Sehwag
२०११ मध्ये वर्ल्ड कप जिंकला आणि त्यानंतर माझा अचानक क्रिकेट मधला रस संपला. म्हणजे याची देही याची डोळा वर्ल्ड कप जिंकलेला पाहायचा होता. ती इच्छा पूर्ण झाली आणि अचानक एक पोकळी निर्माण झाली. सगळे काही मिळाले असे म्हणून समाधी वगैरे घेणार्या लोकांसारखं झालं. मलाही कधीकधी हे विचित्र वाटायचं पण असं घडलं हे खरंच. दरम्यानच्या काळात माझे आवडते द्रविड, लक्ष्मण, कुंबळे रिटायर झाले. सचिन शंभरची म्याजीक फिगर गाठण्यासाठी चाचपडत होता. अगदी कपिलइतका नाही तरी हा काळ बराचसा केविलवाणा होता त्याच्यासाठी. सेहवागही तांदळातल्या खड्यासारखा बाजूला काढला गेला होता.
तुफान फटकेबाजी करणारे फलंदाज नेहमीच लोकप्रिय होतात. माझी ओरिजिनल आवड द्रविड, लक्ष्मण, सचिन असली तरी सेहवाग वर्ज्य नव्हता. नव्हताच. बेदरकारपणाचा तो नुसता आव आणत नव्हता ( के श्रीकांत वगैरेसारखा) तो खरच तसा होता. १९५ वर असताना भोXXच्याने सिक्स मारून डबल सेन्चुरी काढली ती पण टेस्ट मध्ये. हे निव्वळ अशक्य माणूसच करू जाणे. समोर कोण बॉलर आहे याचा त्याला कधी फरक नाही पडला. २००३ च्या वर्ल्ड कप मध्ये तो आणि सचिन, अख्तरवर जे चढ चढ चढले होते ते अविस्मरणीय. सेहवाग च्या कसाईखान्यातही एक नजाकत होती. गेल वगैरेसारखा तो निव्वळ आडमाप आडदांड वाटला नाही. आणि मैदानावरच्या रौद्ररुपाला अन्गुलीभर पुरून उरेल असे मैदानाबाहेरचे लाजरेबुजरे, थोडेसे गावठी व्यक्तिमत्व. सचिन बद्दल असणारा आदर दाखवी नव्हता. एका शो मध्ये तो आणि गावस्कर आले होते. धमाल उडवून दिली होती वीरूने.
सचिन, वीरू, द्रविड, दादा गांगुली, लक्ष्मण, कुंबळे हे एकाच वेळी टीम मध्ये खेळत होते हे याची देही बघायला मिळाले. अजून काय हवे.