Diwali...!! With humanity !! :-)

आमचे तसे खूप जूने ग्राहक काल दुकानात आलेले... तेव्हा पप्पा इथे नव्हते... काहींचा मामला उधारीवर असल्याने पप्पा इथे नसले तर आम्ही शक्यतोवर अश्यांना काही वेळानंतर पप्पा असतांनाच यायला सांगतो... कालची गोष्ट...
.
ते ग्राहक जुने असले तरी, पेमेंटच्या बाबतीत जरा जास्त जड आहेत हे माहित होतं... उधारीच्या बाबतीत आपल्या हातून काही आगाऊपणा नको, म्हणून काल दुपारी त्यांना - "पप्पा आले की या... मला इथलं माहित नाही" असं सांगून परत पाठवलं... त्यांचा मागचा ड्यू पण तगडाच... सो उगाच अंगावर घ्यायला नको !
पप्पा आल्यावर त्यांना सांगितलं... ! त्या ग्राहकाबद्दल एकुण अनूभव ठिक नसल्यानं पप्पांनी पण थोडं नाराजीच्या सूरातच ठरवलं - ड्यूज क्लेअर केले तरच बघू... खूप फिरावं लागतं त्यांच्यामागे...
तो विषय तिथे संपला ! दुकान वाढवलं...
.
आज सकाळी सकाळी, पप्पांनी त्यांना स्वतःहून फोन केला... "केव्हाही येऊन घेऊन जा कपडे... जे हवे ते ! ... " आणि आम्हालाही सांगितलं की त्यांना जे हवं ते देऊन द्या..
मला वाटलं ते ड्यूज क्लीअर करत असतील, पण तसं तर काहीच बोलले नाही... मग ?
- "मागचं क्लीअर करताय कां ते ? कॅश आहे ?"
- "नाही, पण देऊन देऊ... "
- "कां ?  असं कां ?"
त्यावर पप्पांनी जे उत्तर दिलं, ते hats off वालं... लाख रुपयांचं...
...
अरे पैसे कुठे पळून जाताय... ? दोन दिवस लेट मिळतील... दिवाळी आहे... सण आहे... त्यांची वेळ साजरी होईल... पैस्यांमूळे कुणालाही नाराज नाही करायचं... हजार-पाचशे करता आपण अडून बसलो - पैसे आज ना उद्या मिळतीलच, पण त्यांचा सण वाया जाईल... कुणीही आलं, तरी देऊन दे... परत नको पाठवू... !
....
मी शांत... ! यापेक्षा जास्त चांगली, समाधानाची दिवाळी सकाळ कुठलीच नव्हती... मला express होताच आलं नाही... ! Proud of you Pappa...!!

© 2023 | Tejas Kulkarni. All Rights Reserved