Dasara

दसरा आणि थाट भैरव !
.
दसऱ्याची सकाळ - छान शब्द "प्रभाsत"... दसऱ्याची सकाळ चपखल प्रभाsत असते... एकाच मापात... फिक्स ! दसरा,  दिवाळी, रविवार, गणपती, १६ जानेवारी या सणांच्या सकाळ या त्या त्या दिवसाप्रमाणे सेम असतात, जसं दिवाळीची पहाट... रविवारची मॉर्निंग तशी दसरा = प्रभाsत... एकाच शब्दात सगळं येतं !
.
मी रोजच लवकर उठतो, पण दसऱ्याला संचलनाची घाई असते... त्यात यावेळी नवीन गणवेश घालून संचलन असल्यानं उत्साह जरा दांडगा होता !... त्यामुळे लवकर करता करता अतिच लवकर, सकाळी ५ वाजता मी पूर्ण तयार झालो... त्यामुळे साधारण तासभर वेळ होता हातात, मग प्रभाsत सुरेल करायची ठरली... हि एक दसऱ्याची माझी स्वतःसाठी केलेली प्रथा ... ! पेटी काढली, थंडी, पहाट आणि धुकं... त्यामुळे प्रभाsतचं "परभात" मनात वाजू लागलं... थाट भैरव... राग कलिंगडा... बंदीश : अब होने लगी परभात सखी... याचा अंतरा खूप छान आहे. "अरुण किरण सखी पूरब प्रकाशत... विजयादशमीची सकाळ, अंगावर संघाचा गणवेश आणि तब्येतीचा चंचल प्रकृतीचा कलिंगडा ! पूर्ण प्रभाsतचं वर्णन आहे. मूड फ्रेश फ्रेश !... सुरांच्या सातव्या आसमानपर असणं... तंद्री लागणं... सुख म्हणतात ते हेच !
.
तब्येतीच्या, भैरव थाटातल्या कलींगडाने मनात शांतता आणली, त्याच जबरदस्त मूडने संचलन केलं...! दिवस सार्थकी ! दसरा सुख देतो म्हणतात, आज अनुभवलं ! दसऱ्याची मी स्वतःसाठी सुरू केलेली अजून एक प्रथा म्हणजे "पुस्तकं आणि रेकॉर्डस" ! या दिवशी नऊ-दहा पुस्तकं, नाटकं, क्लासिकल रेकॉर्डस्, अभिवाचनं वगैरे खाद्य विकत आणतो...!
.
था सुरेल आणि सुंदर सकाळी,
जगदंबेने म्हैषासूरावर विजय मिळवला तसा तुम्हाला तुमच्या संकटांवर विजय मिळो, तुम्हाला शस्त्रांचा वापर करण्याची कधीच वेळ न येवो... या शुभकामनांसह दसरा - विजयादशमीच्या खूप शुभेच्छा !
- तेजस कुळकर्णी

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved