पैसा नई मिलता ? आना क्यो पडा यहा पे ? महाराष्ट्रामे क्यो ?
जीस शहरका खाते हो, उसकोही बूरा कहते हो... ?
...
मी आणि शेखरने मराठी, आहिराणी, हिंदी, इंग्रजीचा पूरेपूर वापर करत शाळा घेतली...
बाबूमोशॉय कॉलचं निमित्त करुन पळून गेला...
नंतर दिसला नाही...
.
ज्या ठिकाणी खातात त्याचविषयी वाईट बोलणाऱ्यांना मी ठिकाणीच उघडं करतो... मग ते धुळ्यात असो, पुण्यात असो वा मुंबईत...!
इथे येऊन पैसा कमावताय ना, मग ते शहर, ते राज्य
आवडत नसेल तरी आवडून घ्यावं लागेल !
विषय संपला !

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved