Posts

Showing posts from October, 2016

Happy Diwali

Image
"पैसा" हा ९० टक्के प्रॉब्लेम्सवर एकमेव उपाय असतो... आणि प्रॅक्टीकली, पैसा हाच जवळपास सर्वच सुखांना कारक असतो... ! त्यामुळे योग्य मार्गाने येणाऱ्या प्रत्येक पैश्यांचं मनःपूर्वक, आनंदाने स्वागत करा...  ! . तुम्हाला आयुष्य सोयीस्कर होण्यासाठी, सुखं मिळण्यासाठी आवश्यक तितका, भरपूर पैसा प्राप्त होवो... व्यापारात वृद्धी होवो... कार्यक्षेत्रात वाढ होवो... ! . भरपूर पैसा येवू देत...! . एक दिवस डॉलरच्या तुलनेत आपला रुपया मोठ्ठा होईल, शेअर्स - सेन्सेक्स वाढता होईल ! :-) :-) लक्ष्मीपूजन - दिवाळीच्या लाखरुपयाच्या, भरभराटीच्या शुभेच्छा ! ...

Diwali...!! With humanity !! :-)

आमचे तसे खूप जूने ग्राहक काल दुकानात आलेले... तेव्हा पप्पा इथे नव्हते... काहींचा मामला उधारीवर असल्याने पप्पा इथे नसले तर आम्ही शक्यतोवर अश्यांना काही वेळानंतर पप्पा असतांनाच यायला सांगतो... कालची गोष्ट... . ते ग्राहक जुने असले तरी, पेमेंटच्या बाबतीत जरा जास्त जड आहेत हे माहित होतं... उधारीच्या बाबतीत आपल्या हातून काही आगाऊपणा नको, म्हणून काल दुपारी त्यांना - "पप्पा आले की या... मला इथलं माहित नाही" असं सांगून परत पाठवलं... त्यांचा मागचा ड्यू पण तगडाच... सो उगाच अंगावर घ्यायला नको ! पप्पा आल्यावर त्यांना सांगितलं... ! त्या ग्राहकाबद्दल एकुण अनूभव ठिक नसल्यानं पप्पांनी पण थोडं नाराजीच्या सूरातच ठरवलं - ड्यूज क्लेअर केले तरच बघू... खूप फिरावं लागतं त्यांच्यामागे... तो विषय तिथे संपला ! दुकान वाढवलं... . आज सकाळी सकाळी, पप्पांनी त्यांना स्वतःहून फोन केला... "केव्हाही येऊन घेऊन जा कपडे... जे हवे ते ! ... " आणि आम्हालाही सांगितलं की त्यांना जे हवं ते देऊन द्या.. मला वाटलं ते ड्यूज क्लीअर करत असतील, पण तसं तर काहीच बोलले नाही... मग ? - "मागचं क्लीअर करताय क...

लक्ष्मणायन

Image
लक्ष्मणायण : : रामायण मुख्यत: रामांचा वनवास, पितृप्रेम, एकपत्नीव्रत सितेची पतीनिष्ठा, त्याग, कौसल्येचं पुत्रप्रेम आणि भरताचं बंधूप्रेम याभोवती गुंफलं गेलंय...!! पण केँद्रस्थानी राम असता लक्ष्मण आणि त्यांचं कुटूंब दुर्देवाने झाकोळलं गेलंय... किँबहूना त्यागाच्या दृष्टीनं त्यांचं कार्य रामांपेक्षाही मोठं आहे. १. लक्ष्मणांनी रामांबरोबर वनवास भोगला. त्यांची सेवा केली. तितकाच त्रास, दु:ख सहन केलं. (यादरम्यान लक्ष्मण तत्वत: एकटेच होते. रामांबरोबर सीता आणि लक्ष्मण होते.) २. कौसल्येप्रमाणे सुमित्रेनेही आपला पुत्र १४ वर्ष दूर ठेवला. परंतू त्या माऊलीचा त्याग कौसल्यांपुढे कां झाकोळला जावा ? ३. लक्ष्मणपत्नी उर्मिला ! एकमेकांपासून १४ वर्ष दूर राहणाऱ्‍या या दांपत्याच्या प्रेमाने विश्वासाचे एक उदाहरण निर्माण केले. एकपत्नीव्रत राम तसंच एकपत्नीव्रत लक्ष्मण का म्हणू नये ? उर्मिलेचा त्याग सीतांपुढे झाकोळला गेला. त्यांच्या वाट्याला न्याय आलाच नाही. ४. भरतांच्या बंधूप्रेमाचं उदाहरण दिलं जातं. पण त्याचवेळी शत्रुघ्नपण आपल्या सख्ख्या भावाच्या प्रेमापासून वंचित होते याचा साधा उल्लेखही नाही. (लक...

Bhagawadgeeta भगवद्गीता

Image
=अनुभूती= साधारण दोन महिन्यांपूर्वी घरात श्रीमद्भगवद्गीतेचं मराठी अर्थासहीत असलेलं, गीताप्रेसचं पुस्तक सापडलं... श्रीमद्भगवद्गीतेचा बारावा अध्याय पाठ करुन शाळेत असतांना बक्षिस मिळालेलं आठवलं आणि अगदी सहज, पण घाईतच त्यातल्या बाराव्या अध्यायाचं रॅपिड रिडीँग सुरु केलं... संस्कृत उच्चार, लहानपणी पाठ केलेले - त्यामुळे अगदी परफेक्ट उच्चार होत नव्हते, पण बरंच आठवत असल्याने छान वाटत होतं... अर्थ वाचतांना इंट्रेस्टीँग वाटत होतं... यात काहीतरी आहे हे डोक्यात वाजलं - तेव्हा घाई होती, ते तिथेच ठेवलं... पण तेच डोक्यात सुरु झालं... यात काहीतरी नक्की आहे... . दुसऱ्‍या दिवशी रिकाम्या वेळेत पुन्हा ते पुस्तक घेतलं.... आणि बारावा अध्याय उघडला... एक एक श्लोक आणि त्याचा अर्थ मनात वाचणं सुरु केलं... इंट्रेस्टीँग... त्यातपण संस्कृत...! पण मनात उच्चार नीट होत नव्हते - फील येत नव्हता... तेव्हा आमच्या संस्कृतच्या वियन कॉलनी, देवपूर, धुळे स्थित ऐंशी वर्षीय जोशी मॅडम, त्यांचं घर, थंडी, सकाळी साडेपाचची वेळ, मॉर्टिनची कॉईल, आणि त्या अद्भूत वातावरणात त्यांनी दिलेला गुरुमंत्र जसाचं तसा आठवला... "तेजा, संस्क...

OPINION

बागळेने अभ बर्तकांना चालू चर्चेतून हाकलून दिलं... ! . कुठल्याही घटनेवर आपलं काहीतरी मत असावं, त्यामुळे ते बनवण्यासाठी आम्ही (आदरार्थी मी) स्वतःची एकसदस्यीय समिती नेमली. त्याचा तोंडी अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. . वर्तकांनी आझाद मैदानांवर झालेल्या आंदोलनाबद्दल अतिशयोक्ती अलंकार वापरुन एक मोठ्ठी पुडी सोडली... जी जरा जास्त झाली... सनातनवर, हिंदूंवर पेटलेल्या वाळेला आयतीच नाडी हातात मिळाली... वाळेची गत आधीच म.. त्यात म प्यायला... त्यात विंचू चावला टाईप आहे... चॅनेलचा टिआरपी डोंबलाइतका पण नाही... भरीस भर त्या खवड्याला कुठल्या कार्यक्रमाच्या सुपाऱ्याही मिळत नाहीत... त्यामुळे सदैव piles झाल्यासारखा चेहरा घेऊन फिरणाऱ्या नानाला वर्तकाच्या रुपाने आयतीच शिकार मिळाली... आणि तो बर्तकांवर फुल्ल चढून बसला... परीणामी : इज्जतीचा पंचनामा करुन बर्तक बाहेर पडले.. . बर्तक हा माणूस त्याहून भंपक... कुठे काय बोलावं याची जराही अक्कल नसलेला... कशाचंच गांभिर्य नसलेला.  दाभोळकरांच्या श्रद्धांजली सभेत या माणसाने दात काढले होते... मुद्दा भलेही योग्य असेल, पण प्रक्षोभक बोलून, दोन चार जास्तीच्या पुड्या ...

Sehwag

२०११ मध्ये वर्ल्ड कप जिंकला आणि त्यानंतर माझा अचानक क्रिकेट मधला रस संपला. म्हणजे याची देही याची डोळा वर्ल्ड कप जिंकलेला पाहायचा होता. ती इच्छा पूर्ण झाली आणि अचानक एक पोकळी निर्माण झाली. सगळे काही मिळाले असे म्हणून समाधी वगैरे घेणार्या लोकांसारखं झालं. मलाही कधीकधी हे विचित्र वाटायचं पण असं घडलं हे खरंच. दरम्यानच्या काळात माझे आवडते द्रविड, लक्ष्मण, कुंबळे रिटायर झाले. सचिन शंभरची म्याजीक फिगर गाठण्यासाठी चाचपडत होता. अगदी कपिलइतका नाही तरी हा काळ बराचसा केविलवाणा होता त्याच्यासाठी. सेहवागही तांदळातल्या खड्यासारखा बाजूला काढला गेला होता. तुफान फटकेबाजी करणारे फलंदाज नेहमीच लोकप्रिय होतात. माझी ओरिजिनल आवड द्रविड, लक्ष्मण, सचिन असली तरी सेहवाग वर्ज्य नव्हता. नव्हताच. बेदरकारपणाचा तो नुसता आव आणत नव्हता ( के श्रीकांत वगैरेसारखा) तो खरच तसा होता. १९५ वर असताना भोXXच्याने सिक्स मारून डबल सेन्चुरी काढली ती पण टेस्ट मध्ये. हे निव्वळ अशक्य माणूसच करू जाणे. समोर कोण बॉलर आहे याचा त्याला कधी फरक नाही पडला. २००३ च्या वर्ल्ड कप मध्ये तो आणि सचिन,  अख्तरवर जे चढ चढ चढले होते ते अविस्मरणीय....

Seth

Image
नवरात्र ते दिवाळी हा पूर्ण काळ मी आमच्या दुकानातच आहे... अॅज "सेssठ" ! यावेळी जरा जास्त लक्ष घातलंय ! ऑफीसमध्यल्या "सर" पेक्षा इथली "सेठ" वाली फिलींग जबरदस्त आहे. . इथे तऱ्हेतऱ्हेचे लोकं भेटतात... १ रुपया ते १ लाख वाले. रुमाल ते पैठणी घेणारे... पण प्रत्येकाला स्वभावनुरुप हाताळण्याची पद्धत वेगळी, तो माणूस रिकाम्या हाती परत जाऊ न देण्याची शर्थ, आवजो वेळी पुन्हा परत येण्याचा गोड बोलत निरोप देणं... आणि त्या माणसाला आपलेपणा जाणवून देण्याचा, जोडण्याचा प्रयत्न ! सगळं भन्नाट आहे ! मी तर शिकतोय, पण मज्जा येतेय... पप्पांना-आजोबांना हे करतांना नेहमी बघतो. पण वाटतं तितकं सोप्पं नाही ! . कार्पोरेटमधले sophisticated सर, यस, नो, शुअर, ओहss एटिकेट्स एकीकडे, तर दुकानातले सेठ, मालिक, येत चला... वगैरे दुसरीकडे....! दुकानात येतांना आपलं शिक्षण बाहेर काढून यायचं - पहिला धडा मिळालेला तो हाच ! जगणं खूप सुंदर आहे... फक्त क्लॉक्स मॅच व्हायला हवं ! अर्थात ज्या त्या वेळेवर ती गोष्ट व्हायला हवी - इतकंच ! . टिप : साड्या, पैठणी, रेडीमेडस्, गारमेन्टस्, हॅन्डलूम, गालीचे वगैरे...

Why Burns Ravan ??

रावण दहन या प्रकाराचा आधीपासून मी निषेध करतो... बुराई पे अच्छाईकी जीत वगैरे गोष्टी ठिक, पण रावण जाळण्याचं लॉजिक मला अजुनही कळलं नाहीय... . रावण-राम हे पौराणिक पात्र आहेत. जे एका कथेच्या स्वरूपात आपल्यासमोर येतात... त्या कथेत शेवटी रामाने रावणाचा वध केला, रावणाने माफी मागितली, रामाने माफ केलं - विषय संपला ! पुन्हा पुन्हा दरवर्षी रावणाच्या नावाने शिमगा करायचा आधिकार कुणी दिलाय ? आपण त्या रावणाच्या समोर उभं राहणाच्या तरी लायकीचे आहोत कां ? की स्वतःला राम समजतो ? . पौराणिक कथांतून चांगलं ते घ्यायचं, बस ! रावण प्रचंड शक्तीशाली, बुद्धीमान, शिवभक्त व्यक्ती होते ! NoOne is 100% Pure !! ना रावण - ना राम ! शूर्पणखेचा बदला घेण्यासाठी रामायण घडलं होतं ! रामायणातून राम-लक्ष्मण-रावण -कुंभकर्ण-हनुमान यांच्यापासून घेण्यासारखं खूप आहे... दशानन तर अष्टग्रंथी होते !... मूळात "रामायण" हे राजकारण आहे - राम-रावण या दोन राजांमधील युद्ध ! एकाचा विजय झाला, एकाचा पराभव ! त्यामूळे रावणाचा असूर म्हणून प्रचार मुर्खपणा आहे ! . बुराई पर अच्छाई करायचं तर व्यसनी, बलात्कारी, नतद्रष्ट, वायफळ, देशद्रोह...

Dasara

Image
दसरा आणि थाट भैरव ! . दसऱ्याची सकाळ - छान शब्द "प्रभाsत"... दसऱ्याची सकाळ चपखल प्रभाsत असते... एकाच मापात... फिक्स ! दसरा,  दिवाळी, रविवार, गणपती, १६ जानेवारी या सणांच्या सकाळ या त्या त्या दिवसाप्रमाणे सेम असतात, जसं दिवाळीची पहाट... रविवारची मॉर्निंग तशी दसरा = प्रभाsत... एकाच शब्दात सगळं येतं ! . मी रोजच लवकर उठतो, पण दसऱ्याला संचलनाची घाई असते... त्यात यावेळी नवीन गणवेश घालून संचलन असल्यानं उत्साह जरा दांडगा होता !... त्यामुळे लवकर करता करता अतिच लवकर, सकाळी ५ वाजता मी पूर्ण तयार झालो... त्यामुळे साधारण तासभर वेळ होता हातात, मग प्रभाsत सुरेल करायची ठरली... हि एक दसऱ्याची माझी स्वतःसाठी केलेली प्रथा ... ! पेटी काढली, थंडी, पहाट आणि धुकं... त्यामुळे प्रभाsतचं "परभात" मनात वाजू लागलं... थाट भैरव... राग कलिंगडा... बंदीश : अब होने लगी परभात सखी... याचा अंतरा खूप छान आहे. "अरुण किरण सखी पूरब प्रकाशत... विजयादशमीची सकाळ, अंगावर संघाचा गणवेश आणि तब्येतीचा चंचल प्रकृतीचा कलिंगडा ! पूर्ण प्रभाsतचं वर्णन आहे. मूड फ्रेश फ्रेश !... सुरांच्या सातव्या आसमानपर असणं......

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved