Seth

नवरात्र ते दिवाळी हा पूर्ण काळ मी आमच्या दुकानातच आहे... अॅज "सेssठ" ! यावेळी जरा जास्त लक्ष घातलंय !
ऑफीसमध्यल्या "सर" पेक्षा इथली "सेठ" वाली फिलींग जबरदस्त आहे.
.
इथे तऱ्हेतऱ्हेचे लोकं भेटतात... १ रुपया ते १ लाख वाले. रुमाल ते पैठणी घेणारे... पण प्रत्येकाला स्वभावनुरुप हाताळण्याची पद्धत वेगळी, तो माणूस रिकाम्या हाती परत जाऊ न देण्याची शर्थ, आवजो वेळी पुन्हा परत येण्याचा गोड बोलत निरोप देणं... आणि त्या माणसाला आपलेपणा जाणवून देण्याचा, जोडण्याचा प्रयत्न ! सगळं भन्नाट आहे ! मी तर शिकतोय, पण मज्जा येतेय... पप्पांना-आजोबांना हे करतांना नेहमी बघतो. पण वाटतं तितकं सोप्पं नाही !
.
कार्पोरेटमधले sophisticated सर, यस, नो, शुअर, ओहss एटिकेट्स एकीकडे, तर दुकानातले सेठ, मालिक, येत चला... वगैरे दुसरीकडे....!
दुकानात येतांना आपलं शिक्षण बाहेर काढून यायचं - पहिला धडा मिळालेला तो हाच !
जगणं खूप सुंदर आहे... फक्त क्लॉक्स मॅच व्हायला हवं !
अर्थात ज्या त्या वेळेवर ती गोष्ट व्हायला हवी - इतकंच !
.
टिप : साड्या, पैठणी, रेडीमेडस्, गारमेन्टस्, हॅन्डलूम, गालीचे वगैरे घ्यायचे असतील तर या... :-P माझं नाव सांगा... स्वस्तात मिळेल... you know... आपूनकी भौत चलती हे यहापे :-P :-P

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved